एक्स्प्लोर

लेकरांवर लक्ष राहू द्या! आईने कार्टून लावून दिलं, चिमुकल्याला सांभाळायला गेली; अन् इकडे 6 वर्षाच्या मुलीचा बेल्टला फास लागून मृत्यू

सांगली शहरातील सावंत प्लॉट भागात राहणाऱ्या एका 6 वर्षीय मुलीचा खेळता-खेळता कापडी बेल्टने गळफास बसून दुर्दैवी मृत्यू झालाय.

सांगली : लहान मुलं आणि त्यांचे खेळ याकडे पालकांनी वेळोवेळी लक्ष ठेवण्याची गरज आहे. मुलं आसपास असोत किंवा बाहेर खेळत असोत पालकांनी किती सजग राहाणं गरजेचं आहे याचं  एक विदारक चित्र पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. एका  6 वर्षाच्या चिमुकल्या जीवाचा अचानक मृत्यू झाल्याने सांगली (Sangli News)  परिसरात खळबळ उडाली आहे. 

सांगली शहराधील सावंत प्लॉट भागात राहणाऱ्या एका 6 वर्षीय मुलीचा खेळता-खेळता कापडी बेल्टने गळफास बसून दुर्दैवी मृत्यू झालाय. अंजली नितीन खांडेकर असे या चिमुरडी या चिमुरडीचे नाव आहे. खेळता-खेळता कापडी बेल्टने गळफास बसून या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलीय.  वैद्यकीय तपासणीतही मुलीचा गळफास बसून मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. सांगलीच्या सिव्हिल हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस सावंत प्लॉटमध्ये खांडेकर कुटुंब राहते. नितीन खांडेकर हे मार्केट यार्डात हमाली करतात. त्यांना मोठी मुलगी अंजली आणि दोन वर्षाचा मुलगा आहे. अंजली ही वसंत प्राथमिक शाळेत पहिलीच्या वर्गात शिकते. दुपारी शाळा सुटल्यानंतर ती घरी आली. वडील नितीन हे गावाकडे गेले होते. घरात चिमुकली अंजली, आई, छोटा भाऊ आणि आजी असे चौघेजण
होते.

खुंटीला कापडी बेल्टने गळफास

दुपारी चारच्या सुमारास अंजलीला टीव्हीवर कार्टून लावून दिल्यानंतर आई धाकट्या मुलाकडे लक्ष देत होती. थोड्या वेळाने आई बाहेर आली तेव्हा तिला अंजली ही खुंटीला कापडी बेल्टने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळली. त्यामुळे तिला धक्का बसला. तिने आरडाओरड करून शेजारील लोकांना बोलवले. अंजलीला खुंटीवरून खाली काढले. त्यानंतर तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. परंतु ती मृत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

पालकांनी सतत लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं

या घटनेनं खांडेकर कुटुंबावर शोकाचं वातावरण पसरलं. अंजलीचा असा अंत होईल याची कल्पनाही  घरच्यांनी केली नव्हती. मात्र नियतीपुढे कोणाचं काही चालत नाही हेच खरं आहे. अंजलीच्या जाण्यानं कधीही न भरुन येणारी पोकळी कुटुंबियांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळेच आपली मुलं काय करतात याकडे पालकांनी सतत लक्ष ठेवणं अत्यंत गरजेचं आहे.

हे ही वाचा :

चॉकलेटचं आमिष दाखवून 3 चिमुकल्यांवर अत्याचार; बदलापूर घटनेची जखम ताजी असतानाच अकोल्यात पुनरावृत्ती

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special ReportSantosh Deshmukh Case | संतोष देशमुखांच्या हत्येच्या आधी काय घडलं? Special ReportTorres Scam Mumbai | मुंबईतील टोरेस फसवणुकीमागचे मास्टरमाईंड कोण? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
माज आणि मुजोरी! पुण्यात नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
वाल्मिकचा सहकारी पैसे नेतानाचा फोटो समोर, 140 यंत्र मालकांचे 11 कोटी; परत मागितल्यास दिली धमकी
जिल्हा परिषदेच्या आदिवासी शाळेतील विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
जिल्हा परिषदेच्या आदिवासी विद्यार्थ्यांची कमाल, फाडफाड इंग्लिश बोलणं, दोन्ही हातांनी लिखाण, टॅलेंट पाहून तुम्हीही थक्क व्हाल!
Ajit pawar: बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
बारामतीत अजित पवारांनी रिबीन कापली, सुप्रिया सुळेंनी टाळ्या वाजवल्या; पण दादा-ताईंचा अबोला कायम
Embed widget