Roadies 19 : 'रोडीज 19' लवकरच होणार सुरू; धमाकेदार टीझर आऊट
Roadies 19 : 'रोडीज' या बहुचर्चित कार्यक्रमाचं पुढचं पर्व लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Roadies 19 : 'रोडीज'च्या (Rodies) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या बहुचर्चित कार्यक्रमाचं पुढचं पर्व अर्थात 'रोडीज 19' (Rodies 19) लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. थरार आणि साहसी कार्यक्रमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. आता या रिअॅलिटी शोचा टीझर आऊट झाला असून प्रेक्षक कार्यक्रमाची प्रतीक्षा करत आहे.
'रोडीज 19'च्या टीझरने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा कार्यक्रम तरुणांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. 'रोडीज 18' संपल्यापासून चाहते पुढच्या पर्वाची आतुरतेने वाट पाहत होते. आता टीझर रिलीज करत निर्मात्यांनी जाहीर केलं आहे की, लवकरच 'रोडीज 19'च्या ऑडिशनला सुरुवात होईल.
View this post on Instagram
'रोडीज 19'च्या ऑडिशन्सला लवकरच होणार सुरुवात
'रोडीज 19'चा धमाकेदार टीझर चाहत्यांची उत्सुकता वाढवणारा आहे. टीझर रिलीज झाल्यामुळे आता पर्वाच्या ऑडिशन्सला कधी सुरुवात होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. लवकरच यासंदर्भात निर्माते माहिती देतील. 'रोडीज 19'चं शूटिंग दक्षिण आफ्रिकेत झालं होतं. ते पर्व सोनू सूदने होस्ट केलं होतं. त्यामुळे आता 'रोडीज 19'बद्दल चाहत्यांना उत्सुकता आहे.
'रोडीज'च्या टीझरवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे. त्यांनी लिहिलं आहे,हा फक्त कार्यक्रम नाही तर एक भन्नाट प्रयोग आहे, 'रोडीज' हा कार्यक्रम पुन्हा सुरू होत असल्याचा आनंद आहे, 'रोडीज' पुन्हा सुरू करत असल्याबद्दल निर्मात्यांचे खूप-खूप आभार".
'रोडीज 18'चे विजेते कोण ठरले होते?
'रोडीज 18'मध्ये आशीष आणि नंदिनीमध्ये चांगलीच टक्कर पाहायला मिळाली. 'रोडीज'च्या इतिहासात पहिल्यांदाच या कार्यक्रमाचे दोन विजेते ठरले. 'रोडीज 18' या अॅडव्हेंचर कार्यक्रमाचे शूटिंग दक्षिण आफ्रिकेत झालं होतं. नंदिनी आणि आशीषला जिंकल्यानंतर 10 लाख रुपये आणि ट्रॉफीसह खास भेटवस्तू देण्यात आल्या आहेत.
गेल्या काही दिवसांत अनेक रिअॅलिटी शो प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण यासगळ्यात रोडीजची क्रेझ चाहत्यांमध्ये कायम आहे. दिवसेंदिवसे या कार्यक्रमाच्या लोकप्रियतेत वाढ होत आहे. आता टीझर आऊट झाल्यामुळे हा कार्यक्रम कधी रिलीज होणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. आगामी पर्वदेखील सून सूद होस्ट करणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
संबंधित बातम्या