Sai Resort Dapoli : साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परबांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांना जामीन मंजूर, 11 महिन्यानंतर तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा
Sadanand Kadam Bail : सदानंद कदम हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांचे निकटवर्तीय असून भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर ईडीने त्यांना अटक केली होती.
Sadanand Kadam Bail : दापोली साई रिसॉर्ट प्रकरणी (Sai Resort Dapoli) सदानंद कदम (Sadanand Kadam) यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. ईडीनं अटक केलेल्या प्रकरणात 11 महिन्यांच्या कारावासानंतर त्यांचा जेलमधून सुटकेचा मार्ग मोकळा झाला. भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी तक्रार केली होती. त्यानंतर बेकायदेशीर बांधकाम आणि जमिनाच्या बेकायदेशीर आर्थिक व्यवहार प्रकरणात सदानंद कदम यांना ईडीनं अटक केली केली. सदानंद कदम हे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab) यांचे निकटवर्तीय आहेत.
काय आहे प्रकरण?
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील मुरुड या गावच्या किनाऱ्यावर 'साई रिसॉर्ट' उभारण्यात आले आहे. हे रिसॉर्ट उभारताना सीआरझेड कायद्याचं उल्लंघन झाले असून मनी लाँड्रिंगही करण्यात आली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. किरीट सोमय्या यांनी प्रतिकात्मक हातोडा घेत दापोलीमध्ये रॅली देखील काढली होती. या रिसॉर्टची मालकी परब यांची नसून आपली असून राजकारणात आपल्याला त्रास दिला जात असल्याचा दावा करत सदानंद कदम यांनी हायकोर्टात धाव घेतली होती.
या प्रकरणी सोमय्या यांनी शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. हे रिसॉर्ट अनिल परब यांच्याशी संबंधित असल्याचा आरोप सोमय्यांनी केला होता. तर अनिल परब यांनी आरोप फेटाळून लावताना आपला या साई रिसॉर्टशी संबंध नसल्याचे स्पष्ट केले होते.
शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांच्या मालकीचं हे साई रिसॉर्ट आहे. या प्रकरणी अनिल परब यांना तूर्तास हायकोर्टाकडून अटकेपासून संरक्षण आहे. तर सदानंद कदम यांना आता जामीन मिळाला आहे.
ईडीने जवळपास 10.20 कोटी रुपये किमतीची मालमत्ता तात्पुरती जप्त केली आहे. यामध्ये दोन कोटी 73 लाख 91 हजार रुपये किमतीची जवळपास 42 गुंठे जमीन आणि 7 कोटी 46 लाख 47 हजार रुपये किमतीचे रिसॉर्ट याचा समावेश असल्याची माहिती ईडीने दिली.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात काय आहे?
साई रिसॉर्ट प्रकरणाी जयराम देशपांडे व सदानंद कदम यांना ईडीनं अटक केली आहे. देशपांडे आणि कदम यांच्यासह सुधीर शांताराम परदुले, विनोद दिपोलकर, सुरेश तुपे, अनंत कोळी यांच्या नावांचाही आरोपपत्रात समावेश आहे या प्रकरणात तपास अद्यापही सुरू असून भविष्यात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्याची ईडीला मुभा आहे. या आरोपपत्रात सध्या 6 आरोपींविरोधात आरोप आहे. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या विरोधात कोणताही आरोप नाही. मात्र, या प्रकरणाचे सूत्रधार अनिल परब असल्याचे ईडीने म्हटले आहे
ही बातमी वाचा: