Sagittarius Horoscope Today 24rd March 2023: महत्वाचे निर्णय घ्याल, बढतीची संधी; 'असा' आहे धनु राशीचा आजचा दिवस
धनु राशींच्या (Sagittarius) लोक आज काही महत्वाचे निर्णय घेतील. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून तुम्हाला बढतीची संधी मिळेल.
Sagittarius Horoscope Today 24rd March 2023 : धनु राशींच्या (Sagittarius) लोकांचा आजचा दिवस अनुकूल असणार आहे. व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. छोटा व्यावसाय करणाऱ्यांना व्यवसायात नफा मिळेल. व्यवसायात काही बदल करण्याचा निर्णय तुम्ही घेऊ शकता. नोकरीसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. वरिष्ठ अधिका-यांच्या माध्यमातून तुम्हाला बढतीची संधी मिळेल. कनिष्ठ आणि वरिष्ठांचेही सहकार्य लाभेल.
वरिष्ठांकडून काही शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. तुमचे मन कोणत्याही कामात गुंतून राहणार नाही. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत थोडा वेळ घालवाल, ज्यामुळे तुम्हाला खूप चांगले वाटेल, परंतु कुटुंबातील सदस्यांशी एखाद्या गोष्टीवरून मतभेद होऊ शकतात. तुम्हाला तुमच्या बोलण्याकडे लक्ष द्यावे लागेल.
वरिष्ठ सदस्यांकडून काही कामे तुमच्यावर सोपवली जातील, जी तुम्ही पूर्ण करावीत. मुलांच्या शिक्षणावर जास्त पैसा खर्च होईल. कुटुंबाच्या गरजांसाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. आज तुमच्या आईंसोबत तुमच्या मनातील गोष्टी शेअर कराल. परदेशातून आयात-निर्यातीचे काम करणाऱ्या लोकांना चांगली बातमी मिळेल. नोकरदार लोकांनाही आज नवीन नोकरीची ऑफर मिळेल. भूतकाळाचा परिणाम कौटुंबिक संबंधांवर होऊ देऊ नका. कुटुंबातील लहान मुलांचा विचार करून निर्णय घेणे योग्य राहील. मनातील तणाव दूर होईल, कामाच्या ठिकाणी सुधारणा होईल, उत्साहानं काम कराल. कुटुंबाकडून सहकार्य मिळेल.
नोकरी करणाऱ्यांना दिलेली कामे वेळेत पूर्ण करावी लागतील. जे लोक सामाजिक क्षेत्रात काम करत आहेत, त्यांनी केलेल्या कामाचे सर्वजण कौतुक करतील. वेगाने काम होईल. जंक फूड खाणे टाळा. त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होईल. प्रियजनांशी संपर्क वाढेल. नातेवाईकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल. मित्रांसोबत संबंध दृढ होतील. तुम्हाला मित्रांचाही पूर्ण पाठिंबा मिळण्याची शक्यता आहे. वर्गमित्रांना भेटण्याची शक्यता आहे. आपल्या पार्टनरसोबत वेळ घालवा. आई-वडिलांसोबत संवाद साधा. त्यांच्यासोबत चर्चा करुन काही महत्वाचे निर्णय घेऊ शकता.
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा शुभ रंग सिल्वर आहे. तर, धनु राशीसाठी आजचा लकी नंबर 6 आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :