Sangli News : आष्ट्यात जुन्या भांडणाच्या रागातून तरुणाचे अपहरण करून खून, आरोपी तात्काळ जेरबंद
Sangli News: ओमकार ऊर्फ छोट्या भानुदास रकटे असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली.
सांगली : आष्टा शहराला हादरवून सोडणाऱ्या खून प्रकरणाचा छडा लावण्यात अखेर पोलिसांना यश आले. या प्रकरणातील संशयितांनी तरुणाचा लाथा-बुक्क्या दांडक्याने मारहाण करून मफलरने गळा आवळून खून केला. त्यानंतर शहरातील स्मशानभूमीत त्याचा मृतदेह जाळून विल्हेवाटही लावली. या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग आष्टा पोलिसांनी (Sangli Ashta) संयुक्तपणे तपास करत संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांनी खुनाची कबुली दिल्याने एकच खळबळ उडाली.
ओमकार ऊर्फ छोट्या भानुदास रकटे (वय 24, मूळ गाव बावची, सध्या रा. डांगे कॉलेजचा परिसर, आष्टा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्वीच्या भांडणाचा राग मनात धरून संशयितांनी खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली. याप्रकरणी सम्मेद संजय सावळवाडे (वय 26 रा. सावळवाडे गल्ली, आष्टा), भरत चंद्रकांत काटकर (36, रा. कदमवेस आष्टा), राकेश संजय हालुंडे (23, केला. आवटी गल्ली, आष्टा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. यापैकी सावळवाडे आणि काटकर रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. 27 फेब्रुवारीला ओमकार यांचे राहत्या घरातून संशयित सावळवाडे, काटकर आणि हालुंडे यांनी मोटारीतून अपहरण केले होते. त्यानंतर ओमकारला घेऊन हे तिघे शहराच्या पूर्वेला असलेल्या लोकमान्य शाळेजवळ गेले. तिथे ओमकारला दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर त्याचा मफलरने गळा आवळून खून केला .
वाळवा तालुक्यातील बावची मध्ये एका तरुणाचे जुन्या भांडणाच्या रागातून अपहरण करून खून करण्यात आला होता. अपहरण करण्यात आलेल्या ओंकार ऊर्फ छोट्या भानुदास रकटे या तरुणाचा खून करून मृतदेह जाळल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एलसीबी पथकाने आष्टा पोलिसांच्या मदतीने तीन सराईत उन्हेगारांना अटक केलीय. सम्मेद संजय सावळवाडे (वय रा. सावळवाडे गल्ली, आष्टा), भरत चंद्रकांत काटकर (वय 36, रा. कदमवेस, आष्टा) व राकेश संजय डालुंडे (वय 23, रा. आवटी गल्ली, आष्टा) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
पंधरा दिवसांपूर्वी सम्मेद संजय सावळवाडे व ओंकार ऊर्फ छोट्या रकटे यांच्यामध्ये करकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच भांडणाचा राग मनात धरून वरील तीन संशयित आरोपींनी 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9.30 च्या सुमारास ओंकार रकटेस डांगे कॉलेजजवळील प्रल्हाद घस्ते यांच्या भाड्याच्या खोलीतून चारचाकीतून पळवून नेले होते. याबाबतची फिर्याद ओंकार याचा मित्र सूरज प्रकाश सरगर (वय 21, रा. शेळके मळा, आष्टा) याने आष्टा पोलिस ठाण्यात दिली होती. सम्मेद सावळवाडे, भरत काटकर व राकेश हालुंडे या तिघांनी ओंकार रकटे याचे अपहरण केले असल्याची माहिती मिळाली. मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार एलसीबी व आष्टा पोलिसांच्या पथकाने वरील संशयित आरोपींना ताब्यात घेऊन चौकशी केली असता सुरुवातीस त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. परंतु, पोलिसांनी त्यांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता हा सगळा प्रकार घातपाताचा प्रकार समोर आला.