Success Story: सुपीक जमीन.. पाणी पण भरपूर.. सांगलीच्या शेतकऱ्यांनं ऊसाचा नाद दिला सोडून, 1.5 एकरात पेरू लावला अन् ..
खरंतर सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी पेरू ही वनस्पती भारतात आणली त्यानंतर ती ठिकठिकाणी पसरली आणि आता भारतातलं हे चौथा महत्त्वाचे पीक आहे.

Sangli Agriculture Suceess: आपल्या सुपीक जमिनीसाठी आणि मुबलक पाण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या सांगली जिल्ह्यात उसाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. पण उसाला फाटा देऊन सांगलीच्या उदय पाटलांनी थायलंडचे पेरू लावले आणि आता दरवर्षी केवळ दीड एकरातून हा शेतकरी 20 लाख रुपये कमावतोय. पेरू सोबत अंतर लागवड म्हणून झेंडूचे रोपे लावल्याने या शेतकऱ्याच्या जमिनीची सुपीकता वाढली आहे. आता वर्षातून दोन वेळा पेरूचे उत्पादन होतं. सरासरी 35 टन उच्च दर्जाच्या पेरूची विक्री हा शेतकरी करतोय. (Guava Farming)
उसाची शेती सोडून पेरू आणि बागायत शेतीकडे वळल्याने उदय पाटील यांना उत्पन्न वाढण्यास मदतच झाली आहे. शिवाय शेतीमध्ये जोखीम घेण्याची क्षमता ही त्यांची वाढली आहे. कमी वेळात अधिक चांगलं उत्पन्न मी मिळवू शकतो असा विश्वास ते व्यक्त करतात. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत योग्य अंतर पीक निवडल्याने या शेतकऱ्याचा चांगला फायदा झाला आहे. (Success Story)
एक पेरू किलोभर वजनाचा
पुणे पूलमध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तानुसार, सांगलीच्या कासेगाव येथील उदय पाटील या प्रगतशील शेतकऱ्याने पारंपरिक ऊस न लावता आधुनिक तंत्राचा वापर करून आपल्या दीड एकर शेतात वीएनआर थायलंड जातीचे पेरू लावले. पेरूच्या बागेची 18 महिने काळजी घेतली. पहिल्याच वेळेस प्रयत्न यशस्वी झाला. पहिल्या पिकातून 15 टन पेरूचे उत्पादन मिळाले आणि चांगली सुरुवात झाली. मग उदय पाटील यांनी स्वतःला फक्त पेरू लागवडी पुरताच मर्यादित ठेवलं नाही. फळझाडासोबत झेंडूच्या रोपांचा अंतर पीक लावलं. आणि जमिनीची सुपीकता वाढली. पेरूच्या बागेतून वर्षातून दोन वेळा पेरूचे उत्पादन आलं. 15 टनाचे 35 टन पेरू झाले. उदय पाटील यांच्या प्रत्येक पेरूचं वजन सुमारे 1 किलो आहे. आणि बाजारात या पेरूची किंमत 60 ते 65 किलो प्रति किलो आहे. त्यामुळे यांना पेरूच्या शेतीतून चांगलं उत्पन्न मिळतंय. (Sangli Farming Success)
व्हीएनआर थायलंड पेरू शेती
व्हीएनआर ही पेरूची नाविन्यपूर्ण जात आहे. खरंतर सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी पेरू ही वनस्पती भारतात आणली त्यानंतर ती ठिकठिकाणी पसरली आणि आता भारतातलं हे चौथा महत्त्वाचे पीक आहे. पेरूची लागवड बिहार उत्तर प्रदेश महाराष्ट्र कर्नाटक ओरिसा पश्चिम बंगाल आंध्र प्रदेश आणि तमिळनाडू मध्ये मोठ्या प्रमाणावर केली जाते. पेरूची व्ही एन आर ही जात जगभरातील 30 हून अधिक देशांमध्ये निर्यात केली जाते. उष्णकटिबंधीय आणि उपोषणकटिबंधीय अशा दोन्ही प्रदेशांमध्ये पिकवला जाणारे पेरूचे फळ उन्हाळ्यात उष्ण तापमान पासून दुष्काळी प्रदेशांमध्ये ही चांगले तग धरते.
हेही वाचा:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

