(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mahabaleshwar Weather : महाराष्ट्राचे 'मिनी काश्मीर' धुक्यात हरवलं; थंडीचा कडाका वाढला, स्ट्रॉबेरीला फटका बसण्याची शक्यता
Weather Updates : महाराष्ट्राचे (Maharashtra) मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये तापमान (Mahabaleshwar Temperature) चांगलेच घसरले आहे. महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Mahabaleshwar Weather : राज्याच्या विविध भागात थंडीचा जोर (Cold Weather) कायम आहे. बहुतांश जिल्ह्यात थंडीचा पारा 15 अंशाच्या खाली घसरला आहे. थंडीचा कडाका वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. अशातच महाराष्ट्राचे (Maharashtra) मिनी काश्मीर समजले जाणारे महाबळेश्वरमध्ये तापमान (Mahabaleshwar Temperature) चांगलेच घसरले आहे. महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तसेच, वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
Large Crowd of Tourists : वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, पर्यटकांची मोठी गर्दी
महाबळेश्वरमध्ये गेल्या आठ दिवसांपासून तापमान खालावल्याचे पाहायला मिळत आहे. गेल्या आठ दिवसापूर्वी सलग पाच दिवस या भागातील दवबिंदू गोठल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. काल रात्री या परिसरात तापमान घसरले असताना आता सकाळी वेण्णालेक भागात 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर महाबळेश्वरमध्ये 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान, या वाढत्या थंडीत देखील महाबळेश्वरमध्ये मोठ्या संख्येनं पर्यटक दाखल झाले आहेत. या पर्यटकांना थंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
Strawberry Crop : थंडी अशीच राहिली तर स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता
महाबळेश्वरमध्ये तापमानात सातत्यानं घसरण होत आहे. त्यामुळं थंडी वाढली आहे. दरम्यान, या थंडीचा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे. थंडीचा जोर असाच राहिला तर महाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी पिकाला फटका बसण्याची शक्यता आहे. कारण वाढत्या थंडीमुळं स्ट्रॉबेरी फळावर काळे डाग येण्याची शक्यता दाट असते. त्यामुळं स्ट्रॉबेरीचा दर्जा घसरतो. त्यामुळं बाजारात शेतकऱ्यांना अपेक्षीत असा दर मिळत नाही. परिणामी मोठा फटका बसतो.
27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा अंदाज
राज्यात सातत्यानं हवामानत बदल (Climate Change) होत आहे. कुठे थंडीचा कडाका (Cold Wave) तर कुठे ढगाळ वातावरण आहे. या हवामानातील चढ-उताराचा नागरिकांना त्रास होत आहे. तसेच, याचा शेती पिकांवर (Agriculture Crop) देखील परिणाम होताना दिसत आहे. अशातच हवामान विभागाकडून (Meteorological Department ) 27 जानेवारी ते 2 फेब्रुवारी दरम्यान राज्यात पावसाचा (Rain) अंदाज देण्यात आला आहे. राज्यातील मराठवाडा (Marathwada) आणि विदर्भात (Vidarbha) हलका ते मध्यम पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबतची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर (Krishnanand Hosalikar) यांनी ट्वीट करुन दिली आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: