एक्स्प्लोर
Advertisement
कराडमध्ये आज मराठा आरक्षणासाठी एल्गार; सकल मराठा समाजाकडून विराट मोर्चाचे आयोजन
Maratha reservation protest live update : या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती करण्यात आली आहे, त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्चाला उपस्थित राहातील असा देखील दावा करण्यात आला आहे.
कराड (जि. सातारा) : सकल मराठा समाजाकडून आज (30 ऑक्टोबर) कराडमध्ये मराठा आरक्षणासाठी विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. अंतरवाली सराटीत सुरू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कराड शहरातील दत्त चौकातून या मोर्चाला सुरुवात होणार आहे. या मोर्चाला कराड आणि संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने मराठा समाजातील बांधव येणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे. या मोर्चासाठी गावोगावी जनजागृती करण्यात आली आहे, त्यामुळे लाखोंच्या संख्येने मराठा समाज मोर्चाला उपस्थित राहातील असा देखील दावा करण्यात आला आहे. या मोर्चानंतर सकल मराठा समाज तहसीलदारांना आपल्या मागण्यांचे निवेदन देणार आहे.
मोर्चाचा मार्ग नेमका कसा असेल?
- कराडमधील दत्त चौक इथं असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं जाणार. त्यानंतर या मोर्चाला सुरुवात होईल.
- तिथून तो आझाद चौक मार्गे चावडी चौकात येईल. तिथून कन्या शाळा, जोतिबा मंदिर पासून हा मोर्चा डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आल्यानंतर आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले जाणार.
- पुढे महात्मा जोतीराव फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून कराड तहसीलदार कार्यालयासमोर मोर्चा येईल तिथं सकल मराठा समाजाच्या वतीने तहसीलदार यांना आपल्या मागण्याचे निवेदन सादर केले जाईल.
सकल मराठा समाजाने या मोर्चासाठी आचारसंहिता केली आहे
- मोर्चा होईपर्यंत स्वयंस्फूर्तीने पाणी आणि अन्नत्याग करावा
- कोणत्याही समाजाविरोधात घोषणा देण्यात येवू नये
- व्यसन न करता मोर्चात सहभागी होवू नये
- मोर्चात कोणीही हुल्लडबाजी किव्हा धक्काबुक्की करू नये.
- स्वयंशिस्त राखून मोर्चात पोलिसाना सहकार्य करावे.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
क्राईम
Advertisement