एक्स्प्लोर

महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल : रामदास आठवले

सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हांला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले.

मुंबई : महाराष्ट्रातील सरकारबाबत या आठवड्यात आम्हाला हवं असणारं नवं काहीतरी घडेल, असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे. सोबतच भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सावरकरांचं मोठं योगदान आहे. त्यामुळे राहुल गांधींनी आपलं वक्तव्य मागे घ्यावं आणि माफी मागावी अशी मागणी  रामदास आठवले यांनी केली आहे. आठवले यांनी आज पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसवर जोरदार टीका केली. यावेळी त्यांनी कॉंग्रेसला सल्ला देत ते म्हणाले की, शिवसेनेसोबत इतके टोकाचे मतभेद असतील तर त्यांनी शिवसेनेचा पाठिंबा काढून घ्यावा. तसेच शिवसेनेला देखील राहुल गांधींच्या वक्तव्याची आठवण करून देतं त्यांनी सरकारमधून बाहेर पडत भाजपसोबत सरकार बनवावं, असा सल्ला देखील दिला. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सेनेने सरकार बनवलं आहे परंतु अद्याप त्यांना मंत्रिमंडळ बनवता न आल्याची टीका देखील त्यांनी केली. आठवले म्हणाले की, राहुल गांधींनी सावरकरांवर टीका केली. याला शिवसेनेने देखील विरोध केला आहे. ते नाराज आहेत. त्यामुळे हे सरकार फार काळ टिकणार नाही असं मला वाटतं. मला वाटतं भाजपने मी दिलेला तीन- दोन वर्षांचा फॉर्म्युला मान्य करावा. जर त्यांनी तो मान्य केला असता तर राज्यात आत्ता आमचं सरकार असतं. सध्याच्या वातावरणावरुन असं वाटतंय की या आठवड्यात काहीतरी नक्की घडेल, असे आठवले म्हणाले. आम्हाला हवं असणारं या आठवड्यात घडेल, अशी माझी माहिती आहे. माझी माहिती अशी आहे की, मी दिलेल्या फॉर्म्युल्याचा विचार सुरू आहे, असेही आठवले म्हणाले. शिवसेना आणि काँग्रेसची विचारधारा परस्पर विरोधी आहे. या पक्षांची युती अनैसर्गिक आहे. राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अवमान करीत असताना शिवसेनेने मलूल भूमिका घेऊ नये. शिवसेना वाघाचा बच्चा आहे हे दाखवून देण्याची हीच वेळ आहे, असे आठवले म्हणाले. शिवसेनेने काँग्रेसला धडा शिकविला पाहिजे. दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना वाघासारखी आहे. राहुल गांधींना इशारा देणारी डरकाळी शिवसेने आता फोडली पाहिजे. अन्यथा महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पाठिंब्यावरील सरकार बरखास्त करावे. शिवसेनेने काँग्रेस सोबतचे सरकार बरखास्त केल्यास भाजप सोबत पुन्हा महाराष्ट्रात सरकार स्थापन करावे. शिवसेना भाजप महायुतीचे सरकारच स्थिर टिकाऊ सरकार ठरेल, असेही आठवले म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

BJP : विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीस, तर स्मृती इराणींना अखेर मोठी जबाबदारी; भाजपची नवी टीम
Kalyan Crime News: गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
गाडी बाजूला घेण्यास सांगितल्याचा राग; कल्याणमध्ये माजी नगरसेवकाच्या मुलाची गुंडागर्दी, विद्यार्थ्याला गोदामात डांबून बेदम मारहाण
Hindu Religion: ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
ही 'काही' फळं, जी शिवलिंगावर चुकूनही अर्पण करू नयेत! तर 'ही' फळं अर्पण करावीत, कमी लोकांना माहित, धार्मिक मान्यता...
IND vs SL 1st Test DAY-3 Live : श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली
श्रीलंका संपलं असं वाटत होतं… पण सोनल-डिकवेलाने सगळा खेळच फिरवला! 90/5 वरून थेट 214... भारताची डोकेदुखी वाढवली

व्हिडीओ

Celebrity vs Politicians Cricket Match Sangli: सिद्धार्थ जाधवची फटकेबाजी, विशाल पाटलांची जबरदस्त फिल्डिंग
Sanjay Raut Nashik Speech : खड्डे वेळेत न बुजवल्यास पालिकेचे गेट तोडून आत घुसू! प्रशासनाला अल्टिमेटम
Coffee With Kaushik NAFA: Nagraj Manjule, Mahesh Kothare, Prasad Oak पहिली एकत्र मुलाखत, धमाल किस्से
Supriya Sule: NDA सोबत जाणार का? जिल्हाध्यक्षांचा सवाल, सुप्रिया सुळे म्हणाल्या...
Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Navnath Waghmare controversial statement: मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
मराठा समाजाच्या महिलांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंवर पोलिसांकडून गुन्हा दाखल
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
उज्जैनमधील महाकालेश्वर मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत अनेकजण तुडवले, दात तुटले, बेशुद्ध पडले, करंट पसरल्याची अफवा; 13 जखमी, नागचंद्रेश्वराच्या दर्शनासाठी 40 हजार भाविक रांगेत
Chandrapur Accident News: पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
पोलीस मुख्यालयात जाताना काळाचा घाला; भीषण कार अपघातात महिला पोलिसाचा दुर्दैवी अंत, चंद्रपूर-मूल मार्गावरील घटना
Uday Samant and Eknath Shinde: उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
उदय सामंतांना उपमुख्यमंत्री व्हायचंय, एकनाथ शिंदेंना टार्गेट करण्यासाठी त्यांनीच मनोज जरांगेला सुपारी दिलेय; नवनाथ वाघमारेंचा सनसनाटी आरोप
Hasan Mushrif: 'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
'मोदी साहेबांना, अमित शाहांना एकेरी भाषेत बोलत आहेत हे राहुल गांधींना शोभत नाही, विरोधी पक्षनेते असतील, पण..' हसन मुश्रीफांचा संताप
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Embed widget