Satara News : साताऱ्यात शाॅक लागून दोन सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत; थोरल्याला वाचवताना थाकटाही चिकटला
Satara News : कराड तालुक्यातील गोवारेमध्ये ही धक्कादायक घटना घडली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देण्यात आला.
सातारा : राज्यात बुडून मृत्यू होणाऱ्यांची रांगच लागली असताना आता सातारमध्ये शाॅक लागून सख्ख्या भावांचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली. कराड तालुक्यातील गोवारेमध्ये ही धक्कादायक घटना घडली. विहिरीजवळ असलेल्या फ्युजबॉक्सचा शॉक लागला. तुकाराम सदाशिव खोचरे (वय 55) व शहाजी सदाशिव खोचरे (वय 50) अशी शॉक लागून मृत्यू झालेल्या सख्ख्या भावांची नावे आहेत.
शेतीमध्ये पाणी देण्यासाठी गेले होते
दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार तुकाराम आणि शहाजी खोचरे यांची गावच्या भटकी नावाच्या शिवारात शेती आहे. याठिकाणीच त्यांची विहीर होती. या विहिरीला जवळच असलेल्या फ्युजबॉक्समधून विद्युत पुरवठा होता. तुकाराम आणि शहाजी शुक्रवारी दुपारच्या सुमारास शेतीमध्ये पाणी देण्यासाठी गेले होते. मात्र, दिवसभर ते घरी परत आले नाहीत.
दोघांनाही फोन, पण संपर्क नाहीच
दोघेही घरी न परतल्याने कुटुंबीयांनी मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांचा फोन लागत होता, पण संपर्क होत नव्हता. त्यामुळे सायंकाळी शोधत तुकाराम खोचरेंचा मुलगा शेताकडे गेल्यानंतर दोघेही फ्युजबॉक्स जवळ मृतावस्थेत निपचिप पडले होते. मुलाने घटनेची माहिती कुटुंबीयांना दिली. घटनेची माहिती मिळाल्यानंतर रात्री कराड शहर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी देण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या