Vishwajeet Kadam : येत्या काळात लाडके आजोबा, लाडकी आजी, लाडकी मुलगी योजना पहायला मिळतील; काँग्रेस आमदाराची खोचक टीका
Vishwajeet Kadam : येणाऱ्या काळामध्ये लाडके आजोबा, लाडके आजी, लाडकी मुलगी अशा योजना आगामी काळात पहावयास मिळतील, अशी खोचक टीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली.
सांगली : काँग्रेस आमदार, माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी महायुतीय सरकारने आणलेल्या लाडकी बहीण आणि लाडका भाऊ या योजनेवरून जोरदार टीका केली आहे. सांगलीत आमदार जयंत आसगावकर यांनी आयोजित केलेल्या शाळांना प्रिंटर वाटप या कार्यक्रमात कदम बोलत होते.
अशा योजना आगामी काळात पहावयास मिळतील
विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन महायुती सरकारकडून लाडकी बहीण, लाडका भाऊ या योजना राबवल्या जात आहेत. येणाऱ्या काळामध्ये लाडके आजोबा, लाडके आजी, लाडकी मुलगी अशा योजना आगामी काळात पहावयास मिळतील, अशी खोचक टीका काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी केली.
या साऱ्या योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरत्याच
विश्वजित कदम म्हणाले की, या योजनातून जनतेची फसवणूक होऊ नये हीच अपेक्षा आहे. विश्वजीत कदम यांनी लाडकी बहीण आणि लाडका भाऊ योजनेवर टीका केली. सरकार या साऱ्या योजना येणाऱ्या विधानसभा निवडणुकीपुरत्याच आहेत. हे महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे. झोपलेलं सरकार लोकसभा निवडणुकीनंतर जागं होऊन या योजना आणत आहे.या योजनेचा सर्वसामान्य जनतेला फायदा होणार असेल, तर त्याला आमचा पाठिंबा आहे. पण या योजनेतून जनतेची दिशाभूल होऊ नये, फसवणूक होऊ नये एवढीच आमची अपेक्षा असल्याचे काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांनी म्हटलं आहे.
अर्ज करण्यासाठी अडचणी, सरकारकडून पुन्हा मोठा बदल
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे आणि सुलभतेनं व्हावी याबाबत या योजनेच्या अटींमध्ये आता नव्यानं सुधारणा करण्यात आल्या आहेत. या योजनेसाठी महिलांना वेगवेगळ्या पद्धतीनं फॉर्म भरण्याची सोय करून देण्यात आली आहे. महिला नारीशक्ती, पोर्टल या वेगवेगळ्या माध्यमातून हा अर्ज करू शकतात. याआधी महिलांना अर्ज करताना आपला लाईव्ह फोटो द्यावा लागायचा. पण आता नव्या निर्णयाअंतर्गत तशी गरज भासणार नाही, असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे.
नव्या शासन निर्णयाच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरणं सोपं व्हावं यासाठी महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाअंतर्गत आता योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो काढून तो ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे. म्हणजेच आता महिलांना फॉर्म भरताना आता स्वत:चा लाईव्ह फोटो देण्याची गरज नाही.
इतर महत्वाच्या बातम्या