Sangli : मिरज शहरात घरे व दुकाने जमीनदोस्त करणाऱ्यांवर कडक कारवाई करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी
Sangli Crime: ब्रम्हानंद पडळकर व त्यांच्या गुंडावर पोलिसांनी कोणती कलमे लावली आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हा शहरवासीयांना मिळायला पाहिजेत, अशी मागणी राष्ट्रवादीकडून निवेदनातून करण्यात आली आहे.
Sangli Crime : मिरज शहरातील एसटी स्टँडसमोरील जागा ताब्यात घेणाऱ्या गुंडांनी मध्यरात्री गोरगरिबांची दुकाने व घरे उद्ध्वस्त केली. यासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने आज जिल्हाधिकारी व पोलिस जिल्हापोलिस प्रमुख यांना निवेदन देण्यात आले. मिरज शहरावर दहशतवादी हल्ला करणाऱ्यांना जबर शिक्षा झाली पाहिजे, असेही राष्ट्रवादीने म्हटले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांनी पाच सहा जेसीबीच्या सहाय्याने चारशे-पाचशे गुंड आणून मिरज शहरात दहशत निर्माण केली. स्वतःला वंचितांचे कैवारी समजणाऱ्या लोकांनीच वंचितांची व गरिबांची दुकाने व घरे उद्ध्वस्त केल्याचे राष्ट्रवादीने म्हटले आहे.
राष्ट्रवादीने म्हटले आहे की, या ठिकाणी अनेक लोक जखमी झाले यावर पोलिसांनी काय कारवाई केली? हा हल्ला हा सांगली ,मिरज व कुपवाड महानगरपालिका शहरांवर बाहेरच्या गुंडांनी केलेला हल्ला आहे. शहराच्या अस्मितेवर घाला घालण्याचा प्रकार असून या प्रकरणामध्ये महसूल व पोलिस अधिकाऱ्यांची भूमिका नेमकी काय होती? ब्रम्हानंद पडळकर व त्यांच्या गुंडावर पोलिसांनी कोणती कलमे लावली आहेत, या सर्व प्रश्नांची उत्तरे आम्हा शहरवासीयांना मिळायला पाहिजेत.
राष्ट्रवादीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पोलिस अधिकारी यांनी हे सर्व घडू कसे दिले? पोलिसांची गस्त त्या दिवशी नव्हती का? कोणत्या राजकीय नेत्यांच्या व अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने हे घडले याचा तपास करून सोक्षमोक्ष लागला पाहिजे, अतिक्रमण काढण्याचा कायद्याने अधिकार कोणाचा? उद्या एखादी घटना घडली तर प्रशासन स्वतः कारवाई करणार की ज्याचा त्याला रस्त्यावर न्याय निवाडा करायला सांगणार? अशी विचारणा केली आहे.
जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस प्रमुख यांनी दखल घेऊन कडक कारवाई करावी अन्यथा न्याय मागण्यासाठी आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी शहर जिल्हाध्यक्ष संजयजी बजाज, महापौर दिग्विजय सुर्यवंशी, सांगली विधानसभा क्षेत्राध्यक्ष पद्माकर जगदाळे, बाळासाहेब व्हनमोरे, प्रमोद इनामदार, हरिदास पाटील, अतहर नायकवडी, विष्णू माने, शेडजी मोहिते, मुस्ताक अली रंगरेज, हारून खतीब, समीर कुपवाडे, युवराज गायकवाड, अभिजित कोळी, विज्ञान माने, संदीप व्हनमाने, डॉ. शुभम जाधव, आकाराम कोळेकर, अर्जुन कांबळे, निलेश शहा, महालिंग हेगडे, मदन पाटील, मुन्ना शेख, कुमार वायदंडे, सचिन जाधव, रुपेंद्र जावळे, विजय नाईक, सैफ भालदार, सुभाष तोडकर, समाधान मोहिते, सचिन केंचे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
इतर महत्वाच्या बातम्या