एक्स्प्लोर

बल्‍क ड्रग प्रकल्‍पाविरोधात अलिबागमध्ये मोर्चा, जमिनी न देण्‍याचा शेतकरयांचा निर्धार

Raigad : राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्यामुळे मागील काही दिवसांत राजकीय वातावरण तापले आहे.

Raigad Bulk Drug Park Project : राज्यातील प्रकल्प बाहेर गेल्यामुळे मागील काही दिवसांत राजकीय वातावरण तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. पण रायगडमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळल आहे. रायगड जिल्ह्यातील बल्‍क ड्रग प्रकल्‍पाविरोधात अलिबाग येथे शेतकऱ्यांनी आज मोर्चा काढला होता. यावेळी प्रकल्‍पाला जमिनी न देण्‍याचा शेतकरयांनी निर्धार केल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी शेतकऱ्यांनी 
रोहा - मुरूड तालुक्‍यातील प्रस्‍तावीत प्रकल्‍पाबाबत जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. प्रकल्पग्रस्तांच्या मुददयावर सरकारशी चर्चा करण्‍यास तयार, असल्याचं यावेळी सांगण्यात आलं. 

रायगड जिल्ह्यातील प्रस्तावित बल्क ड्रग्ज प्रकल्पाच्या माध्यमातून मूठभर लोकांच्या फायद्यासाठी जमिनी न देण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे. यासाठी, रोहा आणि मुरूड परिसरातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून विरोध दर्शविला आहे. राज्यातील फॉस्कॉन प्रकल्प गुजरातला गेल्याचे समोर आल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी रायगड जिल्ह्यातील बल्क ड्रग्ज प्रकल्प देखील रद्द झाल्याचा गौप्यस्फोट करण्यात आला. यामुळे, रायगड जिल्‍हयातील रोहा - मुरूड तालुक्‍यातील प्रस्‍तावीत बल्‍क - ड्रग प्रकल्‍पाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामध्ये, रोहा आणि मुरूड तालुक्यातील सुमारे १४ गावातील जमिन  ही एमआयडीसीसाठी संपादीत करण्यात आली आहे. 

रोहा तालुक्यातील न्हावा, सोनखार, नवखार , दिव, खारकर्डी, बेलखार, खुटल  या गावांचा समावेश असून मुरूड तालुक्यातील तळेकर , सावरोली, चोरडे, ताडवाडी, सातिर्डे, वलके, शिरगाव या गावांतील जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यातच, रायगड जिल्ह्यातील रोहा आणि मुरूड परिसरातील  गावकऱ्यांचे उत्पन्न हे शेती आणि मासेमारीवर अवलंबून आहे. यामुळे, काही गावकऱ्यांना प्रकल्प येणे गरजेचे असल्याचे म्हणणे असून काही ग्रामस्थ हे प्रकल्पांना विरोध करीत आहेत. त्यातच, रोहा तालुक्यातील न्हावे गावाची सुमारे १४०० एकर जमीन यासाठी घेण्यात आली आहे.  दरम्यान, या परिसरात येणाऱ्या प्रकल्पात गावकऱ्यांना योग्य मोबदला, भूखंड, नोकरी याची हमी शासनाने देण्याची मागणी करण्यात येत आहे. 

दरम्यान, रोहा आणि मुरूड तालुक्यातील संभाव्‍य प्रकल्‍पग्रस्‍त शेतकऱ्यांनी आज अलिबाग येथील जिल्‍हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी, शेतकरयांचा विरोध असताना मुठभर लोकांच्‍या फायद्यासाठी जर कुणी प्रकल्‍प आणू पहात असेल तर त्‍याला शेतकऱ्यांचा विरोध कायम राहील असा निश्चय करण्यात आला आहे.  तर, या प्रकल्‍पाला जमिनी देणार नाही, असा निर्धार यावेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला असून विरोध प्रकट करण्‍यासाठी मोर्चा काढण्यात आला होता. तर, प्रकल्पग्रस्तांच्या मुददयावर सरकारशी चर्चा करण्‍यास तयार असल्याचे आंदोलनाचे प्रमुख ऍड. महेश मोहिते यांनी म्हटले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही

व्हिडीओ

Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र
Shiv Sena Hearing Special Report : राहुल नार्वेकरांच्या निर्णयावर आक्षेप, ठाकरेंच्या नेत्यांचा हल्लाबोल
Shiv Sena Hearing : तर धनुष्यबाण चिन्ह गोठवा, ठाकरेंची मागणी | Special Report ABP Majha
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Free School Bag: आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
आनंदवार्ता! पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर मिळणार, राज्य सरकारची मोठी घोषणा, 165 कोटींचा निधी मंजूर
Mobile Recharge Price Hike : मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
मोबाईल रिचार्ज पुन्हा महागणार! जिओ आणि एअरटेलच्या ग्राहकांना धक्का बसण्याची शक्यता
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Maharashtra Live blog updates: ठाण्यात शिधावाटप विभागाची मोठी कारवाई, 11 हजार लिटर पेट्रोल जप्त
Ravindra Jadeja : 'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
'या' नको असलेल्या रेकॉर्डसह रवींद्र जडेजा निवृत्त, कधीच हा सोपा टप्पा गाठू शकला नाही
Dharashiv Thackeray Camp Nagarsevak will join BJP: ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीतच अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
ज्याची भीती होती तेच झालं, धाराशिवमधील 'ते' 10 नगरसेवक मातोश्रीवरच्या बैठकीला गेले नाहीत अन् आता मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत
Dharashiv School : म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
म्हशीच्या गोठ्यात मुलांचं अन्न अन् दुर्गंधीचं साम्राज्य; धाराशिवमधील दिव्यांग निवासी शाळेचे विदारक वास्तव उघड
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
Junnar Pimpalwandi Case: सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
सायकल शिकवण्याच्या बहाण्याने पिंपळवंडीत 9 वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार, नराधमाला 13 दिवसांची पोलीस कोठडी
Embed widget