एक्स्प्लोर

Sanjay Raut on Devendra Fadnavis : नाशिकमधील ठाकरे गट-मनसेच्या मोर्चाआधीच राऊतांनी फडणवीसांना धारेवर धरलं; म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांसह...

Sanjay Raut on Devendra Fadnavis : आज 'ठाकरेंची शिवसेना' आणि 'मनसे'चा नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चाआधी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय.

Sanjay Raut on Devendra Fadnavis : आज 'ठाकरेंची शिवसेना' (Shiv Sena UBT) आणि 'मनसे' (MNS) यांचा नाशिकमध्ये संयुक्त मोर्चा निघणार आहे. या मोर्चासाठी दोन्ही पक्षांमधील बडे नेते थेट मुंबईहून नाशिकला (Nashik) दाखल होत आहे आहेत. वाढती गुन्हेगारी, अमली पदार्थांची विक्री, टोळ्यांची दहशत, सोनसाखळी चोरीच्या घटना, आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष, महानगरपालिकेतील भ्रष्टाचारी कारभार या प्रश्नांवरून महायुती सरकारच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चाच्या आधीच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय.  

संजय राऊत म्हणाले की, नाशिकमध्ये शिवसेना सक्रिय आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना सुद्धा नाशिकमध्ये जनतेच्या प्रश्नावर आवाज उठवत असते. नाशिक हे पवित्र धार्मिक स्थान आहे. नाशिकमध्ये कुंभमेळ्याचं आयोजन केलं जातं. नाशिक श्रीरामाच्या नावाने ओळखले जाते. तसेच नाशिक हे कुसुमाग्रज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाने देखील ओळखले जाणारे शहर आहे. आज नाशिकमध्ये जी अवस्था आहे, जी परिस्थिती झालेली आहे, त्याच्या विरोधात याआधी देखील आंदोलने झाली आहेत. आज पुन्हा एकदा नाशिकमध्ये आम्ही मोर्चा काढत आहोत. 

मुख्यमंत्र्यांनी नाशिकमध्ये विरोधी पक्षाच्या नेत्यांसह फिरावं

नाशिक शहरात लोकांना पाणी नाही. अनेक समस्या आहेत. ड्रग्जची समस्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत. हेच नाशिक शहर देवेंद्र फडणवीस यांनी दत्तक घेतलेलं आहे. विकासासाठी त्यांनी यावर उत्तर द्यावे. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांच्या नेत्यांसोबत नाशिकचा दौरा करावा व तेथील परिस्थिती जाणून घ्यावी, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला. 

संजय राऊतही आंदोलनात सहभागी होणार

संजय राऊत पुढे म्हणाले की, आमच्या लोकांनी मुख्यमंत्र्यांना वारंवार कळवून झाले आहे. आंदोलने देखील केलेली आहेत. रास्ता रोको केलेले आहेत. पण शेवटी असे ठरले की, नाशिकच्या प्रश्नावर शिवसेना आणि मनसे यांनी एकत्र येऊन एक विराट मोर्चा काढावा. जन आक्रोश मोर्चा काढावा आणि सरकारचे लक्ष वेधून घ्यावे. मनसेचे अनेक नेते नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. त्यात बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे, अविनाश अभ्यंकर आणि आमचे स्थानिक नेते देखील तिथे उपस्थित आहे. मला देखील या मोर्चाला येण्याचा आग्रह करण्यात आला. कार्यकर्त्यांनी आग्रह केला म्हणून मी तिथे जात आहे, असे देखील त्यांनी सांगितले. 

आणखी वाचा 

Saamana Agralekh On Vice President Election Result: व्होट चोरीतून सी.पी.राधाकृष्णन यांची निवड; विजयानंतरचे बुडबुडे, येथेही घोडेबाजार?, 'सामना'तून सवाल

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार

व्हिडीओ

Mahapalikecha Mahasangram Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये ६८ जागांसाठी होणार निवडणूक, कोण मारणार बाजी?
Sanjay Raut : मनसे आणि शिवसेनेमध्ये मुंबईसह इतर महापालिकांमध्ये युती - संजय राऊत
Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 डिसेंबर 2025 | मंगळवार
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
पुण्यात दोन राष्ट्रवादी एकत्र, पवार काका-पुतण्याची हातमिळवणी; संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा वार
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Embed widget