Ranjeetsinh Nimbalkar : महिलांनी पाय धुतले, दृष्ट काढली अन् दुग्धाभिषेक केला; फलटण प्रकरणात आरोप झालेल्या रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर
Satara Doctor Suicide: सुषमा अंधारेंनी आपल्यावर जे आरोप केले ते त्यांच्या मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून केले. पण प्रश्न विचारला म्हणून मी मागे हटणारा नाही असं माजी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनी म्हटलं.

सातारा : आपल्यावर करण्यात आलेले आरोप हे मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन करण्यात आले आहेत, मी नार्को टेस्टला तयार आहे, माझ्यावर आरोप करणाऱ्यांनीही तयार व्हावं नाहीतर निंबाळकर नाही असं जाहीर करावं असं आव्हान माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी (Ranjeetsinh Nimbalkar) रामराजे निंबाळकरांना (Ramraje Naik Nimbalkar) दिलं. मला गोळी घातली तरी चाललं असतं, पण किती बदनामी करता? असा सवालही त्यांनी विचारला. फटलणच्या महिला डॉक्टरच्या आत्महत्येनंतर (Phaltan Doctor Suicide)सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी रणजितसिंह निंबाळकरांवर आरोप केले. त्याला रणजितसिंह निंबाळकरांनी जाहीर सभेतून उत्तर दिलं.
यावेळी उपस्थित महिलांनी रणजितसिंह निंबाळकरांचे पाय धुतले, त्यांची दृष्ट काढली आणि नंतर त्यांचे दुग्धाभिषेक केलं. या कृत्याने भारावलेल्या रणजितसिंह निंबाळकरांना अश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं.
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, "आपल्याला बदलाव आणायचा आहे, बदला घ्यायचा नाही. तालुक्यातील 60 टक्के जनता आपल्यासोबत आहे. मुख्यमंत्र्यांना कोणत्याही रिपोर्टची गरज नव्हती. मी त्यांना मातीसाठी भेटलो, काही वैयक्तिक मागितले नाही. चॅलेंज दिल म्हणून मी बोलत आहे. चॅलेंज कुणाला देताय? विधान परिषदेच्या आमदारामुळे तालुक्याची बदनामी झाली. शेर को धमका सकते हो, डरा नहीं सकते. मी नार्को टेस्ट करायला तयार आहे. माझ्यावर आरोप करणारे तयार आहेत का?"
ज्या मुकादमावर आम्ही गुन्हा नोंद केला, त्याचे मेडिकल हे संपदा मुंडे यांनी केलं नाही. आता तो सगळ्यांना सांगतोय की त्याचे मेडिकल मुंडेंनी केलं म्हणून असा आरोप निंबाळकरांनी केला.
Ranjeetsinh Nimbalkar On Ramraje Nimbalkar : मास्टरमाईंडच्या सांगण्यावरुन आरोप
रणजीतसिंह नाईक निंबाळकर काही महिन्यांपूर्वी चांगला होता. मग आता काय झालं? आपण मनोमिलन करू असं म्हणत रामराजे यांचे 50 फोन आले. सुषमा ताईंनी 277 केसेस असल्याचं सांगितले. ताईंचा दोष नाही. त्यांनी मास्टरमाईंडच्या सांगण्यावरून माझ्यावर आरोप केले असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.
माझा खून झाला असता तरी चाललं असतं, पण मास्टरमाईंडने मला लोकसभेत तिकीट मिळू नये म्हणून प्रयत्न केले. आगवणे यांच्या मुलीला आत्महत्या करण्याचं नाटक करायला लावलं आणि स्वतःच्याच हॉस्पिटलमध्ये येऊन त्यांना अॅडमिट केलं. मला गोळी घातली असती तरी चाललं असत, पण किती बदनाम करायचं? असा प्रश्न निंबाळकरांनी विचारला.
तुम्ही म्हणता पुतळा बांधणार, आम्ही बांधू लागतो. शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा, साईबाई यांचे पुतळे बांधले का? पण हे मगरमच्छचे अश्रू आहेत. त्या कुटुंबीयांबद्दल यांना कोणतीही सहानुभूती नाही असं रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले.
Ranjeetsinh Nimbalkar Phaltan Speech : तीन भावांनी फलटणचे नाव खराब केलं
रणजितसिंह निंबाळकर म्हणाले की, "बहिणीच्या चारित्र्यावर संशय नको म्हणून मी बोललो नाही. तीन-चार दिवस झालं काहीच बोललो नाही म्हणून मी म्हटलं की आपण बोललं पाहिजे. नाहीतर माझ्यावर संशय वाढायचा. तिन्ही भावांनी फलटणचे नाव खराब केलं. आम्ही बापजाद्यांच्या पैशावर जगलो नाही. या तिघांनाही बोलवा आणि आमच्या चौघांचीही नार्को टेस्ट करा. तुम्ही म्हणाल ती वेळ, तुम्ही म्हणाल तो डॉक्टर. सगळ्यांची लाईव्ह डिटेक्टर चाचणी करा, पैसे मी भरायला तयार आहे. मेहबूब शेख आणि सुषमा अंधारे यांनाही बोलवा. मी जर दोषी असेन तर तुरुंगात जाईन."
Ranjeetsinh Nimbalkar Speech : पीडितेला न्याय मिळवून देणार
माझं जाहीर आमंत्रण आहे, कधी येताय? जर हे आले नाहीतर काय करायचं? आज दिलेलं आव्हान स्वीकारा, नाहीतर नाईक निंबाळकर नाही म्हणून सांगा असं आव्हान रणजितसिंह निबाळकर यांनी दिलं. माफीच्या आडून जर पुन्हा आरोप झाले तर मी तुम्हाला 277 केसेस करून दाखवतो. 78 व्या वर्षी मी त्यांना जेलमध्ये बसवणार नाही. त्यांना चक्की पिसिंग करून देणार नाही. पीडितेला न्याय मिळाला पाहिजे ही माझी कालही भूमिका होती आणि आजही आहे. हीच भूमिका उद्याही असणार आहे असंही ते म्हणाले
ही बातमी वाचा:
























