एक्स्प्लोर

Koyna Dam : कोयना धरणाचा पाणीसाठा अर्धशतकाच्या जवळपास; 24 तासांत झालेल्या मुसळधार पावसाने पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ

Koyna Dam : गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने कोयना धरणात जलाशयाच्या एकूण पाणीसाठ्यात साडेतीन टीएमसी पाणीसाठी वाढला आहे. पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे.

Koyna Dam : राज्यात मुसळधार पावसाने (Heavy Rain) हजेरी लावली आहे. त्यामुळे राज्यातील धरणामधील (Dam) पाणी साठ्यामध्ये काही प्रमाणात वाढ झाल्याचं दिसून येत आहे. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट (Koyna Dam) क्षेत्रात देखील पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या 24 तासांत झालेल्या पावसाने कोयना धरणात (Koyna Dam) जलाशयाच्या एकूण पाणीसाठ्यात साडेतीन टीएमसी पाणीसाठी वाढला आहे. पावसामुळे कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्यानं वाढ होत आहे. 

कोयना धरणातील (Koyna Dam) एकूण पाणीसाठा 48.65 टीएमसी इतका झाला असून, कोयना धरण लवकरच 50 टक्के भरण्याची शक्यता आहे. कोयना धरण परिसरातील गेल्या 24 तासांच्या पावसाने कोयणा धरणात (Koyna Dam) झपाट्याने वाढ झाली आहे. 24 तासांमध्ये धरणातील पाणासाठी 4 टीएमसीने वाढला आहे. प्रती सेकंदाला धरणात 42 हजार क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरण परिसरात गेल्या 24 तासात 127 मिलिमिटर पावसाची नोंद  झाली आहे. तर महाबळेश्वर परिसरात 158 मिलिमिटर पावसाची नोंद झाली आहे. 

कोयना धरण परिसरामध्ये बुधवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढला होता. त्यानंतर गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत होता. दोन दिवस झालेल्या जोरदार पावसाने कोयना धरणातील पाणीसाठ्यामध्ये वेगाने वाढ झाली आहे. जलाशयात प्रतिसेकंद ४० हजार ४६२ क्युसेक पाण्याची आवक होत आहे. कोयना धरणाचा एकूण पाणीसाठा 48.65  टीएमसी झाला असून, धरणाचा पाणीसाठा जवळपास 50 टक्क्यांपर्यंत येऊन पोहचला आहे.

साताऱ्यात सध्या तुरळक सरी

सातारा जिल्ह्याच्या गेल्या तीन ते चार दिवसात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यामुळे कृष्णा, कोयनासह सर्व नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. तसेच महाबळेश्वर तालुक्यातील ओढे आणि नाले वाहू लागले आहे. सध्या सातारा जिल्ह्यात तुरळक सरी कोसळत आहेत.

राज्यातील या भागात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या अंदाजानुसार (IMD), आज कोकणातील रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा (Heavy Rain) ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात देखील पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भातील यवतमाळ, नागपूर, वर्धा, अमरावती आण अकोला या चार जिल्ह्यांमध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आज मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, नाशिक, धुळे, जळगाव तसेच मराठवाज्यातील काही जिल्ह्यांसह विदर्भात देखील पावसाचा (Heavy Rain) यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीमवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आलं आहे. 

एबीपी माझाच्या स्थापनेपासून कार्यरत, 22 वर्षाच्या पत्रकारीतेचा अनुभव, व्यंगचित्रकार म्हणून सुरवात!
Read More

महत्त्वाच्या बातम्या

तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget