एक्स्प्लोर

Raj Thackeray Speech : मोदींसमोर तोफ धडाडली, राज ठाकरेंच्या भाषणातील 10 महत्त्वाचे मुद्दे 

Raj Thackeray Speech : राज ठाकरे यांनी महायुतीच्या सभेमध्ये पंतप्रधान मोदींसमोर धडाकेबाज भाषण केलं. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य करत विरोधकांवरही निशाणा साधला.

Raj Thackeray Speech :  येत्या 20 मे रोजी लोकसभा निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. त्याआधी महायुती आणि महाविकास आघाडीकडून सभांचा धडका लावण्यात आला. शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली. या सभेला मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची देखील उपस्थित होती. कारण मनसेच्या गुढीपाडव्याच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीच्या सरकारला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. त्यानंतर पुणे, कोकण, कल्याण-डोंबिवली आणि आता मुंबई अशा महत्त्वाच्या मतदासंघामध्ये राज ठाकरेंनी सभा घेतल्या. मुंबईतल्या सभेत राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसाठी भाषण केलं आणि त्यांच्यासमोर महाराष्ट्राच्या अपेक्षा ठेवल्या. राज ठाकरे यांच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे जाणून घेऊयात.

1. शरद पवार, उद्धव ठाकरेंवर निशाणा

एकनाथ शिंदे, देवेंद्र फडवणीस आणि अजित पवार यांनी भाषणामध्ये उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्याबद्दल बोलले. पण त्यांच्याबद्दल बोलायची गरज नाही. जे सत्तेत येणार नाहीत, त्यांच्याबद्दल काय बोलायचं?

2. 'मोदीजी नसते तर राम मंदिर झालंच नसतं'

90 च्या दशकात बाबरी मशिदीचं प्रकरण घडलं, त्यावेळी मुलायम सिंह यादवच्या लोकांनी  आमच्या हजारो  कारसेवकांना मारलं. शरयू नदीमध्ये प्रेतं फेकून दिलं. ते चित्र माझ्या डोळ्यासमोरुन कधी गेलं नाही.  ज्यावेळी बाबरीचा ढाचा पडला, त्यानंतर राम मंदिर बनवू, बनवू असं म्हटलं जात होतं. पण मला तेव्हा वाटलं की राम मंदिर कधी बनणार नाही.  मोदीजी होते म्हणून ते राम मंदिर होऊ शकलं अन्यथा ते झालंच नसतं. 

3. कलम 370 आणि काश्मीरचा मुद्दा 

इतिहासापासूनच एकच गोष्ट कानावर पडायची की 370 कलम रद्द झालं पाहिजे. पण इतक्या वर्षात जी गोष्ट होऊ शकली नाही, ती पंतप्रधान मोदींनी करुन दाखवली. त्याच काश्मीरमध्ये आज तुम्ही जाऊन जमीन घेऊ शकता. तो भारतातच एक भाग आहे, हे आता सिद्ध झालं. 

4. 'तीन तलाख कायदा मोदींजींमुळे रद्द'

एक प्रकरण सुप्रीम कोर्टात होतं आणि सुप्रीम कोर्टाने शाह बानो या महिलेच्या बाजून तो निकाल लावला होता. सुप्रीम कोर्टाने निकाल लावल्यानंतर राजीव गांधींनी खासदार असताना बहुमतानाच्या जोराने तो निकाल काढून टाकला. त्यामुळे त्या मुस्लिम महिलेला कधीच न्याय मिळू शकला नव्हता. पण तो तीन तलाक कायदाच रद्द केला आणि हिंदुस्थानातील जितक्या मुस्लिम महिला आहेत, त्यांच्यामध्ये एक समाधानाचं वातावरण झालं. 

5. औवेंसींवर निशाणा

काही मूठभर मुस्लिम आहेत, ओवैसी सारख्या अवलादी आहेत, त्यांचे अड्डे तपासा, तिथं एकदा सैन्य पाठवा आणि त्यांना उध्वस्त करून टाका. म्हणजे देशात सर्वांना सुरक्षित वावरता येईल.

6. महाराष्ट्राच्या मोदींजींकडून अपेक्षा

महाराष्ट्राच्या मोदींजींकडून काही अपेक्षा आहेत, त्या अपेक्षा आज मला तुमच्यासमोर बोलून दाखवयाच्या आहेत. 

7. 'मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा'

अनेक वर्षांपासून हा प्रश्न खितपत पडला आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. तुम्ही पंतप्रधान झाल्यावर तो मिळेल अशी अपेक्षा मी ठेवतो. देशाच्या अभ्यासक्रमामध्ये 125 वर्षे मराठा सामज्र होतं, त्याचा इतिहास शालेय शिक्षणामध्ये असावा. भविष्यातील पिढ्यांना याबाबत माहिती मिळेल.

8. 'गडकिल्ल्यांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाची समिती'

 समुद्रामध्ये छत्रपतींचा पुतळा कधी उभा राहिल माहित नाही. पण शिवछत्रपतींची खरी स्मारके आहेत ती म्हणजे गड किल्ले आहेत.  गडकिल्ल्यांना गतवैभव मिळावं यासाठी आंतरराष्ट्रीय समिती स्थापन करावी. भविष्यातील पिढ्यांना आमचा राजा कोण होता. हे त्या गडकिल्ल्यावरुन कळेल.

9. 'मुंबई-गोवा महामार्ग मार्गी लावा'

अनेक वर्षांपासून मुंबई गोवा महामार्ग हा खड्ड्यात आहे, तो मार्गी लावा, या अपेक्षा यावेळी राज ठाकरेंनी पंतप्रधान मोदींसमोर मांडल्या. 

10. विरोधकांना चोख उत्तर

बाबासाहेबांचं संविधान बदलणारा आरोप करणाऱ्यांना संविधान तुम्ही बदलणार नाही, हे तुम्ही खडसावून सांगा.

ही बातमी वाचा : 

बाप चोरला, पक्ष चोरला, गजनी, अन् अर्धटवराव.... देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget