Udayanraje Bhosale : शिवरायांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा, युगपुरुषांबाबत नॉन बेलेबल कायदा करावा, किल्ले रायगडावर उदयनराजेंच्या अमित शाहांकडे मोठ्या मागण्या
Udayanraje Bhosale : किल्ले रायगडावर खासदार उदयनराजे भोसले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत.

Udayanraje Bhosale : छत्रपती शिवाजी महाराजांची 345 व्या पुण्यतिथीनिमित्त गृहमंत्री अमित शाह यांनी आज किल्ले रायगडावर जाऊन शिवरायांना वंदन केलं आहे. यावेळी रायगडावर आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे मोठ्या मागण्या केल्या आहेत.
खासदार उदयनराजे भोसले म्हणाले की, आज एका थोर व्यक्तीला नतमस्तक होण्यासाठी उपस्थित राहिलो आहोत. समतेचा विचार त्यांनी दिला होता. एक युगपुरुष होऊन गेला ज्याने आयुष्य लोकांसाठी वेचले. स्वराज्याची स्थापना केली, लोकशाहीचा विचार त्यांनी दिला होता. लोकसहभाग राज्य कारभारात असला पाहिजे, त्याचा मूळ पाया त्यांनी रचला होता. अलिकडच्या काळात यात वाढ होताना दिसते. स्वत:चं आयुष्य वेचलं, आता त्यांचा अवमान केला जातोय, असे त्यांनी म्हटले.
छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा
खासदार उदयनराजे भोसले पुढे म्हणाले की, अमितजींना आणि देवेंद्रजींना मी 4-5 मागण्या करणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत एक कायदा करण्यात यावा, जो नॉन बेलेबल असावा. 10 वर्ष बेल मिळाली पाहिजे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास शासनाने प्रकाशित करावा. जेणेकडून कुठल्याही प्रकारचे सामाजिक तेढ निर्माण होऊ नये. सिनेमॅटिक लिबर्टीच्या संदर्भात एक सेंन्सर बोर्ड स्थापन करण्यात यावं. जेणेकरून एखादा स्वतःच्या कल्पनेतून एखादी कादंबरी लिहितो पण त्याला कुठलाही ऐतिहासिक पुरावा नसतो. त्यामुळे अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि युगपुरुषांबाबत गैरसमज निर्माण होतो. त्यामुळे एक सेंसर बोर्डची स्थापना करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत स्मारक व्हावं
मी याआधी अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली होती, बुद्ध सर्किट जसं आहे तसं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट असावं, ही मागणी केली होती, ती मागणी कालच मान्य केली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे दिल्लीत स्मारक व्हावं, ही देखील मागणी आहे. दावणगिरी जिल्ह्यातील शहाजी महाराजांच्या समाधीसाठी केंद्र आणि राज्याने निधी उपलब्ध करुन द्यावा. अरबी समुद्रात स्मारकाचे भूमिपूजन झालं, माझी एक मागणी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक दिल्लीत झालंच पाहिजे, मात्र मुंबईत देखील स्मारक व्हावे. राज्यपाल निवासमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक व्हावं, अशी अनेकांची मागणी आहे. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात घोषणा कराव्यात. मागण्या पूर्ण झाल्यात तर राज्याला आनंद होईल, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा

























