एक्स्प्लोर

Alka Kubal Daughter Engagement: अल्का कुबल यांच्या घरात लगीनघाई; धाकट्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पार, अभिनेत्रीची मुलगी करते काय? PHOTOs

Alka Kubal Athlyes Younger Daughter: अल्का कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पडला पार.

Kasturi Athlye Gets Engaged: मराठी सिनेसृष्टीत सध्या लगीनघाई पाहायला मिळत आहे. अशातच मराठी सिनेसृष्टीतील (Marathi Industry) 90 चे दशक गाजवणाऱ्या अभिनेत्री अलका कुबल - आठल्ये (Kasturi Athlye) यांच्या घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.  अलका कुबल यांनी आपल्या कारकि‍र्दीत बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं. त्यांच्या कारकि‍र्दीत त्यांनी मुलगी, सून अशा विविधांगी भूमिका साकारुन प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. केवळ सिनेमा नाही तर, त्यांनी आपल्या कारकि‍र्दीत मालिकांमध्येही काम केलं.  अल्का कुबल (Alka Kubal) सध्या प्रोफेशनल नाही तर, आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. अलका कुबल - आठल्ये यांच्या घरात सध्या लगीनघाई सुरू आहे.  अल्का कुबल यांच्या धाकट्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा (Engaged) पार पडला. याचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.   अभिनेत्रीने स्वत: आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर (Social Media) लेकीच्या साखरपुड्याचे फोटोस शेअर केले आहेत. 

अल्का कुबल यांच्या लेकीचा थाटामाटात साखरपुडा पार (Alka Kubal Athlyes Younger Daughter Kasturi Athlye Gets Engaged)

अल्का कुबल यांना दोन लेकी आहेत. दोन्ही लेकी या मनोरंजनविश्वापासून दूर आहेत.  अल्का कुबल यांनी मोठी लेकी ईशानीचा लग्नसोहळा अगदी थाटामाटात पार पडला. 2022 साली तिचा लग्नसोहळा पार पडला. आता धाकट्या लेकीचाही साखरपुडा झाला.  अल्का कुबल यांची धाकटी लेक कस्तुकी आठल्ये आणि संकेत दुधाळ यांचा साखरपुडा नुकताच पार पडला. अभिनेत्री सोशल मीडियात  सक्रीय असते. अल्का कुबल यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर लाडक्या लेकीच्या साखरपुड्याचे फोटोस शेअर केले आहेत.  तसेच काही फॅमिली फोटोसही शेअर केले आहेत. अभिनेत्री कॅप्शनद्वारे लेक आणि जावयाला शुभेच्छाही दिल्या आहेत. सध्या अल्का कुबल यांच्या पोस्टची सोशल मीडियात चर्चा सुरू आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Alka Kubal Athalye (@alkakubal_23)

अल्का कुबल यांची लेक कस्तुरीने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. तसेच गळ्यात हार, नाकात नथ आणि कंबरपट्टा घालून आपला लूक पूर्ण केला होता. कस्तुरीने मिनिमल मेकअप लूक कॅरी केला होता. तसेच केस ओपन स्टाइल केले होते. या लूकमध्ये कस्तुरी खूप सुरेख दिसत होती. तर, अल्का कुबल यांचे जावई यांनी ऑफ व्हाईट कलरचा कुर्ता घातला होता. दोघांची जोडी सुंदर दिसत होती. अल्का कुबल यांनी फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शनही दिलं आहे. 'तुम्हा दोघांना पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा.  असेच कायम हसत एकत्र राहा. आनंदी राहा', असं अल्का कुबल यांनी आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.  कस्तुरीवर सध्या शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.  अल्का कुबल यांच्या लेकीबद्दल बोलायचं झाल्यास, कस्तुरी आठल्ये हिने आपलं करिअर मनोरंजनविश्वात न करता वैद्यकीय क्षेत्रात केलं. आता कस्तुरी आपल्या नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या:

Sameera Reddy Nana Patekar Death: बॉलिवूड अभिनेत्रीकडून नाना पाटेकरांबाबत अनेक रहस्य उघड; मृत्यूच्या 1 महिन्यांनंतर सगळंच सांगितलं, म्हणाली, 'ते गुपचूप...'

