एक्स्प्लोर

Sangli News : मिरजेत युवा अभियंत्याने साकारले बारा ज्योतिर्लिंग; कोरीव नक्षीकाम आणि शिवलिंगांनी वेधले लक्ष

12 ज्योतिर्लिंगांपैकी एकच मंदिर उभारल्याची अनेक उदाहरण आहेत. मात्र, युवा गणेश भक्ताने सर्व मंदिरे साकारुन भाविकांना भगवान शिवशंकराच्या सर्व ज्योतीर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन घडवले आहे.

मिरज (सांगली) : सांगली जिल्ह्यातील (Sangli News) मिरजमधील युवा अभियंता सुदन जाधवने आपल्या घरातील गणपतीसमोर 12 ज्योतिर्लिंगाचा देखावा साकारला आहे. थर्माकोल आणि पुठ्ठ्यांच्या माध्यमातून बनविलेली आकर्षक, नक्षीदार व कोरीव 12 मंदिरे लक्ष वेधून घेत आहेत. 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना आणि त्याचा महिमा देखाव्याच्या माध्यमातून मांडण्यात आला आहे. हा देखावा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होताना दिसत आहे. आजवर 12 ज्योतिर्लिंगांपैकी एकच मंदिर उभारल्याची अनेक उदाहरण आहेत. मात्र, युवा गणेश भक्ताने सर्व मंदिरे साकारुन भाविकांना भगवान शिवशंकराच्या सर्व ज्योतीर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन घडवून आणण्याचा प्रयत्न केला आहे. 

म्हणून 12 ज्योतिर्लिंग दर्शन देखावा साकारण्याची कल्पना सुचली

सुदन प्रत्येक वर्षी गणेशोत्सव काळात आपल्या कल्पकतेतून नाविण्यपूर्ण देखावे साकार करत असतो. सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिक विषयावर त्याने अनेक देखावे साकारले आहेत. मागील दोन वर्षात त्याने छत्रपती शिवरायांच्या स्वराज्यातील बारा बलुतेदार आणि शिवरायांचे अपरिचीत शिलेदार या विषयावर ऐतिहासिक देखावे साकारले होते. काही महिन्यांपूर्वी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी गेल्यानंतर त्याला दर्शन रांगेत सुमारे सहा तास उभे रहावे लागले. एकाच मंदिरात इतका वेळ लागत असेल, तर बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन कधी व्हायचे? सर्व ज्योतिर्लिंगांची परिक्रमा करण्यासाठी अनेक दिवस लागतात. त्यामुळे एकाच दिवशी बारा ज्योतिर्लिंगांचे दर्शन झाले तर? हा विचार करुन यंदाच्या गणेशोत्सवात घरातील गणपतीसमोर बारा ज्योतिर्लिंग दर्शन देखावा साकारण्याची कल्पना त्याला सुचली.

पौराणिक कथांच्या मान्यतेनुसार 12 ज्योतिर्लिंगांमध्ये सोमनाथ (वेरावळ,  गुजरात), मल्लिकार्जून (श्रीशैल्यम, आंध्र प्रदेश), महाकालेश्वर (उजैन, मध्य प्रदेश), ओंकारेश्वर (माधांता, मध्यप्रदेश), वैजनाथ (झारखंड), रामेश्वर (रामेश्वरम् तमिळनाडू), नागेश्वर (द्वारका, गुजरात), घृष्णेश्वर (छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र), केदारेश्वर (केदारनाथ, उत्तराखंड), त्र्यंबकेश्वर (नाशिक, महाराष्ट्र), भीमाशंकर (भीमाशंकर, पुणे) या मंदिरांचा समावेश आहे. सुदन याने सदरची सर्व मंदिरे व शिवलिंगांच्या प्रतिकृती हुबेहुब साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

साडेतीन महिने सतत परिश्रम 

सुदनने सर्व मंदिर बनविण्यासाठी आपल्या ऑफीसच्या कामातून वेळात वेळ काढून सुमारे साडेतीन महिने सतत परिश्रम घेतले. इंटरनेटवर सर्व मंदिराची माहिती घेतली. मंदिराचा आकार, स्थापनेची पौराणिक कथा, परंपरा, महत्त्व याची माहिती घेतली. सर्व मंदिराचे फोटो मिळवले. बारा ज्योतिर्लिंग दर्शनाचा आराखडा बनविला. त्यानंतर कागदी पुठ्ठे आणि थर्माकोलचा वापर करुन शिवलिंगांच्या हुबेहुब प्रतिकृती साकारल्या. या प्रतिकृती घरातील गणपती समोर मांडून त्यावर आकर्षक विद्युत रोषणाईही केली. तसेच मंदिरांसमोरच त्या-त्या मंदिरातील शिवलिंगांचीही मांडणी केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Manoj Jarange Patil Defender Car: दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
दोन कोटींची नवीकोरी डिफेंडर कार मनोज जरांगेंना का वापरायला दिली? मालक म्हणाला, 'देवाने माझ्या गाडीत बसावं अशी इच्छा होती...'
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
जरांगे पाटलांच्या ताफ्यातील कारला अपघात, कार्यकर्त्याला डिफेंडरमधून रुग्णालयात नेलं; प्रकृती स्थिर
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
ह्रदयद्रावक दुर्घटना; सांगली जिल्ह्यात शाळकरी विद्यार्थ्यांच्या वाहनाला अपघात, 6 वर्षीय चिमुकली ठार
Manoj Jarange : एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा
एकनाथ शिंदेंची मराठ्यांमधील क्रेझ कमी करण्याचा डाव; मनोज जरांगे यांची शंका, फडणवीसांच्या मंत्र्यावर निशाणा

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
कुंभमेळा बनावट वर्क ऑर्डर, 70 कोटींचे कंत्राट; गिरीश महाजन म्हणाले, आरोपी नातेवाईक असला तरी कडक कारवाई
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
अखेर रायगडमध्ये भरत गोगावले झेंडावंदन करणार; सुनेत्रा पवारांच्याहस्ते बीडमध्ये ध्वजारोहण, पुण्यात कोण?
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
Embed widget