Sangli Crime : शेत जमीन, घर नावावर करत नाही म्हणून मुलाने केला वडिलांचा खून; कडेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना
वडील तानाजी यांच्याकडे शेत जमीन, घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, प्रदीपला दारूचे व्यसन असल्याने तानाजी हे मुलाच्या नावावर घर किंवा शेत जमीन करत नव्हते. याचा राग प्रदीपच्या मनात होता.
Sangli Crime: सांगली जिल्ह्यातील (Sangli News) कडेगाव तालुक्यातील विहापूरमध्ये शेत जमीन आणि घर नावावर करत नसल्याने मुलानेच जन्मदात्या वडिलांचाच खून केल्याची धक्कादायक घटना घडली. नराधम मुलाला पोलिसांनी अटक केली आहे. मयत वडील तानाजी माने विहापूरमध्ये कुटुंबासमवेत राहतात. शेती करून ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते.
मुलगा प्रदीपला दारूचे व्यसन होते. गेल्या काही दिवसापासून त्याने वडील तानाजी यांच्याकडे शेत जमीन व घर नावावर करण्यासाठी तगादा लावला होता. परंतु, प्रदीपला दारूचे व्यसन असल्याने तानाजी हे मुलाच्या नावावर घर किंवा शेत जमीन करत नव्हते. याचा राग प्रदीपच्या मनात होता. याच रागातून प्रदीप हा शनिवारी दुपारी दारू पिऊन घरी आला. त्यानंतर पुन्हा वडील आणि त्याच्यामध्ये वाद झाला. त्यातून प्रदीपने वडील तानाजी यांना बेदम मारहाण करून त्यांचे डोके फरशीवर आपटून ठेचले. गंभीर जखमी झालेल्या तानाजी यांना सांगलीमधील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. तानाजी माने यांच्या खून प्रकरणी त्यांचा मुलगा प्रदीप मानेला कडेगाव पोलिसांनी अटक केली आहे.
पती-पत्नीचा किटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न
सांगली जिल्ह्यातील (Sangli News) विटा शहरामध्ये एका दाम्पत्याने संघर्ष करूनही रस्ता मिळत नसल्याने फेसबुक लाईव्ह करत आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घडली. रस्ता मिळत नसल्याने या पती-पत्नीने हा निर्णय घेतला असल्याने विट्यासह परिसरात मोठी खळबळ माजली आहे. प्रशांत प्रल्हाद कांबळे आणि स्वाती प्रशांत कांबळे असे या पती-पत्नीचे नाव असून त्यांच्यावर विटा येथील ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे आपल्या घराकडे आणि शेताकडे जाणारा रोडला परवानगी मिळत नसल्याच्या कारणातून या दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं समोर येतं आहे. सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. दाम्पत्याने तहसीलदाराकडून आपले काम होत नसल्याचा आरोप केला आहे. याबाबत विटा तहसीलदारांशी संपर्क साधला असता सदर व्यक्ती हा घरासाठी रस्ता मागत होता, पण तो रस्ता देणं हा तहसीलदारांच्या अखात्यारीमधील विषय नाही. याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता, असं फोनवरुन म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या