एक्स्प्लोर

Sangli News : सौद्यासाठी हळद घेऊन जाणाऱ्या शेतकऱ्याला 30 हजारांचा दंड, सदाभाऊ खोत यांचे आरटीओ कार्यालयात हल्लाबोल आंदोलन

अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे शेतमाल बाजार समितीत विक्रीस घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अशा पध्दतीने अडवून शेतकऱ्यांना लुटले जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. 

Sadabhau Khot : सौद्यासाठी हळद घेऊन राहुरीहून सांगलीकडे (Sangli News) येणारी गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी अडवत 30 हजाराचा दंड केला होता. ही घटना समजताच माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी थेट आरटीओ कार्यालयात हल्लाबोल आंदोलन करत अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले. एकीकडे अवकाळी पावसाने शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांच्या गाड्या अशा पद्धतीने अडवून शेतकऱ्यांना लुटले जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी केला. 

शिवाजी यादव वने असे अडवणूक केलेल्या राहुरीच्या शेतकऱ्यांचे नाव आहे. इस्लामपूरजवळ पेठ नाका येथे वने यांची हळद असलेली गाडी अधिकाऱ्यांनी अडवत 30 हजारांचा दंड करत गाडी सांगलीजवळील सावळी येथील आरटीओ कार्यालयात आणून लावली होती. या कार्यालयावरच हल्लाबोल करत सदाभाऊ खोत यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करत अधिकारी शेतकऱ्यांनाच लुटत असल्याचा आरोप केला. 

आरटीओ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले

यानंतर सावळी येथील आरटीओ कार्यालयामध्ये सदाभाऊ खोत यांनी हल्लाबोल आंदोलन करत आरटीओ कार्यालयात हळदीची पोती ओतून सौदेबाजी आंदोलन केले. हळदीची पोती असलेली गाडी ओव्हरलोड आहे आणि गाडीचा इन्शुरन्स संपलाय म्हणून आरटीओ अधिकाऱ्यांनी 30 हजार इतका दंड केला होता. ही बाब राहुरीचे शेतकरी शिवाजी यादव वने यांनी सदाभाऊ खोत यांच्या कानावर घातली. त्यावेळी संतप्त झालेल्या सदाभाऊ खोत यांनी आरटीओ अधिकाऱ्यांना खडे बोल सुनावले आणि संताप व्यक्त केला.

राज्य सरकारने एकदा ठरवावं शेतकऱ्यांनी जगावं की मरावं?

यावेळी राज्य सरकार आणि आरटीओ खात्याच्या कारभारावर सदाभाऊ खोत यांनी संताप व्यक्त करत एकीकडे अवकाळीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्याला दुसरीकडे अशा पद्धतीने लुटले जात असल्याचा आरोप सदाभाऊ खोत यांनी यावेळी केला. राज्य सरकारने एकदाचा ठरवावं शेतकऱ्यांनी जगावं की मरावं? जनतेला लुटणाऱ्या सरकारच्या लाडवलेल्या जावयांना सरकार आवरणार की नाही? अधिकाऱ्यांचा माजुरपणा सरकारने थांबवावा असा इशाराही सदाभाऊ खोत यांनी सरकारला दिला.

काय घडला प्रकार?

पेठ नाका येथे ही गाडी अडवत दंड केल्यानंतर हळद असलेली गाडी आरटीओ अधिकाऱ्यांनी कुपवाड भागातील सावळी येथील आरटीओ कार्यालयामध्ये आणून उभी केली होती. दंड भरा आणि हळदीची पोती असलेली गाडी घेऊन जावा असं शेतकऱ्याला सांगण्यात आलं होतं. त्यामुळे सदाभाऊ खोत यांनी थेट सावळीच्या आरटीओ कार्यालयात जात गाडीतील हळदीची पोती कार्यालयाच्या प्रांगणात ओतून हळदीचा लिलाव सुरु केला. 

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nanded  : नांदेडच्या परांडात अंधश्रद्धेच्या कारणावरून 7 वर्षीय चिमुरडीचं अपहरणShivsena Melava : दोन्ही शिवसेनेच्या मेळाव्याची तयारी, बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीनिमित्त आयोजनWalmik karad Audio Clip : कराडसंबंधीत सनी आठवले नावाच्या तरुणानं प्रसिद्ध केली धक्कादायक ऑडिओ क्लिपEknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
राज ठाकरेंनी नाशकात पाय ठेवताच भाजपच्या महिला आमदार भेटीसाठी दाखल; नेमकं कारण काय?
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
शिवसेनेचं ऑपरेशन शिवधनुष्य अन् टायगर; ठाकरेंना दे धक्का, मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
IPhone अन् अँड्रॉईड युजर्संसाठी वेगवेगळं भाडं; ओला, उबर कंपनीला केंद्राची नोटीस, हे काय लावलंय?
Parli : आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
आर्थिक घोटाळ्याचे परळी कनेक्शन; पंढरपुरातील 30 ठेवीदारांना एक कोटीचा गंडा 
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Video: व्हॉलीबॉल टोलवताना क्रीडामंत्री भरणेमामा कोसळले, थोडक्यात बचावले; व्हिडिओ व्हायरल
Rohit Pawar : पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
पोटदुखी सांगून सहानुभूती...; रोहित पवारांचा वाल्मिक कराडबाबत खळबळजनक दावा; नेमकं काय म्हणाले?
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
मोठी बातमी! रामगोपाल वर्माला अटक करा, 3 महिन्यांचा तुरुंगवास; 7 वर्षांपूर्वीच्या खटल्यात न्यायालयाचा निकाल
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
वाल्मिक कराड रात्री रुग्णालयात दाखल; आज अचानक जामीन अर्ज मागे घेतला, एका दिवसांत नेमकं काय घडलं?
Embed widget