एक्स्प्लोर

Police Officer Transfer : मोठी बातमी, सातारा अन् ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्थगिती, काही तासातचं पहिल्या निर्णयाला ब्रेक

Satara Police : सातारा पोलीस दलाचे अधीक्षक समीर शेख आणि ठाण्याचे पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांच्या बदलीला स्टे देण्यात आला आहे.

सातारा : राज्याच्या गृह विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या पोलीस दलातील भारतीय पोलीस सेवेतील (IPS) 17 पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आल्या होत्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नियमांनुसार पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. यामध्ये सातारा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक समीर शेख (Sameer Shaikh) आणि ठाणे येथील पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांची देखील बदली करण्यात आली होती. समीर शेख यांची मुंबई पोलीस दलात उपायुक्त पदावर बदली करण्यात आली होती. तर, सुधाकर पठारे हे सातारा जिल्ह्याचे नवे पोलीस अधीक्षक झाले असते. मात्र, सरकारनं बदल्यांचा शासन निर्णय जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांमध्येच या दोघांच्या बदल्यांना स्थगिती देण्यात आली आहे. 

समीर शेख, सुधाकर पठारेंच्या बदलीला स्थगिती का?

राज्यातील 17 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. त्यानंतर अवघ्या काही तासात बदलीला स्थगिती देण्यात आल्याचं पत्र जाहीर करण्यात आलं.   केंद्रीय महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण न्यायालय यांचे आदेश तसेच निवडणुकीची आदर्श आचारसंहिता विचारात घेऊन तात्काळ  सुधाकर पठारे, पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर आणि समीर अस्लम शेख, पोलीस अधीक्षक सातारा यांना पुढील आदेशापर्यंत कार्यमुक्त करण्यात येऊ नये, असं कळवण्यात आलं आहे. 

अगोदर बदली नंतर स्थगिती

राज्य सरकारच्या गृह विभागाकडून सुधाकर पठारे आणि समीर शेख यांची बदली करण्यात आल्याची घोषणा केल्यानंतर काही वेळातचं पुन्हा या दोघांच्या बदलीला स्थगिती देण्यात आली. कायदेशीर बाबींचा विचार करुन या दोघांच्या बदलीला स्थगिती देण्यात आलेली आहे. अगोदर बदली अन् नंतर स्थगिती याबाबत चर्चा सुरु आहेत.

अधिकाऱ्याचं नाव, कुणाची बदली कुठं झाली

अतुल कुलकर्णी, पोलीस अधीक्षक धाराशिव येथून  पोलीस अधीक्षक , सोलापूर ग्रामीणला बदली

श्रीकृष्ण कोकाटे, पोलीस अधीक्षक, हिंगोली

अनुराग जैन, पोलीस उप आयुक्त नागपूर शहर येथून पोलीस अधीक्षक हिंगोली पदावर बदली 

विश्व पानसरे , गुन्हे अन्वेषण विभाग, पोलीस अधीक्षक पदावरून पोलीस अधीक्षक, बुलढाणा पदावर नियुक्ती 

शिरीष सरदेशपांडे, पोलीस अधीक्षक ग्रामीण, सोलापूर येथून लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे  पोलीस अधीक्षक पदी बदली

संजय वाय जाधव, अपर पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक धाराशिव येथे बदली

कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली येथून पोलीस अधीक्षक यवतमाळ पदी बदली. 

आंचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा येथून समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र 1 येथे बदली. 

नंदकुमार ठाकूर, प्राचार्य पोलीस प्रशिक्षक केंद्र दौंड,

निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक नंदुरबार येथून  प्राचार्य, पोलीस प्रशिक्षण केंद्र, दौंड

पवन बनसोड, पोलीस अधीक्षक यवतमाळ येथून राज् गुन्हे अन्वेषण विभागाच्या, कार्यालयात बदली. 

नुरुल हसन, वर्धा पोलीस अधीक्षक पदावरुन समादेशक राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 11 , नवी मुंबईत बदली 

अमोल तांबे , पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथून पोलीस अधीक्षक, दक्षता अधिकारी, पुणे महानगर  प्रदेश विकास प्राधिकरण येथे बदली

मनीष कलवानिया, पोलीस उप आयुक्त मुंबई शहर पदी नियुक्ती

संंबंधित बातम्या :

IPS Transfer : राज्यातील 17 IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या, वाचा यादी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange: आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला
आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला
Mangal Gochar 2024 : ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
Budh Uday 2024 : धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत
धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  9 AM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 22 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaMajha Gaon Majha Jilha : माझं गाव माझा जिल्हा: 8 AM :  22 ऑक्टोबर 2024 : ABP MajhaABP Majha Headlines :  8 AM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Manoj Jarange: आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला
आंतरवाली सराटीत मध्यरात्रीच्या गाठीभेटी सुरुच, शरद पवार गटाचा नेता आणि दानवेंचा विरोधक मनोज जरांगेंच्या भेटीला
Mangal Gochar 2024 : ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
ब्रम्हांडात प्रथमच मंगळाचं 158 दिवस नीच स्थितीत भ्रमण; 'या' 3 राशींचं नशीब पालटणार, सुख-संपत्तीत होणार अपार वाढ
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
मोठी बातमी : सलमान खानला पनवेलच्या फार्महाऊसवर मारण्याचा प्लॅन, गार्डसोबत मैत्री; शार्प शुटरचा धक्कादायक खुलासा
Budh Uday 2024 : धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत
धनत्रयोदशीच्या आधीच बुधाचा उदय; 3 राशींचा 'गोल्डन टाईम' होणार सुरू, पदोपदी धनलाभाचे संकेत
Milind Narvekar wishes Amit Shah: ठाकरे आणि भाजपमध्ये हातघाईची लढाई अन् मिलिंद नार्वेकरांच्या अमित शाहांना शुभेच्छा, चर्चांना उधाण
ठाकरे आणि भाजपमध्ये हातघाईची लढाई अन् मिलिंद नार्वेकरांच्या अमित शाहांना शुभेच्छा, चर्चांना उधाण
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
पॅकबंद बॉक्स, कारमध्ये 5 कोटींची कॅश; शिवापूर टोलनाक्यावर सापडलेली गाडी कोणाच्या नावावर?, बड्या नेत्यावर आरोप
Shani Gochar 2024 : शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा
शनीच्या शश योगाचा 'या' 3 राशींवर होणार भयंकर परिणाम; ऐन दिवाळीत सावध राहण्याचा इशारा
Sanjay Raut : मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
मिंधे यांनी निवडणुकीसाठी प्रत्येक उमेदवारास 75 कोटी पाठवले, 15 कोटीचा पहिला हप्ता! काय बापू, किती हे खोके? संजय राऊतांचा हल्लाबोल
Embed widget