शंभूराज देसाईंविरोधात पोस्ट करणं शिंदे गटाच्या तालुकाप्रमुखाला भोवलं, अश्लील पोस्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट लिहणाऱ्या त्यांच्याच शिवसेना गटातील तालुकाप्रमुकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सातारा : सातारा (Satara) जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई (Shamburaj Desai) यांच्या नावाने सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट लिहणाऱ्या त्यांच्याच शिवसेना (Shiv Sena) गटातील तालुकाप्रमुखावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलिस ठाण्यात (Karad Police Station) हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. 'शिवसेना एकनाथजी शिंदे ग्रुप” या नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये कराड तालुक्यातील शिंदे गटातील सर्व मोठ्या पदावर असलेले शिवसैनिक आहेत.
सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या नावाने सोशल मीडियावर पोस्ट लिहणाऱ्या त्यांच्याच शिवसेना गटातील तालुकाप्रमुकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. शिवसेना एकनाथ शिंदे ग्रुप या नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये कराड तालुक्यातील शिंदे गटातील सर्व मोठ मोठ्या पदावर असलेले शिवसैनिक आहेत. यातील काकासाहेब जाधव हेही या ग्रुपमध्ये आहेत. त्यांनी या ग्रुपवर मुख्यमंत्र्यांना शंभूराज देसाई हे चुकीची माहिती देऊन मुख्यमंत्र्यांना फसवत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिवाय अश्लील भाषेत शब्दही वापरले. यामुळे ग्रुपमधील गुलाबराव शिंदे (Gulabrao Shinde) यांनी कराड शहर पोलिस ठाण्यात काकासाहेब जाधव यांच्यावर गुन्हा दाखल केला.
काकासाहेब जाधव शंभुराज देसाईंचे निकटवर्तीय (Kakasaheb Jadhav)
या तक्रारीत ग्रुपमधील महिलांना लज्जा उत्पन्न होईल असे शब्द वापरुन सोशल मीडियावर शंभूराज देसाई यांची बदनामी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी रात्री त्यांना ताब्यात घेतले. शंभूराज देसाई यांच्या जवळचे काकासाहेब जाधव मानले जातात. अनेक कार्यक्रमात काकासाहेब मांडीला मांडी लाऊन बसतात. मात्र असे कोणते कारण झाले की त्यांनी शंभूराज देसाई यांच्याबद्दल असे अपशब्द वापरले याबाबत सध्या जिल्ह्यात चर्चा सुरु झाली आहे.
राजकीय वर्तुळात चर्चा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूड पडली. ठाकरे आणि शिंदे गट अशा दोन गटात शिवसेना विभागली गेली. अनेकदा ठाकरे आणि शिंदे गट आमनेसामने आल्यामुळे राडा झाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदाचा शिंदे गटातील वाद अशाप्रकारे समोर आल्याने राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे. या संदर्भात शंभुराज देसाईंनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हे ही वाचा :