Gopichand Padalkar on Jayant Patil: राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा यंदा धुराडा पेटू देणार नाही; गोपीचंद पडळकरांचा जयंत पाटलांना इशारा
Gopichand Padalkar on Jayant Patil: जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू, र स्त्यावरची लढाई करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.

Gopichand Padalkar on Jayant Patil: भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आमदार जयंत पाटील यांच्यावर (Gopichand Padalkar on Jayant Patil) पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जयंत पाटील यांच्या नेतृत्वातील जतच्या राजारामबापू पाटील साखर कारखान्याचा धुराडा यंदा पेटू देणार नाही असा गर्भित इशारा गोपीचंद पडळकर यांनी दिला. जतचा साखर कारखाना हा सभासदांचा असून तो त्यांना परत मिळवून देण्यासाठी मोठा संघर्ष करू, प्रसंगी कायदेशीर आणि रस्त्यावरची लढाई करणार असल्याचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले.
जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका
जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील असणाऱ्या राजारामबापू साखर कारखान्याकडे जतचा साखर कारखाना आहे. कारखाना ढापण्यात आला असून तो सभासदांच्या मालकीचा झाला पाहिजे, अशी भूमिका आता गोपीचंद पडळकर यांनी यंदा राजरामबापू साखर कारखाना सुरू होऊ देणार नाही, असा इशारा देत जयंत पाटील यांची कोंडी करण्याची भूमिका घेतली आहे.
गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार
दुसरीकडे, यंदाचा उसाचा गळीत हंगाम येत्या 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. दरम्यान, कर्नाटकातील कारखान्यांबरोबर सीमेलगतच्या कारखान्यांना हंगाम सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील ऊस कर्नाटकात जाऊ नये म्हणून राज्य सरकारनं हा निर्णय घेतला आहे. या हंगामात एकूण 1 हजार 250 लाख टन ऊस उपलब्ध असेल असा अंदाज देण्यात आला आहे.
राजू शेट्टींकडून विनाकपात 3 हजार 751 उचल देण्याची मागणी
दुसरीकडे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी 24व्या ऊस परिषदेत गत हंगामातील तुटलेल्या ऊसाला प्रतिटन एफ. आर. पी. अधिक 200 रूपये प्रमाणे अंतिम बिल देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. चालू गळीत हंगामात तुटणाऱ्या ऊसाला साखर कारखान्यांनी प्रतिटन 3 हजार 751 रुपयांची विनाकपात पहिली उचल देण्यात द्यावी अशी मागणी देखील राजू शेट्टी यांनी केली आहे जर उचल नाही, दिली तर कोयता लावून दाखवाच, असा इशारा दिला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
















