(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sangli Crime : शिराळा तालुक्यात एकाच परिसरात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू; विषबाधा करून मारण्यात आल्याचा प्राथमिक संशय
सांगली (Sangli News) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. एकाच ठिकाणी पाच गव्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.
Sangli Crime : सांगली (Sangli News) जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील रिळे भागात पाच गव्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे. एकाच ठिकाणी पाच गव्यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. उत्तरीय तपासणीमध्ये विषबाधा झाल्याने या गव्यांचा मृत्यू झाल्याचा पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा प्राथमिक अंदाज आहे. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत आढळले. उत्तरीय तपासणीनंतर मृत जागीच दहन करण्यात आले. मृत गव्यापैकी तीन मादी असून दोन नर आहेत. या प्रकरणी अज्ञाताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुर्गम असलेल्या या परिसरात दोन गवे शंभर मीटर अंतरावर तर तीन गवे अडीचशे मीटर अंतरावर मृतावस्थेत पडले होते. यामुळे यांना विषबाधा करून मारण्यात आल्याचा प्राथमिक संशय आहे. अतिशय दुर्गम असलेल्या या भागात जेसीबीच्या साहाय्याने वाट तयार करत घटनास्थळी पोहोचावे लागले. 5 जानेवारी 2022 रोजी शिराळा शहरानजीक चार तसेच बिऊर, पावलेवाडी, भाटशिरगाव परिसरात आठ गवे दिसले होते. यातील चार गवे तांदूळवाडीच्या दिशेने तर आठ गवे बिऊर येथील जंगल क्षेत्रात गेले होते. मृत गवे त्यापैकीच असावेत असा अंदाज आहे.
19 फेब्रुवारी रोजी दिवसांपूर्वी बिऊर गावच्या हद्दीमध्ये गव्याचा सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला होता. त्याची वैद्यकीय तपासणी केली असता नैसर्गिक मृत्यू झाल्याचा अहवाल मिळाला. मात्र, दिनांक 20 फेब्रुवारी रोजी सकाळी रिळे गावच्या हद्दीमध्ये तीन गवे सडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती नागरिकांनी वन विभागाला दिली. माहितीनुसार, वनक्षेत्रपाल सचिन जाधव आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली असता एक नर आणि एक मादी जातीचे गवे मृतावस्थेत आढळले. वन कर्मचार्यांनी आजूबाजूला पाहणी केली असता आणखी तीन गव्याचे मृतदेह आढळले. रविवारी दोन आणि आज सोमवारी तीन गव्यांचे शवविच्छेदन पशूवैद्यकीय अधिकारी आणि पशूधन विकास अधिकारी इस्लामपूर, शिराळा सांगाव यांच्यामार्फत करण्यात आले. या गव्यांचा मृत्यू चार ते सहा दिवसापुर्वी नैसर्गिक अथवा विषबाधेने झाला असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला.
दरम्यान, या गव्यांच्या मृत्यूची चौकशी करण्यासाठी मृत गव्यांचे मांस, पोटातील अन्नांश, घटनास्थळाची माती आणि जलस्त्रोतातील पाण्याचे नमूने न्यायवैद्यक तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. याबाबत घटनास्थळावरून आणि वन विभागाकडून मिळालेली माहिती अशी, रविवार 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास रिळे येथील वनविभाग सर्वे नंबर 234 च्या लगत दोन नर आणि 1 मादी असे तीन गवे संशयास्पदरित्या मृतावस्थेत पडल्याची माहिती वनविभागास वनक्षेत्रपाल सचिन जाधव, वनपाल चंद्रकांत देशमुख, वनपाल सुरेश चरापले, वनरक्षक हणमंत पाटील, प्रकाश पाटील, अमोल साठे आणि पथकाने घटनास्थळी धाव घेतली. शोधाशोध केली असता परिसरात एकूण पाच गवे संशयितरित्या मृतावस्थेत आढळून आले. मृत गव्यांपैकी दोन गव्यांचे मृतदेह पूर्णपणे सडलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची प्राथमिक तपासणी करून अहवाल तयार करण्यात आला.
पशुवैद्यकीय अधिकारी अंबादास माडकर, शुभांगी अरगडे यांनी मृत झालेल्या सर्व गव्यांची उत्तरीय तपासणी केली. त्यांनी या गव्यांचा मृत्यू आहेत. विषबाधेने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला आहे. घटनास्थळी उप वनसंरक्षक (प्रा.) निता कट्टे, सहा. वनसंरक्षक (वनीकरण) डॉ. अजित साजणे, वनक्षेत्रपाल महंतेश बगले, मानद वन्यजीव रक्षक अजितकुमार पाटील यांनी पाहणी केली. यावेळी रिळेचे सरपंच बाजीराव सपकाळ, पोलिस पाटील सुधीर पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उत्तरीय तपासणीनंतर मृत जागीच दहन करण्यात आले.
महत्वाच्या इतर बातम्या :