Satara News : मॅरथॉन सुरु असताना धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू, सातारा हिल मॅरेथॉन स्पर्धेतील घटना
Satara Runner Dies : मृत धावपटू हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील रहिवाशी असून राज पटेल असं या स्पर्धकाचं नाव असल्याचंही समोर आलं आहे.
Runner dies during marathon : सातारा हिल मॅरेथॉन (Satara Hill Marathon) स्पर्धेदरम्यान एका धावपटूचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना समोर आली आहे. स्पर्धेत धावणारा संबधित स्पर्धक हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) रहिवाशी असून राज पटेल असं त्याचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. राज हा राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असल्याचंही समोर आलं आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार ही संपर्ण घटना सातारा हिल मॅरथॉन स्पर्धा सुरु असताना घडली. मॅरथॉन स्पर्धा सुरु झाल्यानंतर स्पर्धेच्या परतीच्या मार्गादरम्यान ही दुर्देवी घटना घडली. स्पर्धक सातारा ते कांस रोड आणि पुन्हा कांस रोड ते पोलीस परेड ग्राऊंड अशा परतीच्या मार्गावर होते. त्याच दरम्यान अचानकपणे राज याच्या छातीत दु:खायला लागलं, त्यामुळे तो त्याठिकाणी जागेवर पडला. ज्यानंतर त्याचजागी त्याचा जागेवर मृत्यू झाल्याचं समोर येत आहे. घटना घडल्यानंतर त्याला प्राथमिक उपचार देण्याचा प्रयत्नही करण्यात आला पण तोवर त्याचा मृत्यू झाला होता. घटनेनंतर त्याचा मृतदेह सातारा शासकीय रुग्णालय (Satara Government Hospital) याठिकाणी नेण्यात आलं.
देशातील तीन क्रमांकांमधिल सर्वात खडतर आणि अवघड समजली जाणारी हाफ मॅरेथॉन म्हणजे सातारा जिल्ह्यातील 'सातारा हिल मॅरेथॉन'. ही सातारा जिल्ह्यासह राज्यातील एक मोठी मॅरेथॉन स्पर्धा म्हणून ओळखली जाते. जागतिक पर्यटनस्थळाचा दर्जा असलेल्या कासरोडवरील घाट माथ्यापर्यंत असलेला हा ट्रॅक राज्यभरातील आणि देशभरातील क्रिडाप्रेमींसाठी आकर्षित करणारा असतो. कोरोनामुळे दोन वर्षे बंद असलेली स्पर्धा यंदा पार पडली. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. साताऱ्यासह आसपासच्या जिल्ह्यातील स्पर्धकही स्पर्धेत सहभाग घेत असतात. राज्यभरातून सुमारे 750 पेक्षा जस्त स्पर्धकांनी भाग घेतला होता. राज हा देखील कोल्हापूरचा असून या स्पर्धेत सहभागी झाला होता. पण त्याचा असा अचानकपणे मृत्यू झाल्याने स्पर्धेला एकप्रकारे गालबोट लागलं आहे. दरम्यान या संपूर्ण घटनेमुळे स्पर्धकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे राज एक राष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू असल्याचंही समोर आलं आहे.
प्रल्हाद घनवट स्पर्धेचा पहिला मानकरी
संबधित मॅरेथॉनचा ट्रॅक 2 तास 9 मिनीटात पार करणारे प्रल्हाद घनवट हा या स्पर्धेचा पहिला मानकरी ठरला. विशेष म्हणजे गेल्या 11 वर्षात पहिल्यांदाच एवढ्या कमी कालावधीत हा ट्रॅक पुर्ण करमारा हा पहिला धावपट्टू असून त्याने या आगोदरच्या सर्व स्पर्धकांचे रेकॉर्ड तोडले आहे. या स्पर्धेतील एक वैशिष्ठ म्हणजे या स्पर्धेची दोन वेळा गिनीज बुक ऑफ वल्ड ने नोंद घेतली. या स्पर्धेचे फ्लॅगऑन सातारचे जिल्हाधिकारी रुचेश जयववंशी आणि सातारा जिल्हा पोसिस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी केला. आणि स्पर्धकांना चिअरपही केले.
हे देखील वाचा-