एक्स्प्लोर

Raigad Guardian Minister: रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा अधिकच क्लिष्ठ? गोगावलेंनी दिलेली मुदत संपली; रायगडचे सेनेचे 3 आमदार अजितदादांच्या भेटीला पण....

Raigad Guardian Minister: चार दिवसांपुर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर भरत गोगावले यांनी दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक विधान केले होते.

मुंबई: राज्यातील पालकमंत्रीपदाची यादी जाहीर झाली. यादीमध्ये एकूण 37 जिल्ह्यातील पालकमंत्रीपदाची (Guardian Ministership) नावे जाहीर झाली आली. त्यानंतर दोन जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदावरुन (Guardian Ministership) मंत्री नाराज झाले, आमदारांवर अन्याय झाल्याची भावना व्यक्त केली. नंतर अनेक नेते उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसले. त्यानंतर नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबतचा (Guardian Ministership) तिढा अद्याप सुटला नसल्याचं चित्र आहे. रायगड आणि नाशिक या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला अवघ्या 24 तासांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिली होती. मात्र, काही दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा (Guardian Ministership) वाद संपता संपत नसल्याचे दिसून येत आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात गेला होता. चार दिवसांपुर्वी मंत्री भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर भरत गोगावले यांनी दोन दिवसात तुम्हाला गोड बातमी मिळेल, असे सूचक विधान केले होते. भरत गोगावलेंनी सांगितलेली 2 दिवसाची मुदत संपली, तरी अद्याप पालकमंत्रीपदाचा (Guardian Ministership) तिढा सुटेना अशा चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू असल्याचं दिसून येत आहे. 

रायगडचे शिवसेनेते तिनही आमदार अजितदादांच्या भेटीला पण....

मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्याहून परतल्यानंतर 2 दिवसात म्हणजे 1 फेब्रुवारीनंतर पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल असं भरत गोगावलेंनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेवेळी म्हटलं होतं. त्याकरता रायगडचे शिवसेनेते तिनही आमदार भरत गोगावले, महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे हे अजित पवारांच्या भेटीकरता त्यांच्या दालनातही गेले होते. भेटीच्या ऐनवेळी अजित पवार जेवायला गेले. मात्र, येत्या दोन दिवसांत रायगड पालकमंत्री पदाबाबत सकारात्मक निर्णय होईल असं भरत गोगावलेंनी सांगितलं होतं. मुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावरुन परतले. मात्र, अद्यापही मुख्यमंत्री - उपमुख्यमंत्री यांच्यात रायगड आणि नाशिक पालकमंत्रीपदाबाबत बैठक झाली नाही. त्यामुळे, महायुतीतील रायगड आणि नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा अधिकच क्लिष्ठ होतोय का अशी चर्चा आहे. 

राज्याच्या पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाल्यानंतर रायगडच्या पालकमंत्रीपदी अदिती तटकरे यांची नियुक्ती करण्यात आली होती. तर नाशिकमध्ये मुख्यमंत्र्यांचे विश्वासू सहकारी व भाजपचे संकटमोचक म्हणून प्रसिद्ध असलेल्या गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली होती. तटकरेंच्या नियुक्तीवरुन भरत गोगावले नाराज झाले होते. त्यानंतर गोगावले समर्थकांनी जोरदार विरोध केला. यानंतर या दोन्ही नियुक्तीला स्थगिती देणार पत्रक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढलं. यानंतर चार दिवसांपुर्वी म्हणजेच 29 तारखेला अचानक भरत गोगावले यांनी अजित पवारांची भेट घेतली. या भेटीनंतर भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाचा वाद मिटल्याचे संकेत दिले होते, मात्र अद्याप कोणताही निर्णय समोर न आल्याने पालकमंत्रीपदाचा तिढा सुटत नसल्याच्या चर्चा आहेत. 

भेटीनंतर काय म्हणाले होते गोगावले

29 तारखेला अजित पवारांना भेटल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना भरत गोगावले म्हणाले होते, 'मी याबद्दल आता काहीही सांगणार नाही. आमचे नेते मंडळी दोन दिवसात याबद्दल ठरवतील. दोन दिवसात निश्चित निर्णय होईल. नक्की काहीतरी चांगलं होईल. निश्चितच सकारात्मक बातमी मिळेल', यानंतर गोगावलेंना पुन्हा एकदा तुम्ही पालकमंत्री झालात असे समाजायचे का? असा प्रश्न पत्रकारांनी केला त्यावर त्यांनी 'असं उलटं काही विचारू नका. जरा थांबा, घाई कशाला करता… सकारात्मक बातमी मिळेल, असे वाटते. मी पालकमंत्रीपदाचा विषय नेत्यांवर सोपावला आहे. पालकमंत्रिपदाचा तिढा मुख्यमंत्री दिल्लीवरुन आल्यानंतर सुटेल. दोन दिवसात गोड बातमी मिळेल. सर्व जनतेचे म्हणणं आहे', असं गोगावले यांनी म्हटलं होतं.

About the author सुरज सावंत

सुरज सावंत हे जवळपास 10 वर्षांपासून माध्यमात कार्यरत आहेत. राजकारण, क्राईम यावर त्यांचा विशेष पकड आहे.
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका

व्हिडीओ

Muncipal Corporation Election : राज्याच्या मतदार यादीत कोणताही घोळ नाही, निवडणूक आयोगाची भूमिका
Municipal Corporation Election : आजपासून 29 महानगर पालिकांसाठी आचारसंहिता लागू- निवडणूक आयोग
Municipal Corporation Election : उमेदवारांना सहा महिन्यात जात वैधता प्रमाणपत्र सादर करावा लागणार
Municipal Corporation Election : मनपासाठी 15 जानेवारीला मतदार, तर 16 जानेवारीला मतमोजणी
Vinod Ghosalkar : मुलाची हत्या, सूनेचा भाजपत प्रवेश; ठाकरेंचे कट्टर विनोद घोसाळकर रडले

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Local Body Election: एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
एकनाथ शिंदेंसोबत सगळीकडे युती, अजित पवारांविरुद्ध शड्डू; महापालिकेची निवडणूक जाहीर होताच देवेंद्र फडणवीस काय काय म्हणाले?
Municipal Corporation Election: कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
कोल्हापूर, सोलापूर, सांगली मनपा निवडणुकीसाठी बिगुल अखेर वाजला! एका महिन्यात नवे कारभारी मिळणार!
Maharashtra Municipal Elections : मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
मुंबई-ठाण्यासह 29 महापालिकांसाठी निवडणुका जाहीर, मतदान आणि निकाल कधी? असा असेल संपूर्ण कार्यक्रम
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेतील 10 मुद्दे; दुबार मतदान, प्रचाराची मुदत अन् ZP निवडणुका
Municipal Corporation Election 2025: पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
पुणे पिंपरी चिंचवडसह महानगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलं; मतदान अन् निकाल कधी? जाणून घ्या सविस्तर
BMC Election Date 2026: आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
आशियातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर; मतदान अन् मतमोजणी कधी?, पाहा संपूर्ण वेळापत्रक
Viral Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
Video: लग्नासाठी अवघे दोन तास बाकी, मित्राची विनवणी करून थेट कारने एक्स बाॅयफ्रेंडला भेटायला गेली, मिठी मारली, किस घेतला अन्..
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
मराठवाड्यातील 5 महापालिकांसाठी मतदान अन् निकालाची तारीख ठरली? संभाजीनगरमध्ये सदस्य संख्या किती?
Embed widget