एक्स्प्लोर

Phaltan Doctor Death: पोलीस अधीक्षक तुषार दोशींनी 'ती'चं चारित्र्यहनन केलं, मृत डॉक्टर प्रकरणात सुषमा अंधारेंचा गंभीर आरोप; 'अंतरवाली सराटी'चं कनेक्शन सांगत म्हणाल्या...

Phaltan Doctor Death: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात आक्रमक भूमिका घेतली आहे.

Phaltan Doctor Death: शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणात (Phaltan Doctor Death) आक्रमक भूमिका घेतली आहे. मृत महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी सुषमा अंधारेंनी फलटणमध्ये पोलीस स्टेशनवर मोर्चा काढला. त्यावेळी एसपी तुषार दोशी (Tushar Doshi) भेटले नसल्याने अंधारे आक्रमक झाल्या आणि त्यांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या मांडला. डीवायएसपी खांबे यांनी सुषमा अंधारे यांच्याशी बातचीत केली. यावेळी सुषमा अंधारे यांनी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मृत महिलेला न्याय मिळवून देण्याऐवजी तिचं चारित्र्यहनन करण्यात आलं,” असा थेट आरोप अंधारेंनी केला. 

Phaltan Doctor Death: एसपी तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही?

फलटण पोलिस ठाण्यासमोर आंदोलन करताना सुषमा अंधारेंनी संताप व्यक्त केला. “जर तपासातील माहिती जाहीर करता येत नाही असं पोलिसांचं म्हणणं असेल, तर रुपाली चाकणकरांनी त्या महिलेचे चॅट्स कसे जाहीर केले? आणि त्यावेळी त्यांच्या बाजूला बसलेल्या एसपी तुषार दोशींनी त्यांना का अडवलं नाही?” असा सवाल करत अंधारेंनी दोशींवर थेट चारित्र्यहननाचा आरोप केला. तुषार दोशी हे नावाप्रमाणे वागले आणि त्यांनी मृत डॉक्टरचे ठरवून चारित्र्यहनन केलं का? फलटण पोलीस ठाणे छळछावणी झाली आहे. माझा आक्षेप पोलीस अधीक्षक तुषार दोशींवर आहे. अश्विनी बिद्रे प्रकरणात त्यांनी जे केलं ते अंतरवाली सराटीतही केले. त्यामुळे त्यांच्या तपासावर आमचा विश्वास नाही, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी संताप व्यक्त केला.  

Sushma Andhare on Jaykumar gore Rupali Chakankar: गोरे, चाकणकरांनी आधी स्वतःचं चारित्र्य बघावं 

या प्रकरणात मंत्री जयकुमार गोरे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यावरही सुषमा अंधारेंनी निशाणा साधला. “जयकुमार गोरे कोण आहेत त्या महिलेचं चारित्र्य ठरवणारे? आधी त्यांनी स्वतःचं चारित्र्य पाहावं. तपासातील गोष्ट तपास अधिकारीही सांगू शकत नाहीत, मग चाकणकर त्या गोष्टी उघड कशा करू शकतात?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

Sushma Andhare: सहा जणांवर आरोपपत्र दाखल करण्याची मागणी

अंधारेंनी पुढे सांगितले की, “या प्रकरणात ज्यांची नावं आली आहेत त्या सहा जणांची चौकशी करा. डीवायएसपी राहुल धस, एपीआय जायपात्रे, माजी खासदारांचे पीए शिंदे आणि नागटिळक, पोलीस उपनिरीक्षक पाटील आणि मेडिकल अधिकारी अंशुमन धुमाळ. मग या लोकांवर आरोपपत्र का दाखल केलं नाही? पोलिस विभाग त्यांना वाचवत आहे का?” असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

आणखी वाचा

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sachin Sawant : फडणवीसांचा मेट्रोमध्येबसून मुलाखत,निवडणूक आयोग कारवाई करणार का?
Nawab Malik PC BMC Election : नवाब मलिक 3 वर्षांनी मैदानात, पहिला हल्ला फडणवीसांवर UNCUT PC
Parbhani Election : परभणी शहरातील एकनाथ नगरवासीयांनी टाकला मतदानावर बहिष्कार
Ravi Landge Nagarsevak : दबाव, अर्थकारण अन् डावपेच? दोन वेळा बिनविरोध; रवी लांडगेंनी सगळं सांगितलं?
Sanjay Raut VS Rahul Narvekar : अध्यक्ष प्रचारात, राजकारण जोमात; राऊतांचे राहुल नार्वेकरांवर गंभीर आरोप Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
रायगडच्या ताम्हिणी घाटात दिवसभरात दोन अपघात, बस डोंगरावर धडकली; कार दरीत कोसळून एक ठार
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
संभाजीनगरचा गड कोण राखणार? भाजप की शिवसेनेचा भगवा फडकणार, एमआयएम अन् ठाकरेंच्या शिवसेनाला किती जागा?
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
त्याला परदेशात जायला कोणी मदत केली? पासपोर्ट कोणी दिला? अजित पवारांचा मंत्री मोहोळांवर पलटवार
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
 ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 02 जानेवारी 2026 | शुक्रवार 
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
भिवंडीत भाजपचे 6 बिनविरोध, शिवसेना-मनसे युतीही फिस्कली; अर्ज मागे घेण्याच्यादिवशी फुल्ल राजकारण
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याला संपवलं; भाजपच्या दोन गटात राडा, मोठा बंदोबस्त तैनात
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
भाजप काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले, दोन गटात हिंसक झडप; एकाचा जीव गेला, आमदारासह 11 जणांवर गुन्हा
Ajit Pawar : मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
मोठी बातमी : भाजपची राक्षसी भूक पाहवत नाही, मनपा भ्रष्टाचाराने पोखरल्या, लुटारुंच्या टोळ्या वाढला, अजितदादांनी पिंपरीत वात पेटवली
Embed widget