एक्स्प्लोर

Satara Crime : सख्ख्या चुलत भावाकडून भाऊ, भावजयचा कुऱ्डाडीने वार करून निर्घृण खून; दिवट्या मुलाच्या 'त्या' कृत्याने आई वडील जीवाला मुकले

शेतात काम करत असतानाच त्यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. हा खून त्यांच्याच सख्ख्या चुलत भावाने केल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या अवघ्या चार तासांमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या.

माण (जि. सातारा) : सातारा जिल्ह्यात (Satara Crime) खुनांची मालिका सुरुच असून आता सख्ख्या चुलत भावाने भाऊ आणि भावजयचा (Double Murder in Satara) कुऱ्हाडीने घालून निर्घृण  खून केल्याची घटना घडली. ही घटना माण तालुक्यातील आंधळीत ही घटना घडली. संजय रामचंद्र पवार (वय 49) व मनीषा संजय पवार (वय 45) असे या दाम्पत्याचे नाव आहे. शनिवारी रात्री शेतात काम करत असतानाच त्यांच्यावर कुऱ्हाडीने घाव घालून खून करण्यात आला. हा खून त्यांच्याच सख्ख्या चुलत भावाने केल्याचे उघडकीस आले. आरोपीच्या अवघ्या चार तासांमध्ये मुसक्या आवळण्यात आल्या. दादासो उर्फ बापूराव शहाजी पवार (वय 35, रा. आंधळी) असे त्याचे नाव आहे.  

दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार मृत दाम्पत्य आणि आरोपी दादासोचा वाद सुरु होता. संजय पवार यांच्या मुलाने एका तरुणीवर अत्याचार केल्याने याचा राग दादासो पवारच्या डोक्यात होता. तुम्हाला जिवंत ठेवणार नाही, अशी वारंवार तो धमकी देत होता. या वादातून त्याने खून केल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. त्यामुळे मुलाने केलेल्या कृत्यामुळे आई वडिलांना जीव गमवावा लागला आहे. 

शेतात कुऱ्हाडीने वार करुन खून 

संजय पवार व मनीषा पवार दोघेही शेतात शनिवारी संध्याकाळी पाणी पाजण्यासाठी गेले होते. यावेळी संजय मोटार सुरू करत होते, तर पत्नी मनीषा खत टाकत होत्या. यावेळी दादासो पवारने संजय यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. त्यांचा आवाज ऐकून त्यांच्या पत्नी मनीषा मदतीसाठी धावल्यानंतर दादासोने त्यांच्यावरही कुऱ्हाडीने घाव केला. घाव वर्मी बसल्याने दोघेही रक्ताच्या थारोळ्यात पडले. पवार दाम्पत्य घरी न आल्याने दुसऱ्या दिवशी शेतात पाहणी केली असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडले होते. पोलिस पाटलांनी दहिवडी पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तपासात खून दादासोने केल्याचे समजले. 

पोलिसांनी वाटेतच मुसक्या आवळल्या

दादासो खून करून पुण्याला (Satara Crime) कारने पळाला होता. तेथून पुन्हा फलटणमार्गे घरी येत असताना पोलिसांनी त्याला वाटेतच पकडले. यावेळी त्याने खुनाची कबुली दिली. मृत संजय पवार यांच्या पश्चात आई, एक विवाहित व एक अविवाहित मुलगी तसेच एक मुलगा आणि भाऊ आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  2 PM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सAaditya Thackeray on Fadnavis : महाराष्ट्रद्वेष्टे फडणवीस मुख्यमंत्री बनू शकत नाही - आदित्य ठाकरेAjit Pawar Interview : लोकसभेतील पराभव ते विरोधकांची खेळी; ए टू झेड, अजितदादांनी सगळंच काढलंDevendra Fadnavis on Uddhav Thackeray : धारावी टेंडरच्या अटी ठाकरेंनीच ठरवल्या - देवेंद्र फडणवीस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : रोहित तुम्हाला कुणी एकटं पाडत नाही, काळजी करत बसू नका, तुमच्यामागं युवकांची मोठी ताकद : शरद पवार
काही झालं तरी चालेल पण 400 जागा मोदींच्या हातात द्यायच्या नाहीत हा निकाल घेतला, राज्य त्यांचं आलं पण.. : शरद पवार
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
मुंबईतील बीकेसी मेट्रो स्टेशनला भीषण आग; अंडरग्राऊंडमधून प्रवाशांना बाहेर काढले
Sharad Pawar: वाट्टेल ते होऊ दे, पण  राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; आर.आर. आबांच्या लेकाच्या मतदारसंघातून शरद पवारांचा एल्गार
वाट्टेल ते होऊ दे, पण राज्याची सत्ता फडणवीसांच्या हातात जाऊन द्यायची नाही; शरद पवारांचा एल्गार
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
24 तारखेपासून रक्त सांडावं लागलं तरी चालेल, पण संजयकाका पाटलांची गुंडशाही मोडीत काढल्याशिवाय राहणार नाही; रोहित पाटलांची शरद पवारांसमोर 'डरकाळी'
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
त्यावरुन देवेंद्र फडणवीसांनी ओळखलं पाहिजे माझं स्थान काय आहे; शरद पवारांचा पलटवार
Ladki Bahin Yojana : कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
कोल्हापुरात महायुतीच्या नेत्यांमध्ये पंधराशेसाठी लाडक्या बहिणींना धमकावण्याची अन् 500 रुपयात घर चालवायला 'बौद्धिक क्लास' देण्याची स्पर्धाच लागली!
Baglan Vidhan Sabha Constituency : बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
बागलाणमध्ये दिलीप बोरसेंसमोर दीपिका चव्हाणांचं तगडं आव्हान, कोण उधळणार विजयाचा गुलाल?  
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
उद्धव ठाकरेंच्या नाशिक दौऱ्याआधीच पोलिसांचा मोठा निर्णय; ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या बड्या नेत्यांना थेट तडीपारीची नोटीस
Embed widget