एक्स्प्लोर

Santosh Deshmukh Murder Case SIT Team: संतोष देशमुख हत्याप्रकरणी एसआयटी बदलली; नवीन SIT टीममध्ये कोण कोण?

Santosh Deshmukh Murder Case SIT Team: घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते, असाही आरोप देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.

Santosh Deshmukh Murder Case SIT Team: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder Case) यांची हत्येच्या तपासासाठी 1 जानेवारीला नेमलेली एसआयटी रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी सात जणांची एसआयटी स्थापन करण्यात आलीय. पोलीस उपमहानिरीक्षक बसवराज तेलीच या नव्या एसआयटीचे प्रमुख असणार आहेत. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबाचा आक्षेप होता. या घटनेतील आरोपी एसआयटीतील अधिकाऱ्यांच्या संपर्कातील होते, असाही आरोप देशमुख कुटुंबीयांकडून करण्यात आला होता. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी बीडचे पोलीस अधीक्षक आणि सीआयडी अधिकाऱ्यांना फोन केला. यावेळी एकही आरोपी सुटता कामा नये, अशा सूचना त्यांनी तपास यंत्रणांना दिल्या आहेत. मुख्यमंत्र्यांनी बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत आणि एसआयटी प्रमुखांना फोन करुन तपासात कुणालाही दयामाया दाखवू नका, असे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे जे जे दोषी आढळतील त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी तपासयंत्रणांना दिले आहेत. 

संतोष देशमुखांच्या तपासाला नवीन SIT टीममध्ये कोण कोण?

- किरण पाटील (अपर पोलिस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, छत्रपती संभाजीनगर
- अनिल गुजर (पोलिस उपअधीक्षक राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड) 
- सुभाष मुठे (पोलिस निरीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, बीड
- अक्षयकुमार ठिकणे (पोलिस निरीक्षक, भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) 
- शर्मिला साळुंखे (पोलिस हवालदार भरारी पथक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे) 
- दीपाली पवार (हवालदार, सीसीटीएनएस, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे)

एसआयटीमधून वगळण्यात आलेले अधिकारी-

सहाय्यक पोलिस निरिक्षक- विजय जोनवाल
पोलिस उपनिरिक्षक महेश विघ्ने,
पोलिस उपनिरिक्षक आनंद शिंदे,
सहायक पोलिस उपनिरिक्षक तुळशीराम जगताप,
कर्मचारी मनोज वाघ,
कर्मचारी चंद्रकांत काळकुटे,
कर्मचारी बाळासाहेब अहंकारे,

धनंजय देशमुखांनी रात्री सीआयडी अधिकाऱ्यांची केजमध्ये घेतली भेट-

संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुखांनी रात्री सीआयडी अधिकाऱ्यांची केजमध्ये भेट घेतली. यावेळी तपास अधिकाऱ्यांनी देशमुख कुटुंबियांना हत्या प्रकरणी चर्चा केली. मात्र मिळालेल्या माहितीवर देशमुख कुटुंबीय तितकसं समाधानकारक नसल्याचं ते म्हणाले. या बैठकीला बसवराज तेली अनुपस्थित होते. ते आज दुपारी तीन वाजता पुन्हा देशमुख कुटुंबियांना भेटून तपशीलवार माहिती देणार आहेत. दरम्यान धनंजय देशमुखांनी मस्साजोगच्या ग्रामस्थांना आजचं आंदोलन एक दिवस पुढे ढकलण्यास सांगितलंय.

Santosh Deshmukh SIT: संतोष देशमुखांच्या तपासाला नवीन SIT टीममध्ये कोण कोण?, VIDEO:

संबंधित बातमी:

Walmik Karad: वाल्मिक कराडवर मोक्का लावण्याची मागणी; सीआयडीचं महत्त्वाचं पाऊल, खंडणी प्रकरणात आवाजाचे नमुने गोळा केले

एबीपी माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. 2019 पासून लोकमत ऑनलाईनमधून पत्रकारितेची सुरुवात. राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा, क्राईम, क्रीडा, निवडणूक विषयक बातम्यांमध्ये रस. 

Read More

महत्त्वाच्या बातम्या

Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
ABP Majha Top 10, 15 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
ABP Majha Top 10, 15 August 2026 : आजच्या ठळक बातम्या, Breaking News Today, संध्याकाळच्या ताज्या बातम्या, वाचा एबीपी माझाच्या संध्याकाळच्या टॉप १० हेडलाईन्स - Evening
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते

व्हिडीओ

Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
Embed widget