एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राष्ट्रपती निवडणूक: पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत कोंविद आज अर्ज भरणार
नवी दिल्ली: एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद आज सकाळी ११ वाजता निवडणुकीचा अर्ज भरणार आहेत. यावेळी शिवसेना सोडून एनडीएचे सगळे घटक पक्ष उपस्थित असणार आहेत.
भाजपचे मित्रपक्ष, भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री, लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्या उपस्थितीत अर्ज भरण्यात येईल. त्यानंतर एनडीएकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात येईल. यावेळी शिवसेनेकडून कुणीही उपस्थित राहणार नाही. मात्र त्यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेकडून अनंत गीते, संजय राऊत आणि आनंदराव अडसूळ या तिघांच्या सह्या असणार आहेत.
आज सकाळी 11.45 वाजेच्या दरम्यान रामनाथ कोविंद हे संसद भवनात आपला अर्ज दाखल करतील. 12 वाजेपर्यंत ही अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असणार आहे.
17 जुलैला होणाऱ्या या निवडणुकीत रामनाथ कोविंद यांचा विजय निश्चित मानला जात आहे. दरम्यान विरोधी पक्षाकडून लोकसभेच्या माजी अध्यक्ष मीरा कुमारी यांना राष्ट्रपतीपदाचे उमेदवार घोषित करण्यात आलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement