एक्स्प्लोर

Krishna River : कृष्णा नदीच्या प्रदूषणाविरुद्ध 25 मार्चला मानवी साखळी; कृष्णामाईच्या बचावासाठी पंचसूत्रीसह रस्त्यावर उतरण्याचा निर्धार

Krishna River : प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याने गटारगंगा होत चाललेल्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाविरोधात 25 मार्च रोजी मानवी साखळी करण्यात येणार आहे.

Krishna River : प्रदूषणाच्या विळख्यात अडकल्याने गटारगंगा होत चाललेल्या कृष्णा नदीच्या प्रदूषणाविरोधात 25 मार्च रोजी मानवी साखळी करण्यात येणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगलीमध्ये कृष्णेच्या पात्रात लाखो माशांचा तडफडून मृत्यू झाला आहे. त्यामुळे कृष्णेच्या बचावासाठी पंचसूत्रीसह रस्त्यावर उतरण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सांगली शहर महापालिका, कराड, इस्लामपूर आणि आष्टा या तीन नगरपालिका आणि 29 मोठ्या ग्रामपंचायतींचे सांडपाणी थेट कृष्णा नदीत सोडले जाते. इस्लामपूर, पलूस औद्योगिक वसाहतीचे सांडपाणीही कृष्णेतच मिसळते. नदीकाठच्या साखर कारखान्यांचे पाणी, मळी चोरून नदीत सोडली जाते, असे अनेकदा स्पष्ट झाले आहे. कृष्णा नदी दक्षिण महाराष्ट्राची जीवनवाहिनी आहे. तिचा 1400 पैकी 282 किलोमीटरचा प्रवास महाराष्ट्रातून होतो. हाच टापू आता प्रदूषणाच्या फेऱ्यात अडकला आहे. 

असे असेल आंदोलनाचे स्वरुप  

शनिवारी 25 मार्च रोजी सकाळी आठ वाजता आयर्विन पुलापासून आंदोलनाला सुरुवात होईल. यावेळी एक मोठी मानवी साखळी केली जाईल. ती आयर्विन पुलापासून सुरु होईल आणि शहरातील हरभट रोड, गणपती पेठ, कापडपेठ व्यापून टाकेल आणि ती महापालिकेपर्यंत असेल. सामान्य नागरीक, व्यापारी, फेरीवाले, रिक्षावाले, हमाल, विद्यार्थी, महिलांसह सर्व घटकांनी त्यात सहभागी व्हावे आणि सरकारचे लक्ष वेधावे, असे आवाहन करण्यात आलं आहे.

  • महाबळेश्‍वरला कृष्णा नदीच्या उमगापासून ते महाराष्ट्रातील शेवटचे गाव राजापूर बंधाऱ्यापर्यंत सर्वेक्षण व्हावे. त्यासाठी राज्य शासनाने तटस्थ, तज्ज्ञ समितीची नियुक्ती करून कृष्णा नदीच्या प्रदूषणास कारणीभूत छोट्यात छोट्या आणि मोठ्यात मोठा घटक निश्‍चित करावा.   
  • कृष्णा व वारणा नदी काठावरील साखर कारखान्यांनी रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणारे प्लांट उभे केले तरच त्यांना पुढील गळीत हंगामाचा परवाना द्यावा.
  • कृष्णा नदीकाठावरील औद्योगिक वसाहतींतील कारखान्यांच्या सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची व्यवस्था काय आहे, याचे स्वतंत्रपणे सर्वेक्षण करावे. त्यांना प्रक्रिया प्लॅंट उभा करण्याची सक्ती करून निश्‍चित कालावधी द्यावा.
  • नदीकाठावरील मोठी 29 गावे, तीन नगरपालिका, सांगली शहर महापालिका यांचे सांडपाणी थेट नदीत मिसळते. ते प्रक्रिया करूनच सोडले जावे, यासाठी राज्य शासनाने कृती कार्यक्रम आखून द्यावा. त्यासाठी आवश्‍यक निधीची तरतूद अर्थसंकल्पात करावी. शक्य तिथे पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राधान्याने या कामी वळवावे.
  • कृष्णा व वारणा नदीकाठची शेती अधिकाधिक सेंद्रीय पद्धतीने व्हावी, यासाठी जनजागृती करणे. त्यासाठी प्रोत्साहन देणे. सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या ऊसाला सरकारने प्रोत्साहन रुपात अधिकची रक्कम देऊन या पद्धतीच्या शेतीला सहकार्य करावे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
साखर पट्ट्यात खळबळ, कारखानदारांनी घेतला राजू शेट्टींचा धसका, साखरेचा हमीभाव वाढवा, नाहीतर कारखाने बंद ठेवा, सरकारला थेट इशारा
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
वरिष्ठांना पत्र लिहून मागणी, राष्ट्रवादीचे आमदार इद्रिस नायकवाडींना जीवे मारण्याची धमकी; मिरज पोलिसात तक्रार
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
सांगली DCC बँक निवडणुकीत हायकोर्टाने अर्ज बाद ठरवला; गोपीचंद पडळकरांची प्रतिक्रिया, सांगितलं पुढे काय?
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद
गोपीचंद पडळकरांना हायकोर्टाचा मोठा झटका; सांगली जिल्हा बँक निवडणुकीतील उमेदवारी अर्ज बाद

व्हिडीओ

Pune Election : मुख्यमंत्री म्हणाले, महायुती म्हणून एकत्र लढू, मात्र एकनाथ शिंदेंची वेगळी भूमिका,
Shetitil Navdurga : Rekha Rayate | ती स्वतः परदेशात गेली नाही, पण तिच्या 40 गुंठ्यांतली द्राक्षं परदेशात पोहोचली
Sanjay Raut On Amit Shah : अमित शाह यांचे डोळे म्युझियममध्ये ठेवले पाहिजे; संजय राऊत यांची टीका
Shetitil Navdurga | Pooja Gawli | खेळाच्या मैदानातून शेतीच्या बांधावर! कॅनोइंगमध्ये पदकं जिंकली…
Shivsena Pune Election : पुणे पदवीधरची जागा भाजपला सोडल्यानं शिवसेनेत नाराजी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Import: सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, चांदीच्या आयातीमध्येही घसरण
सप्टेंबरमध्ये सोन्याची आयात 81.27 टक्क्यांनी घटली, सलग दुसऱ्या महिन्यात ट्रेंड कायम, जाणून घ्या कारण
School Admission Age : शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
शाळा प्रवेशासाठी बालकांचे वयाचे नवे निकष जाहीर, नर्सरी आणि पहिलीसाठी 'इतकी' वर्षे पूर्ण असणं बंधनकारक
Election Commission : SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
SIR वादाच्या भडक्यात निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! यूपी, मणिपूरसह 17 राज्यांसाठी SSR जाहीर; 1 जानेवारी 2027 कट-ऑफ डेट
CJP : सीजेपीकडून सेंट्रल पार्कमध्ये लहरा दो तिरंगा मार्चचं आयोजन, NDMC नं पार्क 2 दिवस बंद ठेवण्याचा आदेश काढला, अभिजीत दीपकेंची प्रतिक्रिया समोर
सीजेपीचा लहरा दो तिरंगा मार्च रोखण्यास हायकोर्टाचा नकार, NDMC नं सेंट्रल पार्क बंद ठेवण्याचा आदेश काढला
Mumbai Firecracker Ban : दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
दिवाळीत रस्त्यांवर फटाके फोडण्यास 'सुप्रीम' ब्रेक, मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा आदेश; DJ आणि लेझर लाईट्सवरही निर्बंध
Voter Registration : मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
मतदार यादीत नाव नोंदणीसाठी राज्यात विशेष मोहीम, मतदान केंद्रांवर विशेष शिबिरांचं आयोजन, तारखा जाहीर
Tukaram Mundhe : MPSC चौकशी समिती संदर्भात माझ्याशी अधिकृत पत्रव्यवहार झाला नाही पण चर्चा झालीय, तुकाराम मुंढे अपडेट देत म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्याकडून MPSC चौकशी समिती संदर्भात मोठी अपडेट, नेमकं काय म्हणाले?
Jalgaon Accident : काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
काळीज पिळवटून टाकणारी घटना! जळगावात ट्रकची दुचाकीला धडक; 3 महिन्यांच्या चिमुकलीसह एकाच कुटुंबातील 6 जणांचा अंत
Embed widget