(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brinda Karat : यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार वृंदा करात यांना जाहीर
वृंदा करात या विद्यार्थीदशेपासून एसएफआयच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नांवर संघर्ष करीत आहेत. लंडन येथील एअर इंडियाच्या प्रशासनाविरुद्ध त्यांनी हवाई सुंदरीच्या युनिफार्मसाठी संघर्ष केला होता.
Brinda Karat : क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाकडून देण्यात येणारा यंदाचा क्रांतिसिंह नाना पाटील सामाजिक पुरस्कार वृंदा करात यांना जाहीर झाला आहे. विटा येथे क्रांतिसिंह नाना पाटील सभागृहात ६ ऑगस्टला प्रा. डॉ. तारा भवाळकर यांचे अध्यक्षतेखाली प्राचार्य विश्वास सायनाकर यांचे हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होईल. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, २१ हजार रोख रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वृंदा करात या विद्यार्थीदशेपासून एसएफआयच्या माध्यमातून विद्यार्थी प्रश्नांवर संघर्ष करीत आहेत. लंडन येथील एअर इंडियाच्या प्रशासनाविरुद्ध त्यांनी हवाई सुंदरीच्या युनिफार्मसाठी संघर्ष केला होता. दिल्लीमधील कापड गिरणी मजुरांमध्ये 'ऑल सिटू' या कामगार संघटनेत करात यांनी भरीव काम केलं आहे.
2005 मध्ये पश्चिम बंगालमधून त्या माकपच्यावतीने राज्यसभेच्या सदस्य म्हणून निवडून आल्या होत्या. माकपच्या पॉलिट ब्युरो सदस्यपदी त्यांची निवड झाली होती. दिल्लीमध्ये सामान्य लोकांच्या घरावर बुलडोझर फिरविण्यात आला. त्याविरोधात करात यांनी सर्वोच्च न्यायालयाची मनाई घेऊन सामान्यांना दिलासा दिला. त्यांची सामान्य माणसाप्रती असलेली बांधिलकी आणि योगदान लक्षात घेऊन त्यांना क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाने प्रतिष्ठेचा पुरस्कार देणेचे निश्चित केले आहे.
क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्काराचे आतापर्यंतचे मानकरी
लोकविद्यापीठाच्या आचार्य शांताराम गरुड, क्रांतिवीर नागनाथ आण्णा नायकवडी, प्रा. एन. डी. वतीने दिला पाटील, माजी आमदार भाई गणपतराव देशमुख, साथी मृणालताई गोरे, मेघाताई पाटणकर, , विकास आमटे, प्रा. डॉ. आ. ह. साळुंखे, डॉ. अभय बंग, पत्रकार पी. साईनाथ, कॉ. अशोक ढवळे, कॉम्रेड सीताराम येचुरी, भाषातज्ज्ञ डॉ. गणेश देवी, कॉम्रेड भालचंद्र कानगो आदींना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या