एक्स्प्लोर

Chandrashekhar Bawankule: जनता दरबारात तक्रारींचा पाढा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची चांदवडच्या तहसीलदाराला तंबी, व्हिडिओ व्हायरल

Chandrashekhar Bawankule: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तहसीलदाराला चांगलाच दम दिला आहे. मंत्री बावनकुळेंचा दम देतानाचा हा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांवर व्हायरल होतोय.

Chandrashekhar Bawankule मुंबई: भाजप प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी तहसीलदाराला चांगलाच दम दिला आहे. मंत्री बावनकुळेंचा दम देतानाचा हा व्हिडिओ सध्या प्रसार माध्यमांवर व्हायरल होतोय. जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी एकट्या चांदवडच्या तहसीलदार विरोधात आल्याने महसूलमंत्री बावनकुळे यांनी फोनवरुन  तहसीलदाराला धारेवर धरत जाब विचारला आहे. एका ठराविक काल मर्यादेत काम करण्याचे अधिकाऱ्यांना बंधन घाला, अशी मागणी नागरिकांनी जनता दरबारात  मंत्री बावनकुळेंकडे केली आहे. 

नुकतेच, मुंबई येथील प्रदेश कार्यालयात विविध मागण्या व निवेदने घेऊन आलेल्या नागरिकांशी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संवाद साधला. प्रत्येकाचे निवेदन स्वीकारत मागण्या समजून घेतल्या. तसेच, त्यासंबंधी कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. याच वेळी चांदवड येथील काही नागरिक आपल्या तक्रार घेऊन आले असता त्यावर तत्काळ अॅक्शन घेत मंत्री बावनकुळेंनी फोनवरुन तहसीलदाराला तंबी दिली आहे. सध्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत असून अनेक प्रतिक्रियाही उमटत आहे. 

नेमकं काय म्हणाले चंद्रशेखर बावनकुळे?

जनता दरबारात 10 पैकी 8 तक्रारी या एकट्या चांदवडच्या तहसीलदाराविरोधात येत आहे. या संदर्भात कलेक्टरशी बोला आणि माझ्या सहीनिशी जेवढे निवेदन पाठवले आहेत त्यावर मला पूर्ण काम करून पाठवा. अशा शब्दात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी तहसीलदाराला तंबी दिली आहे. तर  एका ठराविक काल मर्यादेत काम करण्याचे अधिकाऱ्यांना बंधन घाला. अधिकारी मुद्दाम वेळकाढूपणा करतात आणि नंतर काम करण्यासंदर्भात पैशांची अपेक्षा करतात. पैसे दिल्यास लगेच काम करतात. मात्र काम न करणाऱ्या अधिकाऱ्यांना जाब विचारला तर सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल करणाच्या धमक्या देतात. असा आरोप करत नागरिकांनी जनता दरबारात तक्रारींचा पाढा वाचला आहे.  

जळगाव जिल्ह्यात भजापची ताकद वाढणार- चंद्रशेखर बावनकुळे       

जळगावच्या पाचोरा – भडगाव मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. कारण या मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासमवेत शरद पवार गटाचे माजी खासदार वसंतराव मोरे यांचे सुपुत्र पराग मोरे, रोहन मोरे, नाना महाजन, पारोळ्याचे माजी नगराध्यक्ष अशोक वाणी, पारोळा बाजार समितीचे संचालक नागराज पाटील, उबाठा गटाचे शहर प्रमुख सोमनाथ देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केलाय. भाजपच्या प्रदेश कार्यालयात हा पक्ष प्रवेश झाला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या नेतृत्वात हा पक्षप्रवेश झाला. या प्रवेशामुळे जळगाव जिल्ह्यात भारतीय जनता पार्टीची ताकद आणखी वाढली आहे. असे मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलताना व्यक्त केलंय. 

