एक्स्प्लोर

Satara: शिवप्रताप दिनाचा मुहूर्त, अफझल खानच्या कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात, महसूल वनविभागाची कारवाई

Satara Pratapgad : शिवप्रताप दिनादिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात प्रतापगडावरती माथा टेकण्यासाठी येत असतात. मात्र आज कारवाईमुळे संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे. 

 सातारा :  छत्रपती शिवरायांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याला (Satara Pratapgad ) असलेल्या अफजल खानाच्या (Afzal Khan)  कबरीसमोरील अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. महसूल विभाग आणि वनविभागाकडून या पाडकामाला सुरूवात झाली आहे. शिवप्रताप दिनाचा (Shiv Pratap Din) मुहूर्त साधत ही कारवाई करण्यात येत आहे. 

अफजल खानाच्या  कबरीसमोरील अनधिकृत बांधकामवरून अनेकदा वाद झाले आहेत.  हिंदूत्ववादी संघटना आणि शिवप्रेमींकडून  हे वाद समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. अफजल खानाच्या  कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडावे अशी शिवप्रेमींची मागणी होती.  त्याचबरोबर इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगण्यात येत होता त्यावरून देखील अनेकदा वाद झाले होते. या सर्व पार्श्वभूमीवर हा परिसर पूर्णपणे सील करण्यात आला होता. 2006 सालापासून हा परिसर सील करण्यात आला होता. 

छत्रपती शिवरायांचा इतिहास हा इतिहासप्रेमी, शिवप्रेमींसमोर यावा यासाठी हा परिसर खुला करावा, अशी मागणी अनेकांकडून करण्यात आली होती. अखेर हा वाद न्यायालयात गेला. न्यायालयाकडून अनाधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र सरकारकडून या संदर्भात कोणतीही अंमलबजावणी करण्यात आली नाही. मात्र आज अखेर पोलीस, महसूल विभाग आणि वनविभागाकडून बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. पहाटे 5.30 वाजल्यापासून  अनधिकृत बांधकाम पाडण्यास सुरूवात करण्यात आली आहे. सध्या हे काम सुरू असून मोठा पोलिस बंदोबस्त या परिसरात तैनात करण्यात आला आहे. तसेच संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे.  

  शिवप्रतापदिनाचे औचित्य साधत कबरीसमोरील अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे.  10 नोव्हेंबर म्हणजे आजच्या दिवशीच प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाचा वध करण्यात आला होता आणि याच दिवशी अनाधिकृत बांधकाम पाडण्यास सुरुवात केली आहे. शिवप्रेमींकडून या कारवाईबद्दल आनंद व्यक्त करण्यात येत आहे.  शिवभक्तांसाठी ही अभिनानाची गोष्ट आहे.  अफजल खानाच्या  कबरीसमोरील परिसर सील असल्याने कबरीबाबतचा खोटा इतिहास लोकांसमोर येत होता. आजच्या कारवाईनंतर हा इतिहास शिवप्रेमींसमोर येईल, अशी भावना शिवप्रेमींनी एबीपी माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.  शिव प्रताप दिन  हा दिवस मोठ्या उत्साहात म्हणून साजरा केला जातो. शिवप्रताप दिनादिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात प्रतापगडावरती माथा टेकण्यासाठी येत असतात. मात्र आज कारवाईमुळे संपूर्ण परिसर बंद करण्यात आला आहे. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget