एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Rain Update : सांगलील तासभर मुसळधार पावसाने झोडपले; अनेक चौकांना तळ्यांचे स्वरुप, रस्त्यावर गुडघाभर पाणी
सांगलीत स्टँडजवळील झुलेलाल चौक, मारुती चौक आणि भाजी मंडई रोडवर तर गुडघाभर पाणी साचून या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. अनेक रस्त्यांवर गुडघाभर पाणी होते.
Sangli Rain Update : सांगली शहरासह उपनगरांना काल (8 जून) रात्री दहाच्या सुमारास विजांचा कडकडाट, मेघगर्जनेसह वादळी आणि मुसळधार पावसाने झोडपून काढले. जवळपास तासभर पाऊस चालू होता. यामुळे शहरातील प्रमुख चौकात सर्वत्र पाणीच पाणी साचून राहिले होते. स्टँडजवळील झुलेलाल चौक, मारुती चौक आणि भाजी मंडई रोडवर तर गुडघाभर पाणी साचून या परिसराला तळ्याचे स्वरूप आले होते. स्टेशन चौक, राममंदिर चौक, मारुती चौक, शिवाजी मंडई परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले होते. यामुळे नागरिकांची हाल झाले. जिल्ह्यात सर्वच ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली. या पावसामुळे नागरिकांना मान्सून पावसाची चाहूल लागली असून शेतीच्या कामांना गती मिळणार आहे. तासगाव-मिरज पुर्व भागासह शिराळा-वाळवा तालुक्यांमध्येही पावसाने दमदार हजेरी लावली.
इतर महत्वाच्या बातम्या
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
निवडणूक
निवडणूक
राजकारण
Advertisement