इतर महत्वाच्या बातम्या 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read More
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Bigg Boss Marathi 6, Rakhi Sawant: 'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
'बिग बॉस'च्या घरातलं धक्कादायक एव्हिक्शन; सारखं काहीना काही उकरुन काढून घरात गोंधळ घालणारी वाईल्ड कार्ड स्पर्धक आऊट
Iran US War: अमेरिका आणि इराणची शांती वार्ता फिस्कटली; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?
अमेरिका आणि इराणची शांती वार्ता फिस्कटली; जे.डी. व्हान्स पाकिस्तानमधून तातडीने निघाले, नेमकं काय घडलं?
Maharashtra Live Blog Updates: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार आपल्या प्रचाराचा शुभारंभ करणार
Nashik Crime News: नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या रॅकेटचा SIT कडून तपास, निदा खान मात्र अद्याप बेपत्ता; नाशिकसह पुण्यात शोध सुरु
नाशिकच्या आयटी कंपनीतील धर्मांतराच्या रॅकेटचा SIT कडून तपास, निदा खान मात्र अद्याप बेपत्ता; नाशिकसह पुण्यात शोध सुरु

व्हिडीओ

Special Report Sunetra Pawar : सुनेत्रा पवारांना धोका? एसयायीकडे तक्रार, रुपाली चाकणकरांवर वार
Special Report Sharad Pawar : महिलांचं सक्षमीकरण हेच माझं स्वप्न, शरद पवारांच्या लेखावरुन वाद
Earthquake in Marathwada : हिंगोली, परभणी, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यात भूकंपाचे धक्के, घरांना तडे
Police Bharti Special Report : फाटक्या चपलातली दांडगी जिद्द, पोलिस भरतीवेळी थक्क करणारी घटना
Ashok Kharat Special Report : खरातविरोधात 160 जीबीचे पुरावे, त्या 19 फोल्डर्समध्ये काय दडलंय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Asha Bhosle Health Update: आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'.
आशा भोसले यांची प्रकृती खालावली, नातीनं पोस्ट करत दिली हेल्थ अपडेट; सांगितलं खरं कारण, म्हणाली, 'माझी आजी...'
Mumbai Local : मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
मुंबईत पहिल्यांदाच ऑटोमॅटिक दरवाजांची नॉन-AC लोकल; प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मोठं पाऊल
Nashik : लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
लैंगिक अत्याचार, धर्मांतर प्रकरणानंतर नाशिकमधील कंपनीला टाळं, कर्मचाऱ्यांना मुंबई-पुण्यात शिफ्ट करणार
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
हे तर इस्त्रायल फर्स्ट धोरण! ट्रम्प यांच्या MAGA चळवळीत मोठी फूट; खंद्या शिलेदारांकडून बाह्य शक्तींचे 'गुलाम' झाल्याचा बोचरा वार, इराणची जिवितहानी करणारे आदेश सैनिकांनी पाळू नयेत, असाही दिला सल्ला
US Iran Islamabad Talks:चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
चर्चेच्या पहिल्या फेरीत इराण वरचढ ठरला, पण अमेरिकेची पहिली मागणी काय? पाकिस्तानने सुद्धा 'रामबाण' उपाय शोधत ताकद लावली!
Gold Jewellery : 24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
24, 22 की 18 कॅरेट, दैनंदिन वापरासाठी किती कॅरेटचे सोने सर्वात टिकाऊ? खरेदीपूर्वी 'हे' नक्की वाचा!
America Iran Islamabad Talks: पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
पाकिस्तानातील अमेरिकेसोबतच्या चर्चेत सुरुवातीलाच इराणनं सर्वात मोठी बाजी मारली! इस्त्रायलला सुद्धा तगडा झटका; तब्बल 48 वर्षाच्या लाॅकडाऊनमधून सुटकेची चिन्हे
Virat Kohli on Vaibhav Sooryavanshi: चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
चिमुरड्या वैभवने चौफेर कुटाई करूनही आरसीबीच्या किंग कोहलीकडून 'स्पेशल' यादगार गिफ्ट!
Embed widget