एक्स्प्लोर

तुमचा धर्म तुमच्या घरात आचरणात आणा, मशिदींवरचे भोंगे कशाला हवेत?, राज ठाकरेंचा हिंदुत्वाचा सूर

मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग आळवला आहे. मी मराठी देखील आहे आणि मी हिंदू देखील आहे... मी धर्मांतर केलेलं नाही. पण एक सांगतो माझ्या मराठीला नख लावायचा प्रयत्न केला तर मराठी म्हणून त्याच्या अंगावर जाईन आणि माझ्या धर्माला नख लावायचा प्रयत्न झाला तर हिंदू म्हणून त्याच्या अंगावर जाईन

मुंबई : झेंड्याचा रंग भगवा केल्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा राग आवळला आहे. आज मनसेच्या अधिवेशनात त्यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्याला हात घालत बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम देशातून हाकलून देण्याची मागणी केली. यासाठी केंद्र सरकारला पूर्ण पाठिंबा असल्याचे देखील ते म्हणाले. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, धर्म तुमच्या घरात आचरणात आणा. मशिदींवरचे भोंगे हवेत कशाला? आमच्या आरत्या जर आम्ही घरात करतो त्याचा त्रास होत नाही तर नमाजचा लोकांना त्रास का? तुमचा धर्म तुम्ही घरात ठेवा आम्हाला काही आक्षेप नाही, असे ते म्हणाले. आज सगळ्यात महत्वाचा विषय आहे तो म्हणजे ह्या देशातील बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोर मुस्लिम ह्या देशातून बाहेर हाकलून देण्याचा. आणि ह्यासाठी केंद्र सरकारला माझा पूर्ण पाठिंबा आहे, असे ते म्हणाले. बांगलादेश आणि पाकिस्तानी घुसखोर मुसलमानांना देशाबाहेर हाकलून द्यावं ह्यासाठी येत्या 9 फेब्रुवारीला मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना मोर्चा काढणार आहे. सीएए आणि एनआरसी विरोधात निघणाऱ्या मोर्चांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना या मोर्चाने उत्तर देणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केलं. जे देशाशी प्रामाणिक मुस्लिम आहेत ते आमचेच आहेत. एपीजे अब्दुल कलाम, झहीर खान, जावेद अख्तर ह्यांना नाकारता येणार नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राज ठाकरे यावेळी म्हणाले की, आज राज्यात बाहेरच्या देशातून आलेले मौलवी जाऊन देशविघातक कारवाया करत आहेत अशी माझी माहिती आहे आणि ह्या विषयावर मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांची आणि देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घेणार आहे. सीएए, एनआरसी वर अचानक हजारोंचे मोर्चे निघायला लागले आणि हे मोर्चे का निघत आहेत तर कलम 370 असो व राममंदिराचा सुप्रीम कोर्टाचा निकाल असो त्यावरचा राग रस्त्यावर मोर्चे काढून निघत आहे. नरेंद्र मोदी जेव्हा चुकले तेव्हा मीच त्यांच्यावर टीका केली पण जेंव्हा त्यांनी चांगली गोष्ट केली तर त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो. कलम 370 असो की राममंदिराचा विषय असो त्यांचं अभिनंदन करणारा मीच होतो असं ते म्हणाले. ते म्हणाले की, माझं केंद्र सरकारला सांगणं आहे की समझौता एक्स्प्रेस बंद करा. आज देशात उभे राहिलेले मोहल्ले हे देशाला त्रास देणार आहेत. उद्या जर युद्ध झालं तर सैन्याला बाहेरच्या नाही तर आतल्या शत्रूंशीच लढावं लागेल. हिंदूंच्या सणांच्या विरोधात जेव्हा कोणी बंदी आणायचा प्रयत्न केला तेंव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच उभी राहिली आहे. आता सरसकट कुणालाच माफी नाही, जर इथे येऊन धिंगाणा घातलात तर मी तुमच्या अंगावर जाईन. रझा अकादमीच्या आंदोलकांनी पोलीस भगिनींवर हात घातला तेंव्हा त्याविरोधात मोर्चा काढणारा राज ठाकरे आणि त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच होती, असेही ते म्हणाले. संबंधित बातम्या

