Miraj MIDC Fire: मिरज औद्योगिक वसाहतीत प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग; 5 तासांनी आग नियंत्रणात
मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये (Miraj MIDC Fire) आज पहाटे प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग लागली. प्लॅस्टिकमुळे आग अधिकच भडकल्याने तब्बल 5 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले.
Miraj MIDC Fire : मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये (Miraj MIDC Fire) आज पहाटे प्लॅस्टिक कारखान्याला भीषण आग लागली. प्लॅस्टिकमुळे आग अधिकच भडकल्याने तब्बल 5 तासांनी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मिरज औद्योगिक वसाहतीमध्ये आज पहाटेच्या सुमारास गंगा प्लॅस्टिक या प्लास्टिक कारखान्याला अचानक भीषण आग लागली. प्लास्टिकचा कारखाना असल्याने आग अधिकच भडकत गेली. आगीची माहिती प्राप्त होताच सांगली अग्निशमन दलाच्या 4, MIDC अग्निशमन दलाची 1, कोल्हापूर मनपाची 1 व तासगाव नगरपरिषदेची एक अशा एकूण 6 अग्निशमन दलाच्या वाहनांनी 22 खेपा पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले. (Miraj MIDC Fire)
आग विझविण्यासाठी 5 तासांचा कालावधी लागला. या कामगिरीवर मुख्य अग्निशमन अधिकारी विजय पवार ड्रायव्हर सतीश वाघमारे, सुरेश आलगुर, दत्ता माने, शशिकांत चव्हाण, इक्बाल मुल्ला, लिंगाप्पा कांबळे, फायरमन रोहित घोरपडे, प्रसाद माने, विशाल रसाळ, चंद्रकांत झेंडे, अविनाश चाळके, रोहित निकम हे हजर होते.
कोल्हापुरातील गोकुळ शिरगाव एमआयडीसीमध्येही अग्नितांडव
दरम्यान, कोल्हापूर शहराला लागून असलेल्या गोकुळ शिरगाव (Gokul Shirgaon Fire) औद्योगिक वसाहतीशेजारी थर्मो रेग्झिन कंपनीला शनिवारी दुपारी शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. शेराफ्लक्स थर्मो केम प्रोसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आगीने काही क्षणात आगीच्या भक्षस्थानी पडली. कंपनीचे कोटींमध्ये नुकसान झाले आहे. साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नानंतरही आग धुमसत होती. सुदैवाने कोणाही जखमी झाले नाही. (Gokul Shirgaon Fire)
साडेपाच तास अथक प्रयत्न
आग इतकी भीषण होती की आग आटोक्यात आणण्यासाठी कोल्हापूर महापालिकेचे 3, गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहत, कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहती, कागल नगरपरिषद व कोल्हापूर विमानतळावरील अत्याधुनिक रोजन बीअर फायर फायटर अशा 14 हून अधिक अग्निशमन बंबांनी अनेक फेऱ्या मारत साडेपाच तासांहून अधिक काळ तास शर्थीचे प्रयत्न केले आणि आग आटोक्यात आणली. दुसरीकडे, बॅरेलमधील रसायनांचे वारंवार स्फोट होत असल्याने मोठा आवाज होत होता. अग्निशमन दल नेटाने आगीवर नियंत्रणासाठी प्रयत्न करीत होते, तरीही वाढत जाणारी आगीची भीषणता, होणारे स्फोट यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आजूबाजूच्या सर्व कंपन्यांना सुटी देऊन परिसर निर्मनुष्य करण्यात आला होता. (Gokul Shirgaon Fire)
इतर महत्वाच्या बातम्या