Sangli News : निर्दयी बापाने पोटच्या चार वर्षीय दिव्यांग लेकीला विहिरीत फेकले; सांभाळणं अवघड झाल्याने नैराश्यातून कृत्य
जन्मजात दिव्यांग असल्याने तिच्यावर कोळी कुटुंबियांकडून औषध उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यामध्ये कोणतीच सुधारणा होत नव्हती, या नैराश्यातून विहिरीत फेकून देऊन तिचा खून केला.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात कुरळपमध्ये (Sangli Crime) अवघ्या चार वर्षीय दिव्यांग मुलीचा विहिरीत फेकून बापानेच जीव घेतल्याची भयंकर घटना घडली. औषध उपचार करुनही सुधारणा होत नसल्याने निर्दयी बापाने चिमुरडीचा शेवट केला. अण्णापा कोळी असे या निर्दयी बापाचे नाव आहे. श्रीदेवी कोळी असे या दिव्यांग चिमुरडीचे नाव आहे. जन्मजात दिव्यांग असल्याने तिच्यावर कोळी कुटुंबीयांकडून औषध उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यामध्ये कोणतीच सुधारणा होत नव्हती, या नैराश्यातून हे कृत्य घडले आहे.
निर्दयी बाप कोल्हापूर जिल्ह्यातील
कोल्हापूर जिल्ह्यातील अण्णाप्पा कोळी याचे कुटुंब सध्या वाळवा तालुक्यातील कुरळप या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी गेल्या काही वर्षांपासून वास्तव्याला आहे. त्याला श्रीदेवी नावाची चार वर्षाची मुलगी होती. जन्मजात दिव्यांग असल्याने तिच्यावर कोळी कुटुंबीयांकडून औषध उपचार करण्यात येत होते. मात्र, त्यामध्ये कोणतीही सुधारणा होत नव्हती. त्यामुळे या मुलीला सांभाळणं अवघड होतं, असल्याने कंटाळून अण्णाप्पा कोळीने दारूच्या नशेत घराजवळ असणाऱ्या विहीरीत श्रीदेवी या आपल्या चार वर्षाच्या दिव्यांग मुलीला फेकून दिले,ज्यामध्ये तिचा बुडून मृत्यू झाला.
मुलगी बेपत्ता असल्याच्या कारणातून कोळी कुटुंबाने शोध सुरु केला असता घरा जवळ असलेल्या विहिरीमध्ये चिमुरड्या श्रीदेवीचा मृतदेह आढळला. याप्रकरणी पोलिसांनी अण्णाप्पा कोळीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने आपल्या मुलीला विहिरीत फेकून दिल्याची कबुली दिली. त्याला कुरळप पोलिसांनी अटक केली आहे.
विहिरीच्या पाण्यावरुन भावकीच्या वादात काका पुतण्याची निर्घृण हत्या
दरम्यान, अवघ्या पाच दिवसांपूर्वी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यामधील कोसारी गावात काका-पुतण्याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. विलास नामदेव यमगर (वय 45) आणि प्रशांत दादासो यमगर (वय 23) असे मृत काका-पुतण्याची नावे आहेत. भावकीत सामाईक असलेल्या विहिरीच्या पाण्यावरुन झालेल्या हाणामारीत दोघांचा जीव गेला. या हल्ल्यात दादासो नामदेव यमगर, यशवंत भाऊ खटके आणि विजय विलास यमगर गंभीर जखमी झाले आहेत. तर दुसऱ्या यमगर कुटुंबापैकी कोणी जखमी झाले नाही.
कोसारीत यमगर भावकी असून त्यांच्या शेतात सामायिक विहीर आहे. या विहिरीमध्ये पाण्याची पाळी कोणाची यावरुन वादाला सुरुवात झाली. या वादाचे रुपांतर हाणामारीत आणि त्यानंतर दोन खून पडण्यापर्यंत गेला. एका यमगर कुटुंबातील सुमारे दहा ते पंधरा जणांनी मयत विलास आणि प्रशांत यमगर यांच्या कुटुंबावर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये विलास आणि प्रशांत यमगर या दोघांचा खून करण्यात आला.
इतर महत्वाच्या बातम्या