एबीपी माझा डिजिटल टीममध्ये गेल्या साडेतीन वर्षांहून अधिक काळापासून कार्यरत... मागील काही वर्षांपासून राजकारण, सामाजिक समस्या, सिनेमासह विविध विषयांवर ब्लॉग लेखन. लोकमत, जनशक्तीमध्ये दीर्घकाळ कामाचा अनुभव. मंत्रालय वार्तांकनाचा तीन वर्षांचा अनुभव. 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Team India Squad World Cup 2027 : 10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
10 खेळाडूंसाठी धोक्याची घंटा, 2027 च्या वनडे वर्ल्डकपसाठी अजूनही नाव फिक्स नाही...; रोहित-जडेजासह अनेक मोठ्या नावांचा समावेश
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?

व्हिडीओ

Shetitil Navdurga | Swati Kushare |‘शेतकरी’ म्हणवून घेण्याचा संकोच होता… आज त्याच ओळखीचा अभिमान आहे!
Majha Katta Dr. Abhijit Joshi : जेवण कसं जेवावं?नियम काय? आयुर्वेदात काय? डॉ.अभिजीत जोशी माझा कट्टावर | ABP Majha
Sanjay Raut PC : मोदी सरकार 6-7 महिन्यात दिसणार नाही, राऊतांचा मोठा दावा
Mann Suddha Tujha Season 3 : मंत्रचळ | मन सुद्ध तुझं | Episode 2 ABP Majha
Shetitil Navdurga : Sunita Raite : शिलाईच्या सुईपासून अवजार बँकेपर्यंत स्वावलंबनाचा प्रवास!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनाच इंडिया आघाडीच्या सुप्रीम कोर्टावरच्या मोर्चावर ऑन कॅमेरा मीडियाचा सवाल अन् एकाच वाक्यात उत्तर, दिल्लीच्या लॉ अँड ऑर्डरवर विचारताच काय म्हणाले?
Someshwar Sugar Factory Election Result : सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा पहिला निकाल आला, सुनेत्रा पवारांच्या पॅनलने खातं उघडलं, कोणता उमेदवार विजयी?
Pune News: राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
राजगड किल्ल्यावर पर्यटकाचा हृदयविकाराने मृत्यू; मालकाच्या मृत्यूनंतरही निष्ठावान जुली राहिली सोबत, स्ट्रेचरच्या सहाय्याने किल्ल्यावरून खाली आणताना मागे-मागे आली अन्...
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
इंडिया आघाडीचा आज सुप्रीम कोर्टावर अभूतपूर्व मोर्चा, पण सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगेंसह इंडिया आघाडीची भेट का नाकारली? चार कारणे दिली!
Pune MPSC protest: पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
पुण्यातील एमपीएससी आंदोलनात रात्री अचानक चक्र फिरली, पडद्यामागे काय घडलं? वाचा इनसाईड स्टोरी
Sunetra Pawar on Someshwar Sugar Factory Election Result : निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
निवडणुकीचा निकाल आहे, किती विश्वास वाटतो? पत्रकारांचा प्रश्न; सुनेत्रा पवार स्मितहास्य करत म्हणाल्या, 21-0...
Someshwar Factory Election: सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा आज निकाल; सुनेत्रा पवारांची प्रतिष्ठा पणाला, कोण उधळणार विजयाचा गुलाल
WCL 2026 : 6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
6 चेंडू, 12 धावा अन् काळजाचा ठोका चुकवणारा ड्रामा! भारत-बांगलादेश मॅचचा थरारक शेवट, ज्याने सगळेच चक्रावले
Embed widget