एक्स्प्लोर

Udayanraje Bhosale : तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही; धर्मांध राजकारणावर उदयनराजे भोसले यांचा कडाडून प्रहार

Udayanraje Bhosale : आपण प्रगती करतो आहोत, ही प्रगती आहे का? जर प्रगती करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराने जावे लागेल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले.

Udayanraje Bhosale : वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक एकमेकांशी बोलायचे बंद झाले आहेत, आणि आपण म्हणतो आहे 21 व्या शतकात आहे. आपण प्रगती करतो आहोत, ही प्रगती आहे का? जर प्रगती करायची असेल तर शिवाजी महाराजांच्या विचाराने जावे लागेल, असे स्पष्ट मत खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. छत्रपती शाहू महाराजांच्या 273 व्या स्मृतिदिनानिमित्त सातारमध्ये कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले उपस्थित होते. यावेळी शिवाजी महाराजांचे शिल्प देऊन उदयनराजे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना उदयनराजे यांनी धर्मांध राजकारणावर कडाडून प्रहार केला. उदयनराजे म्हणाले की, थोर पुरुष होते म्हणून आपण लोकशाहीत वावरतो आहे. ते नसते, तर आपण गुलामगिरीत असतो. परंतु, त्यांची बदनामी केली जाते त्याचे वाईट वाटते. थोर पुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विकृतीत वाढ झाली आहे. शिवाजी महाराजांच्या विचारांचा विसर होत चाललेला आहे. स्वार्थापोटी तेढ निर्माण केली जात आहे. 

Udayanraje Bhosale : तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही

ते पुढे म्हणाले, घराणेशाहीमुळे विकेंद्रीकरण लांबच राहिले, फक्त भाषणात विकेंद्रीकरण असतं. बाकी सगळीकडे केंद्रीकरण आहे. जर हे केंद्रीकरण असेच सुरू राहिलं, तर देशाचे 29 तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. शिवाजी महाराज नसते, तर लोकशाहीचे तुकडे व्हायला किती वेळ लागला असते. सर्वधर्मसमभावाची राज्यकर्त्यांनी व्याख्या बदलून टाकली, हे घातक आहे. जेव्हा तुकडे होतील तेव्हा प्रत्येकाला त्याची किंमत मोजावी लागेल. जशी देशाची वाताहत होईल तशी आपल्या कुटुंबाची देखील वाताहत होणार असल्याचे उदयनराजे (Udayanraje Bhosale) म्हणाले. 

Udayanraje Bhosale : सर्वधर्मसमभावाची संकल्पनेचा विसर पडला 

उदयनराजे यांनी धर्मांध राजकारणावर कडाडून प्रहार केला. ते म्हणाले, सर्वधर्मसमभाव संकल्पनेचा विसर पडला असल्याने समाजात तेढ निर्माण होत आहे. आपण इस्लामिक देश पाहिले, तर तिथं राजेशाही आहे. शिवाजी महाराजांना वाटलं असते राजेशाही ठेवावी, तर आज आपल्याकडे राजेशाही असते. परंतु, शिवाजी महाराजांना वाटलं की लोकांचा सहभाग हवा आहे. 

उदयनराजे (Udayanraje Bhosale) पुढे म्हणाले, शिवाजी महाराज संभाजी महाराज यांचा विचार जास्तीत जास्त लोकांमध्ये रुजवला पाहिजे. ही आताची गरज आहे. थोर पुरुषांचे विचार फक्त एका दिवशी न घेता कायम घेतले पाहिजेत. देशाचे तुकडे करण्याचा काही लोकांनी विडा उचलला आहे. त्यांचा विचार हणून पाडू, आज जगात सांगावं लागत नाही की छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत. त्यांचा विचार घेऊन अनेक चळवळी उभा राहिल्या. देशाची प्रगती म्हणजे काय? प्रत्येकाची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. राज्याची प्रगती म्हणजे देशाची प्रगती. महाराजांच्या विचारांचा विसर पडला तर प्रगतीची 'काशी' होईल. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
सातारा जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवरुन राजकारण तापलं, सोसायटी ठरावावरुन कराडमध्ये दोन गटात जोरदार हाणामारी, 10 जणांवर गुन्हा दाखल
Satara Crime: पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
पुणे बेंगलोर महामार्गावर कराड तालुक्यात मध्यरात्री थरार; अंदाधुंद गोळीबारात एक गंभीर जखमी, पैशाचा वाद की भाईगिरीतू गँगवॉर?
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या
3 महिलांसह बनावट पोलीस, रात्रीची नाकाबंदही लावली; माऊलींच्या पालखीपूर्वी सातारा पोलिसांची कारवाई, 7 जणांना बेड्या

व्हिडीओ

Devendra Fadnavis & Delhi : दिल्ली दूर... महाराष्ट्र मंजूर! | Special Report ABP Majha
Sanjay Shirsat Meet Abhijeet Dipke Family : शिरसाट-दिपके भेटीमागचा अर्थ काय? | Special Report
Abhijeet Dipke JantarMantar: धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा, दिपके म्हणाले, कॉक्रोचसे पंगा नहीं लेना
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा प्रहार, झुकलं सरकार, A to z स्टोरी
Dharmendra Pradhan Resing CJP : झुरळांचा लढा, सरकारला लढा Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Melghat Food Poisoning : मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
मेळघाटात आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ, टिटंबानंतर आता बिजुधावडी आश्रमशाळेत 50 विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा
E20 Janta Party : 'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, नितीन गडकरींवर निशाणा
'कॉकरोच'च्या यशानंतर आता ई 20 जनता पार्टी स्थापन, इथेनॉल नको म्हणत 100 टक्के शुद्ध पेट्रोलसाठी उपोषण, काहीच वेळात लाखो फॉलोअर्स
Aditi Tatkare : लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
लाडक्या बहिणींनी 1500 रुपये शॉपिंगवर खर्च करू नये, भविष्यासाठी बचत करावी; आदिती तटकरेंचा सल्ला
Iran War Live Update: इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
इराणवरील सर्वात मोठ्या हल्ल्यापासून ट्रम्प यांची सपशेल माघार, लष्कराला कारवाई थांबवण्याचे निर्देश
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
पोटाला सहा वर्षाला लेक, महिला टीचर ट्यूशनला येणाऱ्या 20 वर्षाच्या पोरासोबत रंगेहाथ सापडली; नवऱ्याला म्हणाली, तुला घटस्फोट देतो, पण त्याला सोडणार नाही, शेवटी नवऱ्याचं व्हायचं तेच झालं
Zimbabwe vs India, 3rd T20I: वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
वैभव सुर्यवंशीला शतकाची हुलकावणी; टीम इंडियाचे झिम्बाब्वेसमोर विजयासाठी 193 धावांचे आव्हान
Revanth Reddy on Election Age: देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
देशातील जेन झीने दिल्ली अन् मोदी सरकार हादरवून सोडताच तेलंगणा सरकारच्या निर्णयाची भलतीच चर्चा! मोदी सरकार मान्यता देणार?
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
भाजप खासदाराच्या लेकीचा धर्मेंद्र प्रधानांविरोधात एल्गार! म्हणाली, ती पोस्ट अजिबात डिलीट करणार नाही, दुसरीकडे चक्क भाजप मंत्र्याच्या लेकीची सुद्धा मोदींविरोधोत घोषणाबाजी!
Embed widget