एक्स्प्लोर

Sadhus Beaten Up In Sangli : सांगलीत साधूंना मारहाण करणाऱ्यांना अटक; आचार्य तुषार भोसले म्हणतात, हे अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार!

मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा इथं ही घटना घडली. पोलीस चौकशीत गैरसमज झाल्याने मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.

Sadhus Beaten Up In Sangli : सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामध्ये साधू मारहाण प्रकरणी (Sangli Sadhu Lynching) सहा जणांना अटक करण्यात आली. मुलं पळवणारी चोरांची टोळी समजून चार साधूंना बेदम मारहाण करण्यात आली. सांगलीच्या जत तालुक्यातील लवंगा इथं ही घटना घडली. पोलीस चौकशीत गैरसमज झाल्याने मारहाण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आता या घटनेनंतर राजकीय चिखलफेक आणि राजकीय टोलेबाजी सुरु झाली आहे. भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी मारहाण झालेल्यांना अटक झाल्यानंतर हे अस्सल हिंदुत्ववाद्यांचं सरकार असल्याचे म्हटले आहे. 

त्यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे. ते ट्विटमध्ये म्हणतात की, सांगली जिल्ह्यात साधूंना मारहाण केलेल्यांवर गुन्हा दाखल झाला. 6 जणांना अटक झाली आणि अजून 10-15 जणांना अटक होणार आणि कठोर शिक्षा होईल.

भाजप आमदार राम कदम यांनी सांगलीमध्ये साधूंना झालेल्या मारहाणीचा आम्ही तीव्र निषेध करत असल्याचे म्हटले आहे. पालघर साधू हत्याकांडात मुख्यमंत्री आणि त्यांच्या तत्कालीन सरकारने ज्या प्रकारे त्यांच्यावर अन्याय केला, तशी फसवणूक किंवा अन्याय या विद्यमान सरकारमध्ये होणार नाही, याची खात्री महाराष्ट्र आणि देशातील जनतेला द्यावीशी वाटते, असेही राम कदम म्हणाले. 

साधूंनी तक्रार केली नसली तरी पोलिसांनी दखल घेतल्यानंतर तातडीने कारवाई केली जाईल. त्यांना न्याय दिला जाईल आणि जे दोषी असतील त्यांना कठोर शिक्षा होईल. बदललेले नवीन सरकार आणि जुने हिंदुद्वेषी सरकार यात हाच फरक असल्याचे राम कदम म्हणाले. 

पोलिस महासंचालकांकडून घटनेची दखल

दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार साधूंना मारहाण झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राज्याचे पोलिस महासंचालक रजनीश सेठ यांनी सांगली पोलिस अधीक्षकांकडून घटनेची तपशीलवार माहिती मागितली आहे. 

नेमकं काय घडलं?

दरम्यान,वाराणसी इथून चार साधू कर्नाटकात देवदर्शनासाठी गेले होते. देवदर्शन आटोपून ते लवंगामार्गे विजापूरला जात होते. त्यावेळी रस्त्यात गाडी थांबवून विजापूर रस्ता कोणता अशी विचारणा या साधूंनी एका तरुणाकडे केली. मुलं पळवणारी चोरांची टोळी असा कन्नडमध्ये उल्लेख असलेला साधूचा एक व्हिडीओ तरुणानं पाहिला होता. त्या तरुणाकडेच या साधूंनी रस्त्याबाबत विचारणा केली. 

व्हायरल व्हिडिओमुळे मुळं पळवणारी टोळीच असल्याची शंका आल्यानं तरुणानं ही बाब गावात कळवली. त्यानंतर या चारही साधूंना गाडीतून ओढून बेदम मारहाण करण्यात आली. काठी, पट्ट्यानं या साधूंना मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आला आहे. ओळखपत्र आणि आधार कार्ड याबाबतची माहिती देऊनही जमावानं ऐकलं नसल्यानं हा प्रकार घडला. दरम्यान उमदी पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन चारही साधूंची संतप्त जमावाच्या तावडीतून सुटका केली.

दुसरीकडे, पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या साधूंकडे पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न केला जात आहे, पण त्यांचा फोन बंद लागत आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMumbai SuperFast : मुंबईतील बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 16 June 2024 ABP MajhaTop 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 16 June 2024ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
Video: नाहीतर मी राजकारण सोडेन, आपण सगळं पुन्हा पलटून दाखवू; समर्थकांना आवाहन, पंकजा मुंडेंचा कंट दाटला
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
पोटाला चिमटा काढून मला साथ दिली; 'फादर्स डे'निमित्त राम सातुपतेंनी सांगितला 'बाप'माणूस
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
Embed widget