एक्स्प्लोर

Sharad Pawar on PM Modi : मोदी घटना बदलणार नाही म्हणतात, मग खासदार वेगळं कसं काय बोलतात? शरद पवारांचा सवाल

पीएम मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल त्यांनी मोदींना केला. आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

शिराळा : पंतप्रधान मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला. शिराळ्यात हातकणंगले लोकसभा उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांच्या प्रचारार्थ सभा झाली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी तोफ डागली. 

घटना बदलायची आहे असे मोदीचेच खासदार सांगतात

शरद पवार सभेला संबोधित करताना म्हणाले की, देशाची घटना बदलायची आहे असे मोदींचेच खासदार सांगतात. उत्तर प्रदेशमधील खासदार 400 पेशा जागा द्या, म्हणजे घटना बदलता येईल असे म्हणाले. मोदी घटना बदलायची नाही म्हणतात आणि खासदार असे वेगळे कसे काय बोलतात? असा सवाल त्यांनी मोदींना केला. आता पुन्हा सत्ता आल्यावर हे देखील करू शकतात, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सर्वांनी मविआला मदत करण्याची गरज असून मविआचे खासदार संसदेत जास्तीत जास्त गेले पाहिजेत, असे आवाहन त्यांनी केले. 

ते पुढे म्हणाले की,या देशात वेगळी परिस्थिती निर्माण झाली आहे. देश मोदींच्या हातात गेला आहे. 2014 मध्ये सत्तेतवर आले तेव्हा पेट्रोलचे दर कमी करू असे म्हटले होते. त्यावेळी 71 रुपये असणारा दर आता शंभर रुपयांच्या वर गेले आहेत. सिलेंडरचे दर कमी करू म्हटले, पण ते ही दर कमी झाले नाहीत. त्यांनी सांगितले की, दिल्लीचा मुख्यमंत्री चांगले काम करून देखील आज तुरुंगात आहे, दिल्लीचा चेहरा केजरीवाल यांनी बदलला. अटक करण्याची काय आवश्यकता होती? आपण हुकुमशाहीच्या दिशेने चाललो आहे का? विचारणा त्यांनी केली.

शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र ताकद लावतोय

दरम्यान, या सभेत बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संबोधित केले. ते म्हणाले की, ही निवडणूक आपण जिंकू शकतो. सत्यजित पाटील विजयी होतील हा विश्वास लोक देत आहेत. देशातील परिस्थिती पाहत असून शरद पवार यांना प्रतिसाद मिळत आहे.  शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या मागे महाराष्ट्र आपली ताकद लावत असल्याचे म्हणाले.  

जयंत पाटील यांनी सांगितले की, मतदान झालेल्या ठिकाणी मविआच्या बाजूने निकाल लागेल असा अंदाज आहे. सत्यजित पाटील यांना शिराळा, वाळवा तालुक्यात चांगले मताधिक्य मिळेल. ते पुढे म्हणाले की, मोदींमुळे नव्हे तर पवारांमुळेच एफआरपी वाढली आहे. शरद पवार कृषिमंत्री झाले तेव्हा ऊस उत्पादकांसोबत एक फॉर्म्युला तयार केला आहे. ज्यामुळे दरवर्षी एफआरपी वाढत आहे. भाजपने शेती उत्पादनाबाबत अडचणी आणल्या आणि कमी म्हणून शेती अवजारावर कर लावल्याचा टीकाही त्यांनी केली. 

इतर महत्वाच्या बातम्या 

महत्त्वाच्या बातम्या

Sangli Crime : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करून संपवलं; नराधमाला मरेपर्यंत फाशीची शिक्षा, दीड वर्षात सुनावणी पूर्ण
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
आज आंदोलकांना घाबरवलं, उद्या सामान्य माणसालाही अडकवतील, धमकी देणाऱ्या पोलिसांचा मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब बंदोबस्त करावा : जयंत पाटील
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
तू ऊसात चल... सुनेचा विनयभंग करणाऱ्याला जाब विचारला; 70 वर्षीय सासऱ्यालाच संपवलं, परप्रांतीय मजुराला अटक
Jejuri Warkari Accident: जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप
जेजुरीतील वारकऱ्यांच्या अपघाताला पोलीस प्रशासनाचा नियोजन शून्य कारभारच जबाबदार; वारकरी साहित्य परिषदेच्या अध्यक्षांचा गंभीर आरोप

व्हिडीओ

Special Report on Palghar : खड्ड्यांत महामार्ग, धोक्यात प्रवास, मनोर-भिवंडी मार्ग मृत्यूचा प्रवास | ABP Majha
Maharashtra Freedom Conversion Act : धर्मांतरावर बंधन, कायद्याचं संरक्षण, विरोधकांचं आक्षेप का?
Dhananjay Munde On Gym : सर्वच क्षेत्रातलं वजन कमी झालंय, मी जिम करतोय
Tukaram Mundhe at Majha Katta | तुकाराम मुंढे कसे घडले?, डॅशिंग अधिकाऱ्याचा बेधडक कट्टा
Nitesh Rane on Sanjay Raut : संजय राऊत 420, अमित शाहांवर टीका करण्याची त्याची लायकी नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhijeet Dipke : लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
लाठीचार्ज झाल्यानंतर सगळे संतापले, मी फुटपाथवर रडत बसलो, पण...; 20 जुलैला नेमकं काय झालं? अभिजीत दिपकेंची पुढची भूमिका काय?
Ajinkya Rahane : निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
निवृत्त झाल्यानंतर अजिंक्य रहाणेला BCCI दरमहा किती पेन्शन देणार? मुंबई क्रिकेट असोसिएशन किती पैसे देणार? 
Silver Foil On Sweets : मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
मिठाईवर लावलेला चकाकणारा चांदीचा वर्ख शुद्ध आहे की भेसळयुक्त? जाणून घ्या ओळखण्याची सोपी पद्धत
PM Modi : आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
आधी मुलीने माफी मागितली, आता आईने मोदींचे आभार मानले, म्हणाली... पंतप्रधानांनी माफ केल्याने मुलीला नवीन जीवन मिळाले
Abhijeet Dipke: अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
अभिजित दिपकेंच्या वडिलांच्या संपत्तीच्या चौकशीची मागणी करणारे गुजराती अमित तिवारी आहे तरी कोण?
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
केरळ आणि कर्नाटकमध्ये पावसाचे थैमान, भूस्खलनामुळे 11 जणांचा जीव गेला, 8 बेपत्ता; किश्तवारमध्ये ढगफुटीमुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले, बद्रीनाथ महामार्ग तब्बल 20 मीटर खचला
Bankipur by-election: बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
बिहार पोटनिवडणुकीचा धडकी भरवणारा एक्झिट पोल, भाजपला विद्यार्थी आंदोलनाचा पहिला फटका बसणार, प्रशांत किशोर इतिहास घडवणार?
Devendra Fadnavis: तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
तज्ज्ञांच्या मते किमान 70 टक्के रोजगाराचे स्वरूप येणाऱ्या दिवसात AI मुळे बदलेल; रोजगार जाणार नाही, पण...; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Embed widget