एक्स्प्लोर

Dhairyasheel Mane : 'देवाच्या नावावर नांगर फिरवायचं काम करत असेल तर'; काँग्रेसच्या मोर्चातून धैर्यशील मानेंचा 'शक्तीपीठ'वरून शिंदे सरकारला घरचा आहेर!

Dhairyasheel Mane : नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज नाही. देशात नव्याने राम मंदिर बांधण्यात आले. परंतु या मंदिरासाठी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्याची गरज आहे का? असे ते म्हणाले.

सांगली : शक्तिपीठ महामार्ग (Shaktipeeth Expressway) हा शक्ती वाढविणार आहे की शक्ती काढून घेणार आहे हेच कळत नाही. आपल्या सर्व संकटावर मात करण्यासाठी परमेश्वर असतो. परमेश्वराच्या नावावर कोण नांगर फिरवायचं काम करत असेल तर त्यांना देव देखील माफ करणार नाही, अशा शब्दात शिंदे गटाचे खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटाला घरचा आहेर दिला. शक्तिपीठ महामार्गावरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कडाडून विरोध सुरु आहे. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. 

देवाच्या नावावर जर काढून घेतली जात असेल तर ते योग्य नाही

धैर्यशील माने म्हणाले की, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडे कमी जमिनी आणि उताराच्या जमिनी आहेत. तरुणाकडे नोकऱ्या नाहीत. आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. शेतकऱ्यांच्या हातामध्ये जेवढी जमीन शिल्लक राहिली आहे. ती देखील देवाच्या नावावर जर काढून घेतली जात असेल तर ते योग्य नाही, आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत. शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी मी स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत याबाबत चर्चा करणार आहे. 

धैर्यशील मानेंचा घरचा आहेर

माने यांनी  शक्तीपीठाच्या नावाखाली सरकारकडून नवा घाट घातला जात असल्याचे म्हणत महायुती सरकारला घरचा आहेर दिला. नागपूरपासून ते नृसिंहवाडीपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं आहे. नव्याने इन्फ्रास्ट्रक्चर तयार करण्याची गरज नाही. देशात नव्याने राम मंदिर बांधण्यात आले. परंतु या मंदिरासाठी जाण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग करण्याची गरज आहे का? तसेच आमच्या देवस्थानाकडे येण्यासाठी महामार्ग नव्याने करण्याची गरज नाही.

शासनाचा विरोध पत्करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू

आमच्या देवाधर्माकडे जाण्यासाठी यापूर्वीच रस्ते आहेत. मी आणि खासदार विशाल पाटील आम्ही दोघेही तरुण खासदार असून दोघेही या शक्तीपीठ महामार्गात विरोधात लोकसभेत आवाज उठवू. आम्ही शासनाच्या बाजूला आहोत. परंतु, जेव्हा शेतकऱ्यांचा विषय येईल तेव्हा आम्ही शासनाचा विरोध पत्करून शेतकऱ्यांच्या बाजूने उभे राहू. असे सांगत धैर्यशील माने यांनी शक्तिपीठ महामार्गासाठी घाट घातलेल्या महायुती सरकारवर टीका केली.

हजारो शेतकरी मोर्चाने मुख्यमंत्र्यांना जाब विचारणार

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध सुरु आहे. त्यामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून शेतकरी जोरदार विरोध करत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शक्तीपीठ महामार्ग होणार असल्याचे संकेत दिल्यानंतर शेतकरी पुन्हा आक्रोश करत आहेत. मुख्यमंत्री 25 जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत असल्याने हजारो शेतकरी मोर्चाने जाब विचारणार आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील महायुती आणि महाविकास आघाडीकडून या महामार्गाला विरोध सुरु आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
Vidhansabha 2024 : निवडणूक काळात ATM व्हॅनला निर्बंध, तक्रारीसाठी ॲप; आयोगाने दिली महत्त्वाची माहिती
निवडणूक काळात ATM व्हॅनला निर्बंध, तक्रारीसाठी ॲप; आयोगाने दिली महत्त्वाची माहिती
Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Kedar Dighe on Dharmaveer 2 : दिघेंना संपवण्यात आलं?शिरसाटांच्या  दाव्यावर केदार दिघे काय म्हणाले?Sanjay Shirsat On Anand Dighe Death : आनंद दिघेंना मारलं गेलं, ठाणे जिल्ह्याला माहिती -शिरसाटAaditya Thackeray : सिनेटप्रमाणेच विधानसभेतही मोठा विजय मिळवणार : आदित्य ठाकरेVarun Sardesai on Senate Election: आमचीच खरी युवासेना हे सिद्ध झालं : वरुण सरदेसाई

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pravin Tarde: 'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'आम्ही काय राजकारणी लोक नाहीत...', सुषमा अंधारेंच्या पोस्टवर प्रवीण तरडेंचं रोखठोक भाष्य, चित्रपट पहिला नाही त्यांनी भाष्य करू नये..
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
'धर्मवीर 2' वरुन शिरसाट-दिघेंमध्ये जुंपली; आनंद दिघेंच्या मृत्यूबाबत पुतण्यानं स्पष्टच सांगितलं
Vidhansabha 2024 : निवडणूक काळात ATM व्हॅनला निर्बंध, तक्रारीसाठी ॲप; आयोगाने दिली महत्त्वाची माहिती
निवडणूक काळात ATM व्हॅनला निर्बंध, तक्रारीसाठी ॲप; आयोगाने दिली महत्त्वाची माहिती
Beed: सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
सासऱ्याच्या प्रेमविवाहाचं खापर सुनेवर! पुढच्या 7 पिढ्यांना बहिष्कार टाकण्याचा जातपंचायतीचा निर्वाळा
Chhagan Bhujbal : रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले; जाणून घ्या राज'कारण'
रुग्णालयातून थेट विमानाने नाशिकला, छगन भुजबळ मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमासाठी आले; जाणून घ्या राज'कारण'
vishal Patil on Sanjay Patil : लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झालेत, 60 कोटींचा मलिदा खायला संजयकाका कवठेमहांकाळला आलेत, विशाल  पाटलांचा कडाडून हल्लाबोल
लोकसभा निकालाने वैफल्यग्रस्त झालेत, 60 कोटींचा मलिदा खायला संजयकाका कवठेमहांकाळला आलेत, विशाल पाटलांचा कडाडून हल्लाबोल
Eknath Khadse on Girish Mahajan : पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
पक्षप्रवेशाला नकार दर्शवलेल्या महाजनांवर खडसेंनी काढला जाळ; म्हणाले, 'गिरीश महाजनांचं कर्तृत्व शून्य, देवेंद्रजींच्या छत्रछायेखाली...'
Hassan Nasrallah : काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
काही दिवसांपूर्वीच पहिल्यांदाच समोर येत म्हणाला, कदाचित मी जिवंत राहिलो तर! अन् आता हिजबुल्लाह प्रमुखचा खात्मा; इस्त्रायली आर्मीचा दावा
Embed widget