एक्स्प्लोर

प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी; वृत्ताला साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांचा दुजोरा, शोध सुरु

Satara Pratapgad : प्रतापगडाच्या पायथ्याशी आणखी तीन कबरी आढळल्या. साताऱ्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी वृत्ताला दुजोरा दिला असून अफझल खानाच्या कबरीजवळ आणखी कुणाच्या कबरी याची चर्चा सुरू आहे.

Satara Pratapgad : साताऱ्यात (Satara News) प्रतापगडाच्या (Pratapgad) पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीजवळ (Afzal Khan Kabar) आणखी तीन कबरी आढळून आल्या आहेत. या कबरी कुणाच्या हा सध्या मोठा चर्चेचा विषय बनला आहे. आणखी तीन कबरी असल्याच्या वृत्ताला साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी दुजोरा दिला आहे. या कबरी नेमक्या कोणाच्या याबाबत सध्या माहिती घेण्याचं काम महसूल विभागाकडून केलं जात आहे. दरम्यान, इतिहास अभ्यासक द. बा. पारसनीस यांच्या 1916 साली प्रकाशित झालेल्या पुस्तकातील फोटोमध्ये एकच कबर असल्याचा फोटो आहे. त्यामुळे या तीन कबरी नक्की कोणाच्या हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. 

प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम प्रतापगडावरून हटवण्यात आलं आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाची कारवाई करण्यात आली. शिवप्रताप दिनाचा (Shiv Pratap Din) मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात आली. 

अखेर अफजल खानाच्या कबरीभोवतालच्या बांधकामावर हातोडा 

अफजल खानाच्या  कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत. हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून  हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या  कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावं अशी मागणी वारंवार शिवप्रेमींकडून केली जात होती. त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीनं सांगण्यात येत असल्याचा दावा करतही यावरुन अनेकदा वाद झाले होते. याच पार्श्वभूमीवर गेल्या अनेक दिवसांपासून हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. त्या परिसरात कोणाला जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. 

पाहा व्हिडीओ : अफजल खानाच्या कबरीजवळ आढळल्या आणखी तीन कबरी

छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इतिहासप्रेमी, शिवप्रेमींसमोर यावा यासाठी हा परिसर खुला करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. अखेर हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. अखेर शिवप्रताप दिनाचं औचित्य साधत महसूल विभाग आणि वनविभागाकडून या अनधिकृत बांधकामावर हातोडा चालवण्यात आला. 

कबरीवर झालेले अनधिकृत बांधकाम

  • कबरीच्या बाजूला  सात खोल्या
  • कबरीसमोर हॉल
  • मुजावरांना राहण्यासाठी खोल्यांची व्यवस्था
  • आठ  गुंठ्यात अनधिकृत बांधकाम

या अनधिकृत बांधकामावरुन अनेकदा वादही झाला आणि अखेर यावर हातोडा पडला. या कारवाईदरम्यान अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली होती. 

अफझल खानाच्या कबरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात

अफझल खानाच्या कबरीचा वाद सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. प्रतापगडावरील अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकामावर केलेल्या कारवाईविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. अफझल खानाच्या कबरीजवळचं अनधिकृत बांधकाम पाडण्यास प्रशासनानं सुरुवात केल्यानंतर ही याचिका दाखल करण्यात आली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

MLC Election : विधानपरिषदेसाठी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची नावं उद्या जाहीर होणार?Ajit Pawar NCP Special Report : पिंपरीत दादांना काकांचा धक्का? 16 नगरसेवक शरद पवारांच्या संपर्कातSpecial Report Beed Crime : बीडचा गोळीबार, राजकीय वॉर? परळीत संरपंच बापू आंधळेंची हत्याSpecial Report Maharashtra Firing | महाराष्ट्र आहे की बंदुकराष्ट्र? राज्यात गोळीबाराच्या घटना वाढल्या

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Virat Kohli & Rohit Sharma : किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
किंग कोहली आणि हिटमॅन T20 मधून निवृत्त, विराट- रोहितला रिटायरमेंटनंतर पेन्शन मिळणार? वाचा सविस्तर
Mumbai News : पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
पत्र्यावर गेलेला बॉल काढणं जीवावर बेतलं, विजेचा शॉक लागून 10 वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू
IND vs SL : टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
टी20 वर्ल्डकपमधील विजयानंतर टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर, विराट-रोहितला संघातून वगळणार? संभाव्य संघ पाहा
Sujata Saunik : सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
सुजाता सौनिक यांनी स्वीकारली मुख्य सचिवपदाची सूत्रे, राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा बहुमान
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
धक्कादायक! पोलीस भरतीचं स्वप्न अधुरं, चाचणीदरम्यान 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू तर एकाची प्रकृती चिंताजनक
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
सुप्रिया सुळेंचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांनी अशा पद्धतीनं बोलणं शोभत नाही; रावसाहेब दानवेंचा टोला
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्याने ट्रोलर्सना सुनावलं, जी लोकं मला 1 टक्काही ओळखत नाहीत त्यांनी...
Rohit Sharma : टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचं मनात नव्हतं, परिस्थितीमुळं निर्णय घेतला, रोहित शर्मा असं का म्हणाला?
टी 20 क्रिकेट मधून निवृत्तीचा विचार नव्हता, परिस्थितीच तशी आली अन् निर्णय घेतला : रोहित शर्मा
Embed widget