ABP माझा ऑनलाईनमध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत. पत्रकारितेत 2021 पासून कार्यरत. डिजिटल माध्यमांत जवळपास 3 वर्षे काम करण्याचा अनुभव. साम, सकाळ, दूरदर्शन, लोकमत आणि साम (डिजिटल) याठिकाणी काम करण्याचा अनुभव. मुंबई विद्यापिठातून पत्रकारितेत पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण.

Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ramayana Box Office Collection : 'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
'रामायण'चा बॉक्स ऑफिसवर महाविक्रम! अवघ्या 17 दिवसांत 900 कोटींचा टप्पा पार करणार; 'बाहुबली 2'लाही टाकणार मागे
Ajinkya Dev On Maherchi Sadi Sequel : 'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
'माहेरची साडी' पुन्हा मोठ्या पडद्यावर येणार? अलका कुबल यांच्या जागी 'या' अभिनेत्रीला अजिंक्य देव यांची पसंती!
Rising Summit 2026 : 'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
'दबंग'चा सिक्वेल कन्फर्म; 'बजरंगी भाईजान'चाही पार्ट 2 येणार का? एबीपीच्या कार्यक्रमात सलमान खानने सांगून टाकलं, म्हणाला...
Rising Summit 2026 : सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
सलमान खानने श्रद्धा कपूरला फोन करून मागितली माफी! म्हणाला, 'I am Sorry' 'मला आधी माहीत असतं तर...' नेमकं काय घडलं?
Advertisement

व्हिडीओ

Shruti Sadolikar Katkar Majha Katta : शास्त्रीय संगीताचं चालतं बोलतं विद्यापीठ, श्रृती सडोलीकरांशी गप्पा | ABP Majha
Ratnagiri Water Shortage : कोकणातील पाणीटंचाईवर श्रमदानातून मात! Special Report
Kolhapur Milk Price Hike : गोकुळ आणि वारणा दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरात वाढ Special Report
Kurla Phoenix Mall Mumbai Crime News: पैसे मागितले, काही उर्दुमध्ये बोलत होते; कुर्ला तरुण-तरुणी मारहाण प्रकरणावर प्रत्यक्षदर्शी महिलेची धक्कादायक माहिती, VIDEO
Kurla Phoenix Mall Garden : कुर्ल्यात जिथे तरुण-तरुणीला मारहण, तिथलं हादरवणारं वास्तव
Advertisement

फोटो गॅलरी

Advertisement

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nagpur Air Fest 2026 Air Show : सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
सुखोईची गर्जना, आकाशगंगा, सारंग अन् सूर्यकिरणच्या आज रंगणार चित्तथरारक कसरती; पण नागपूरचं ढगाळ वातावरण ‘एअर फेस्ट 2026’च्या आनंदावर विरजण घालणार?
Narendra Modi On Gold Rate: सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
सोन्याचे भाव धडाधड घसरले; आता नरेंद्र मोदींची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Ramrao Wadkute Passes Away: दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
दुःखद बातमी! राज्यसभा खासदार रामराव वडकुते यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन; राजकीय वर्तुळात शोककळा
SBI YouTuber Fine : 19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
19 वर्षांच्या युट्यूबरचं बँक खातं गोठवणं SBI ला भोवलं, ग्राहक मंचाचा दणका; ठोठावला 15,000 रुपयांचा दंड
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
माझ्या सल्ल्यामुळं लोकांनी कमी सोन्याची खरेदी केली, आज अनेकजण सांगतात मोदीजी तुमचा सल्ला पाळला, आमचे पैसे वाचले 
Maharashtra : अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
अनाथ मुलांना हक्काचं घर अन् सरकारी नोकरी, महिला आणि बालकल्याण विभागाची मोठी कामगिरी; महाराष्ट्र देशात अव्वल
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
संभाजीनगरमध्ये महिलेवर अत्याचार, 19 लाख रुपयांचीही फसवणूक; आरोपीला 1 वर्षानंतर थेट दुबईतून अटक
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
'हा अघोरी बाबा कुठे मिळतो हे त्यांनाच विचारा'; DCC निवडणुकीचा वाद, मंत्री शंभूराज देसाईंचा जयकुमार गोरेंवर पलटवार
Embed widget