एक्स्प्लोर

Ajit Pawar : राज्यामध्ये आता आपल्याला नवीन टीम करायची आहे, सर्वांनी जोमाने कामाला लागू; अजित पवारांचा सांगलीतून कानमंत्र

सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्याचे चित्र आहे.

सांगली : राज्यामध्ये आता आपल्याला नवीन टीम करायची आहे. त्यामुळे आता सर्वांनी जोमाने कामाला लागू. वैभव पाटलांना माझ्यापासून मी कधीही अंतर पडू देणार नाही, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. कोल्हापूरच्या सभेसाठी जात असताना हायवेवरील केदारवाडी फाटा येथे वैभव पाटील यांनी अजित पवार यांच्या आयोजित केलेल्या सत्कार आणि स्वागत समारंभ प्रसंगी अजित पवार बोलत होते. यावेळी वैभव पाटील यांनी हजारो  कार्यकर्त्यासह अजित पवार यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादीत अजित पवार गटाने केलेल्या बंडानंतर सांगली जिल्ह्यातील खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील आणि त्यांचे चिरंजीव विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी वेगवेगळ्या वाटा निवडल्याचे चित्र आहे. माजी आमदारांनी शरद पवार गटासोबत राहणे पसंत केल्याचे दिसून येतंय तर वैभव पाटील यांनी उघडपणे भूमिका घेत अजित पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. 

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या कुटुंबातही दोन गट

सांगलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल जिल्हाभरातील पदाधिकाऱ्याची बैठक घेतली होती. या बैठकीत सदाशिवराव पाटील यांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे सदाशिवराव पाटील शरद पवार गटासोबत राहणार असल्याचे स्पष्ट झाले. दुसरीकडे वैभव पाटील मात्र अजित पवार गटात गेल्याने वैभव पाटील यांचा गट रिचार्ज झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार रविवारी कोल्हापूर जिल्ह्यात उत्तर सभेसाठी जात असताना पवार यांचा ताफा पुणे-बंगळुरु महामार्गावरून केदारगाव मार्गे कोल्हापूरला गेला. सांगली जिल्ह्यात आजित पवार यांच्या स्वागताची जबाबदारी विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांच्यावर सोपविण्यात आली होती. 

वैभव पाटील यांनी देखील जयंत पाटील यांच्या मतदारसंघातच असलेल्या केदारगाव इथे हायवेवर तब्बल 400 भर गाड्यांचा ताफा आणत अजित पवार यांचे भव्य स्वागत केले. यानिमित्ताने वैभव पाटील गटाने जयंत पाटील यांच्या मतदारसंघात येऊन अजित पवार यांचे स्वागत करत शक्तिप्रदर्शन केले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पवार कुटुंबातील फुटीनंतर आता खानापूर मतदारसंघातील माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या कुटुंबातही दोन गट पडल्याचे दिसून येत आहे. 

भाजपच्या महाडिक गटाकडूनही अजित दादांचे स्वागत

उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूरला सभेसाठी जाताना इस्लामपूर जवळील पेठ नाका मध्ये स्वर्गीय नानासाहेब महाडीक यांच्या समाधीस अभिवादन करण्यास थांबले होते. महाडिक हे जयंत पाटील यांचे कट्टर विरोधक मानले जातात. आणि राहुल आणि संग्राम महाडिक हे सध्या भाजपत आहेत. मात्र, अजित पवार भाजपसोबत गेल्यापासून महाडिक गटातील राहुल महाडिक यांची अजित पवारांसोबत जवळीक वाढली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Shole Pangri Walmik Karad :वाल्मिक कराडला 7 दिवस कोठडी;कराड आरोपींच्या संपर्कात असल्याचा दावाZero hour on Pune | महापालिकेचे महामुद्दे | पुणे टेकड्यांवर चोरी,मारहाण,अत्याचाराचे प्रकार वाढलेZero Hour On Walmik Karad : वाल्मिक कराडला कोठडी, पांगरीत निदर्शन; SIT नं कोर्टात काय सांगितलं?Zero Hour Full :  कराडवर मकोका अंतर्गत हत्येचा आरोप, कोर्टात काय घडलं ?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Open 2025 Badminton : अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
अनुपमा उपाध्याय दुसऱ्या फेरीत, मालविका बनसोड, प्रियांशू राजावत यांची तगड्या खेळाडूंविरुद्ध कडवी लढत 
Beed : कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
कसाब प्रकरणातील न्यायाधीश आता संतोष देशमुख हत्येची चौकशी करणार, सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचीही चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय समिती
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
मोदी बोलत राहावेत अन् आम्ही ऐकत रहावं; पंतप्रधानांच्या भेटीनंतर चित्रा वाघ यांनी सांगितला अनुभव
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
जामखेडमध्ये बोलेरो कारचा भीषण अपघात; खोल विहिरीत कोसळल्याने पाण्यात बुडून 4 ठार
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसाकडून मारहाण, व्हिडिओ समोर येताच निलंबन
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पोरींचा नाद खुळा... टीम इंडियाचा 304 धावांनी मोठा विजय, मालिकाही जिंकली; मैदानावर चौकार, षटकारांची आतषबाजी
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 'देवाभाऊ' म्हणताच मुख्यमंत्री फडणवीस गोड हसले; शिंदेही खुलले, पाहा फोटो
Ladki Bahin Yojna Court Case : मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
मोठी बातमी! लाडकी बहीण योजनेबाबत फडणवीस सरकारची कोर्टात महत्त्वाची माहिती; जनहित याचिकेवर सुनावणी
Embed widget