Pramod Jadhav Satara: मुलीच्या जन्मानं आनंद तर दुसरीकडे बापाला अपघातानं हिरावलं; स्ट्रेचरवरील बाळंतिणीने फिरवला नवऱ्याच्या चेहऱ्यावर शेवटचा हात, मन हेलावून टाकणारं दृश्य
Pramod Jadhav Satara death: सिकंदराबाद श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या जवानाचा साताऱ्यामध्ये अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

Satara Accident: भारतीय सैन्य दलात (Indian Army) कार्यरत असलेला जवान (Soldier) पत्नीच्या डिलिव्हरीसाठी सुट्टीवर गावी आला असतानाच त्यांचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यातील दरे येथे घडली. (Satara News) सिकंदराबाद–श्रीनगर येथे भारतीय सैन्य दलात सेवा बजावणारे सातारा तालुक्यातील दरे गावचे वीर जवान प्रमोद परशुराम जाधव यांचा अपघातात (Satara Accident) जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेने दरे गावासह संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे. जाधव यांच्या घरी आनंदाचा क्षण शोकामध्ये बदलून गेला. पत्नीला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर जवान प्रमोद जाधव यांनी तिला रुग्णालयात दाखल केले. प्रसूतीसाठी आवश्यक औषधी आणण्यासाठी ते मेडिकलकडे निघाले; पण ते परत रूग्णालयात आलेच नाहीत. रुग्णालयाकडे परत येत असताना त्यांचा अपघातात जागीच मृत्यू झाला. या मन हेलावणाऱ्या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
प्रमोद जाधव यांच्या पत्नीने ऋतुजा हिने शनिवारी सकाळी एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिच्या येण्याने सर्वत्र आनंद असायला हवा होता; पण त्याच वेळी कोणीतरी धाडस करून त्यांच्या पत्नीला सांगितले गेले की, तुमच्या पतीचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्या माहितीनं तिची अवस्था आभाळ फाटल्यासारखी झाली.
Satara Accident: आठ तासांची लेक; ना बापाने लेकीला पाहिलं ना लेकीनं बापाला
बाळंतीण ऋतुजाला सावरण्यासाठी नर्स, गावकरी आणि नातेवाईक पुढे आले. त्यांनी तिला स्ट्रेचरवरून गावात आणलं. अवघ्या आठ तासांच्या चिमुकल्या लेकीलाही तिच्या वडिलांना अखेरचा निरोप दिला. पत्नी ऋतुजाचा स्ट्रेचर पतीच्या पार्थिवाजवळ ठेवला. थरथरत्या हाताने तिने पतीच्या चेहऱ्यावरून अखेरचा हात फिरवला. तो क्षण पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेलं. तो क्षण उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आणणारो होता. प्रमोद जाधव हे लेह-लडाख येथे भारतीय सैन्यात हवालदार पदावर कार्यरत होते. सातारा जिल्ह्यातील दरे येथे शनिवारी जवान प्रमोद जाधव यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी आठ तासांची ओली बाळंतीण पत्नी ऋतुजाला स्ट्रेचरवरून आणले होते. हे दृश्य मन हेलावून टाकणारं होतं.
Satara Accident: आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले
प्रमोद जाधव यांना आई नसल्याने तेच आपल्या पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान, कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेला नव्या जीवाचा आनंद, या दोन्ही गोष्टींना कुटुंबीय हादरून गेले.
Satara Accident: काही तासापूर्वीच जन्मलेल्या चिमुकलीनेही घेतले अंत्यदर्शन
अंत्ययात्रा अंत्यविधीच्या ठिकाणी पोहोचल्यानंतर प्रमोद जाधव यांची पत्नी आणि काही तासांपूर्वीच जन्मलेली चिमुकली मुलगी पित्याच्या अंत्यदर्शनासाठी आणण्यात आली होती. नवजात बालिकेने घेतलेले वडिलांचे अखेरचे दर्शन पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, अनेकांना अश्रू अनावर झाले. शासकीय इतमामात वीर जवान प्रमोद जाधव यांना मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी प्रशासनातील अधिकारी, माजी सैनिक, ग्रामस्थ आणि नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेसाठी सदैव तत्पर असलेल्या या वीर जवानाच्या अकाली जाण्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.






















