Sangli News : खानापूर तालुक्यातील लेंगरे ते उत्तराखंडमधील केदारनाथ! शिवभक्त अमर मानेचा दोन हजार किमी पायी प्रवास
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे ते उत्तराखंडमधील केदारनाथ हे सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर अमर संभाजी माने या ध्येयवेडया आणि निस्सीम शिवभक्त असलेल्या युवकाने पायी पूर्ण केलं आहे.
Sangli News : सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील लेंगरे ते उत्तराखंडमधील केदारनाथ हे सुमारे दोन हजार किलोमीटरचे अंतर अमर संभाजी माने या ध्येयवेडया आणि निस्सीम शिवभक्त असलेल्या युवकाने पायी पूर्ण केलं आहे. अमर माने याचा हा गेल्या 40 दिवसांचा लेंगरे ते केदारनाथपर्यंतचा पायी प्रवास कौतुकाचा विषय ठरला आहे.
खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील अमर संभाजी माने हा महादेवाचा निस्सीम भक्त आहे. लेंगरेतून आपल्याला केदारनाथ येथे पायी जायचे आहे, असा संकल्प त्याने दोन वर्षांपूर्वी सोडला होता. हा प्रवास त्याने यशस्वी पूर्ण केला आहे. सुमारे दोन हजार किलोमीटर केदारनाथाच्या दर्शनासाठी निघालेला अमर माने हा लेंगरे, फलटण, बारामती, अहमदनगर, शिर्डी, मालेगाव, धुळे, पळसनेर, जुलवानिया, इंदौर, सारंगपुर, बीनागंज, बदरवास, ग्वालियर, आग्रा, अलीगढ, मेरठ, बहादरबाद मार्गे हरिद्वार मार्गे केदरनाथपर्यंत प्रवास झाला.
या प्रवासात लेंगरतील योगेश कोले व बबलु मणेर यांनी अमरबरोबर तीस दिवसांहून अधिक साथ दिली. अमरच्या प्रवासातील सर्व नियोजन यांनी केले. पायी प्रवासात त्याला अनेक गलाई बांधवांनी व ग्रामस्थांनी सर्वतोपरी मदत केली. एकूणच शिवभक्त अमरचा हा पायी प्रवास आणि निस्सीम शिवभक्ती सध्या खानापूर तालुक्यात कौतुकाचा विषय बनली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या