एक्स्प्लोर

ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलंय, जनतेने त्यांच्याच झिंज्या उपटल्या, मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला 

जनतेने ठाकरे बंधूंच्याच झिंज्या उपटल्याचा टोला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. 

Radhakrishna Vikhe Patil on Raj and Uddhav Thackeray :  NEET पेपरफुटी प्रकरणानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान (Dharmendra Pradhan) यांनी दिलेल्या राजीनाम्याचा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क (Shivaji Park) येथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीमध्ये भव्य 'तिरंगा रॅली' पार पडली. या तिरंगा रॅलीला तरुणाईचा मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. त्यांच्या या टीकेला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. जनतेने ठाकरे बंधूंच्याच झिंज्या उपटल्याचा टोला विखे पाटलांनी लगावला. 

ठाकरे बंधूंचे अस्तित्व संपलेलं 

मुंबईत आज ठाकरे बंधूंनी जल्लोष सभेचे आयोजन केले होते. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारवर टीका केली. त्याला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ठाकरे बंधूंचे अस्तित्व संपलेलं असून त्यांच्याच जनतेने झिंज्या उपटल्या असल्याचा जोरदार टोला विखे पाटलांनी लगावला. ते साताऱ्यातील कराडमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.  

Raj Thackeray: काय म्हणाले राज ठाकरे? 

उपस्थित जनसमुदायाला संबोधित करताना राज ठाकरे म्हणाले, "जो विजय आंदोलन अख्ख्या देशभर पेटवलंत, त्या आंदोलनाला यश आलं. त्याचा उत्साह साजरा करण्यासाठी तुम्ही सर्वजण इथे हजर झाले आहात. या देशातले 'जेन-झी' हे सरकारच्या झिंज्या कशा उपटतात, हे या आंदोलनातून समजलं. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलीस यांच्यातील फरक आता लोकांना समजला आहे. आम्ही या संपूर्ण यंत्रणेचे आभार मानतो," असे त्यांनी म्हटले. 

Uddhav Thackeray: काय म्हणाले उद्धव ठाकरे? 

उद्धव ठाकरे यांनी यावेळी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. "आज कोणतीही निवडणूक कोणी जिंकलेली नाही, पण अंधभक्तांच्या विरुद्ध देशभक्त जिंकले आहेत. ही संघर्षाची सुरुवात आहे, भाजप विरुद्ध भारत असा हा संघर्ष आहे. जात, पात, धर्म विसरून 'मी भारतीय' म्हणत आपण सहभागी झालो आहोत. मी कालच म्हटलं होतं की, एका झुरळाने हुकूमशहाला नमवलं आहे, हा खरा विष्णूचा अवतार आहे. 

मोदीजी, आता तरी देशाकडे लक्ष द्या! तुमचे मंत्री काम सोडून पक्ष फोडण्यात व्यस्त आहेत. अर्थमंत्री घसरत्या रुपयाबद्दल आणि महागाईबद्दल बोलत नाहीत, पण पेपरफुटीचे फायदे समजावून सांगत आहेत. धर्मेंद्र प्रधान यांच्या संरक्षणासाठी सरकार पुढे आले. मोदींना मला सांगायचंय की, तुम्हाला तुमच्या लाडक्या धर्मेंद्रला मंत्रिमंडळातून घालवताना किती यातना झाल्या, त्याहीपेक्षा जास्त यातना जीव दिलेल्या मुलांच्या कुटुंबीयांना झाल्या आहेत. ही ठिणगी आता पडली आहे, देशभर वणवा पेटलाय. तरुणांनी देशाच्या सुवर्ण इतिहासातील एक पान लिहिले आहे," असे त्यांनी म्हटले.

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं, पण..; माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांचा गौप्यस्फोट, सांगितलं कारण
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा, IPS अधिकारी स्मार्तना पाटील ‘उत्कृष्ट सेवा पदक’ जाहीर 
Tukaram Mundhe: डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
डॉमिनोज, केएफसी, मॅकडोनाल्ड, सबवे, बर्गरकिंगसह प्रमुख आस्थापनांची FDA कडून तपासणी; 2 व्यावसाय तात्काळ बंद, 5 परवाने निलंबित, 95 जणांना सुधारणा नोटिसा
Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
डिफेंडर कारवरून डिवचलं, मनोज जरांगेंनी विरोधकांना चांगलच सुनावलं; म्हणाले, ‘यांच्या आईच्या नवऱ्याने पैसे दिले का?’
Advertisement

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget