एक्स्प्लोर

Vishal Patil: 'पुढील निवडणुकीत खासदार असणार की माहीत नाही कारण..' विशाल पाटील अचानक असं का म्हणाले?

सांगलीत आणखी एका गावाचे नाव बदलण्यात आले. या नामकरण सोहळ्यात खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर, काँग्रेसचे मनपा नगरसेवक हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.

Vishal Patil: सार्वजनिक कार्यक्रमात आता महिलांची संख्या वाढत आहे. आता 33 टक्के म्हणजेच एक तृतीयांश महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. आता आमदार, खासदार देखील महिला होणार आहेत. त्यामुळे पुढच्या वेळेस आम्ही खासदार असेल की नाही याची खात्री नसल्याची चिंता सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केली. सांगली जिल्ह्यात आणखी एका गावाचे नाव बदलण्यात आले. या नामकरण सोहळ्यात खासदार विशाल पाटील बोलत होते. यावेळी व्यासपीठावर शिंदे सेनेचे आमदार सुहास बाबर, काँग्रेसचे मनपा नगरसेवक हर्षवर्धन पाटील उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील मौजे मेंगाणवाडीचे नाव बदलून मौजे शिवशिवापूर असे करण्यात आले. हे नामकरण केवळ नावातील बदल नसून गावाच्या ओळखीला, परंपरेला आणि संस्कृतीला नव्याने दिशा देणारा एक ऐतिहासिक क्षण ठरला असल्याचे विशाल पाटील म्हणाले. 

पुढील वेळी आम्ही असेल की नाही याची खात्री नाही

विशाल पाटील पुढे म्हणाले, कार्यक्रमात आता महिला दिसत आहेत. एवढ्या संख्येने महिला फक्त देवाच्या कार्यक्रमाला येतात. गावच्या नामकरणाच्या कार्यक्रमात पुरुषांपेक्षा महिलांचा सहभाग जास्त आहे. त्यामुळे पुरुषांपेक्षा महिलांना आनंद नामकरणाचा जास्त झाला आहे. आता 33 टक्के एक तृतीयांश महिला प्रतिनिधित्व करणार आहेत. आता आमदार, खासदार देखील महिला होणार आहेत. पुढच्या वेळेस आम्ही असेल की नाही याची खात्री नाही. मतदारसंघ मोठा आहे. त्यामुळे प्रत्येक गावात जाणे शक्य होत नाही. सहा महिने इथे राहून एक जरी गाव केलं तर 750 गाव पाच वर्षात होत नाहीत. मी दिल्लीत होतो, विश्वजीत कदमांच्या हेलिकॉप्टरमधून कार्यक्रमाला आलो. पुढील लोकसभेचा प्रचार या कार्यक्रमातून आताच करतो असे त्यांनी सांगताच उपस्थित ग्रामस्थांमध्ये एकच हशा पिकला.

विशाल पाटील पहिल्यांदाच खासदार 

दरम्यान, 2024 मध्ये पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादाची ठिणगी पडली होती. जागावाटपात शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसमधील संघर्ष टोकाला पोहोचला होता. विशाल पाटील यांच्यासाठी आमदार विश्वजित कदम यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती. तर ठाकरे यांनीही कोणत्याही प्रकारे ताकद नसतानाही ताकद लावत चंद्रहार पाटील यांना उमेदवारी दिली होती. मात्र, विशाल पाटील यांनी अपक्ष निवडणुकीत उतरत चंद्रहार पाटील यांना एकतर्फी मात दिली होती. विशाल पाटील यांना वंचितने पाठिंबा दिला होता. प्रकाश आंबेडकर यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता. निवडून आल्यानंतर विशाल पाटील यांनी काँग्रेसलाच पाठिंबा दिला होता. 

इतर महत्वाच्या बातम्या

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Manoj Jarange : एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
अखेर 3 तासानंतर सांगलीचा धर्मेंद्र खाली उतरला; माझ्या प्रेयसीला घेऊन या म्हणत मोबाईल टॉवरवर चढला प्रेमवीर
Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण

व्हिडीओ

Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!
Bajrang Sonawane On PM Modi Meet : पंतप्रधान मोदींची भेट कशासाठी? खासदार बजरंग सोनवणेंचा खुलासा
Shivsena: ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Raj Thackeray Special Report : मुंबई-गोवा महामार्गावरुन राज ठाकरेंचे सरकारला खडेसवाल : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Modi and Rohit Pawar: PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
PM मोदी स्टेजवर येताच सुप्रिया सुळेंनी रोहित पवारांना हाताला धरुन खेचलं, पुढे काय घडलं?; सगळीकडे चर्चा, पाहा 38 सेकंदाचा VIDEO
AR Rahman Son AR Ameen Car Accident: ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; गायकाची पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
ए. आर. रहमान यांचा मुलगा अमीनच्या गाडीचा भीषण अपघात; पोर्शे कार एका कॅबला धडकली, अन्...
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Maharashtra Live blog updates: नाशिकसह पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे धक्के; जव्हार-विक्रमगड परिसर हादरला
Kisan Sabha Protest : नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
नियमित कर्जदार, पीक विमा अन् जमिनींच्या प्रश्नावर किसान सभेचा एल्गार; राज्यभरात तीव्र 'जेल भरो' आंदोलन
Janardan Mishra Petrol : शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
शुद्ध पेट्रोल काय तुमच्या बापाच्या घरातून आणायचं का? इथेनॉलच्या वादावर भाजपचा खासदार बरळला
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
तुकाराम मुंढेंच्या कारवायांचा धडाका सुरूच; मुंबईत दूध भेसळ कारखान्याचा पर्दाफाश, ब्लिंकटच्या गोदामावरही धाड
Mumbai Rain news: मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
मुंबईत पहाटेपासून मुसळधार पावसाच्या सरी, लोकल ट्रेनच्या वाहतुकीवर परिणाम
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Embed widget